Author Topic: तू मात्र नसशील .  (Read 1322 times)

Offline shashank pratapwar

  • Newbie
  • *
  • Posts: 35
तू मात्र नसशील .
« on: April 01, 2012, 11:08:00 AM »
स्मशानातल्या राखेमध्ये ,
तू निर्विकार..निश्चिंत..,
अन् मी उध्वस्त नजरेने,
एकटक त्या उरलेल्या निखार्यान्मध्ये,
तासंतास बघतोय ...
ठरल्याप्रमाने घडल नाही काहीच,
तू सोपा मार्ग पत्करला,
निखारे थंड होतील...,
अस्थिकलशातुन गंगेत जातील ,
पण माझ्या मनाची चिता ..
अशीच जळत राहील..
त्यांच्यावर अश्रु ढ़ाळायला..
तू मात्र नसशील .

- शशांक प्रतापवार

Marathi Kavita : मराठी कविता