Author Topic: घाव झालेले मनावर  (Read 1454 times)

Offline janki.das

  • Jr. Member
  • **
  • Posts: 76
घाव झालेले मनावर
« on: May 07, 2012, 05:35:32 PM »
सोसले मी घाव झालेले मनावर
दुःख माझे लोळते माझ्या सुखावर

कोणतेही स्वप्न आताशा पडेना
वाट जागी ,झिंग झोपेची जगावर

चांदणे आले तसे परतून गेले
मी उभा होतो तिथे आहे छतावर

डाव माझ्याशी रडीचा खेळली ती
सोंगट्या टाकू कशा सारीपटावर ?

राखरांगोळी अशी झाली घराची !
घर नव्याने बांधणे येई जिवावर

उंच आकाशी जरी घेई भरारी ,
पाखराला ओढ घरट्याची अनावर

----- अरविंद

Marathi Kavita : मराठी कविता