Author Topic: निरोप...  (Read 2064 times)

Offline vaibhav joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 37
  • Gender: Male
  • भावनांचा भार पेलतात ते शब्द..!
निरोप...
« on: April 21, 2012, 12:38:26 PM »

निरोपाच्या या क्षणी
मी एकटा एका बाजूला अन
दुसऱ्या बाजूला बाकी सर्व...

निरोपाच्या या क्षणी
मी एकटा आठवांनी भिजलेला अन
दुसऱ्या बाजूला बाकी सर्वांच्या भिजलेल्या आठवणी...

निरोपाच्या या क्षणी
मी एकटा हतबल, स्थब्ध,लाचार,दिग्मूढ अन
दुसऱ्या बाजूला प्रचंड गतिमानता, क्रियाशीलता

निरोपाच्या या क्षणी
माझी सुटलेली गाडी, मिळालेला हिरवा कंदील अन
दुसऱ्या बाजूला लोकांची परत फिरणारी पावले
 
निरोपाच्या या क्षणी
माझी एकट्याची वेगळी एकच वाट अन
दुसर्यांच्या वाटा मात्र वाटून घेतल्यासारख्या वेगवेगळ्या...

--- वैभव वसंत जोशी, अकोला

Marathi Kavita : मराठी कविता