Author Topic: श्वास धरणीचा कोंडला  (Read 649 times)

Offline muktibodh

  • Newbie
  • *
  • Posts: 15
  • Gender: Male
  • Pradeep S. Muktibodh
श्वास धरणीचा कोंडला
« on: May 07, 2012, 04:44:41 PM »
श्वास धरणीचा कोंडला,
जाउ लागले तडे
पाण्याच्या थेंबासाठी
जीव माणसाचा जळे!

रक्त आले डोळी
पाय आता लटपटे
माउलीच्या डोईवर
का रिकामेच घडे?

काळ्या भुईत अडला,
जीव कोणाचा खोल
नांगराच्या फाळ्यातुन
वाहे  रुधिर कोमल!

आकाशी आले विमान
तुका बैसीला देहाविन,
बोला आता पांडुरंग
जय हरी पांडुरंग!!

प्रदीप मुक्तिबोध

Marathi Kavita : मराठी कविता