Author Topic: वृद्धाश्रम  (Read 2577 times)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
वृद्धाश्रम
« on: April 06, 2012, 09:28:02 PM »
आयुष्याच्या  उंबरठ्यावर 
लेकराची माय लागते
तेव्हाच  का रे मग आईबापाला 
वृद्धाश्रमात  जावे  लागते?

रात-रात  जागून आईबापान
भरवलेल्या लेकराची
"भरवलं जात नाही तुम्हांला "
बोलणारी कोणती हि बोली असावी?

बोट धरून चालवणाऱ्या बापाला
हीच का रे लेकरा तुझी साथ असावी ?
दुध पाजणाऱ्या आईला
हीच का रे लेकरा वागणूक असावी ?

दिलेल्या प्रेमाची आईबापान
हीच का रे लेकरा फेड असावी?
कलियुगातील लेकराची देवा
तूच सांग रे हि कोणती जात असावी?


follow my blog on http://prashu-mypoems.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: वृद्धाश्रम
« Reply #1 on: April 07, 2012, 12:30:14 PM »
khup vastav  vadi kavita aahe.......... :(

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: वृद्धाश्रम
« Reply #2 on: April 08, 2012, 11:00:48 PM »
thanks jyoti...