Author Topic: जखम  (Read 1065 times)

Offline janki.das

  • Jr. Member
  • **
  • Posts: 76
जखम
« on: May 07, 2012, 05:40:57 PM »
रात्र आता अंगावर येते
झोपच मुळी येत नाही
आठवांच्या भाऊगर्दीत
डोळां पाणी खळत नाही

भावना आटल्यात साऱ्या
सोबत आसवांची फक्त
खचून भरली माझी झोळी
प्रेमाच्याच बाजारी रिक्त

ओठ घट्ट बांधलेत माझे
परि का हुंदके अनावर
मनमानी अश्रूंचा येथे
डोळ्यांमध्ये सहज वावर

झाला तरी काय कसूर
विदीर्ण मन गप्पगप्प
एकाच वेळी सारे फितूर
विचारचक्रही व्हावे ठप्प

सोडवून मी पार थकले
गुंतण सुटता सुटेना
जडावल्या डोळ्यांनीही
पापणी मिटता मिटेना

स्वप्नं तरी कशी पहावी
वेदना शमता शमेना
जखम अशी खोलगहिरी
भळभळ थांबता थांबेना .

-- Vanita Tendulkar-Bivalkar

Marathi Kavita : मराठी कविता