Author Topic: प्रवास...  (Read 844 times)

Offline vaibhav joshi

 • Newbie
 • *
 • Posts: 37
 • Gender: Male
 • भावनांचा भार पेलतात ते शब्द..!
प्रवास...
« on: April 20, 2012, 02:31:02 PM »
प्रवास...

जीवन म्हणजे प्रवास अन माणूस म्हणजे प्रवासच...
मुलाचा बाल्यातला प्रवास
तरुणाईचा यौवनातला प्रवास
ज्येष्ठांचा वार्धक्यातला प्रवास
जीवन म्हणजे प्रवास अन माणूस म्हणजे प्रवासच...

भाषेचा व्याकरणातला प्रवास
शब्दांचा विरामचिन्हातला प्रवास
प्रस्तावना ते शेवट असा पुस्तकाचा प्रवास
जीवन म्हणजे प्रवास अन माणूस म्हणजे प्रवासच...

माणसाचा नात्यातला प्रवास
नात्यांचा गुंत्यातला प्रवास
अन या गुंत्याची 'वीण' होईपर्यंतचा प्रवास
जीवन म्हणजे प्रवास अन माणूस म्हणजे प्रवासच...

निरक्षरते पासून साक्षरतेचा प्रवास
साक्षरतेपासून सूज्ञाचा प्रवास
सुज्ञापासून स्थितप्रज्ञतेचा प्रवास
जीवन म्हणजे प्रवास अन माणूस म्हणजे प्रवासच...

स्थूलापासून सुक्ष्मापर्यन्तचा प्रवास
सांतापासून अनन्तापर्यन्तचा प्रवास
वर्धमानापासून क्षयापार्यन्तचा प्रवास
जीवन म्हणजे प्रवास अन माणूस म्हणजे प्रवासच...

आकर्षणापासून वात्स्यल्या पर्यंतचा प्रवास
मातीपासून नीतीपर्यंतचा प्रवास
भोगांपासून मोक्षापार्यान्ताचा प्रवास
जीवन म्हणजे प्रवास अन माणूस म्हणजे प्रवासच...

पुढच्या प्रवासापर्यंतच असतो आपला इथला 'आवास'
अन याही पुढे फक्त प्रवासच... प्रवास !   

          --- वैभव वसंत जोशी, अकोला

Marathi Kavita : मराठी कविता

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रवास...
« Reply #1 on: April 23, 2012, 12:42:16 PM »
पुढच्या प्रवासापर्यंतच असतो आपला इथला 'आवास'
अन याही पुढे फक्त प्रवासच... प्रवास !   

exilents....

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: प्रवास...
« Reply #2 on: April 23, 2012, 03:29:57 PM »
surekhach....