Author Topic: सावध पोरी, जरा सावध गं..  (Read 963 times)

Offline janki.das

  • Jr. Member
  • **
  • Posts: 76
सावध पोरी, जरा सावध गं,
जग हे फसवे,जरा सावध गं..
सावध पोरी, जरा सावध गं,
नको होऊस तु कधी सावज गं..
सावध पोरी, जरा सावध गं..

काचेचं शील जरा सांभाळ गं,
फाटेल नाहीतर आभाळ गं..
मोह हा सगळा तात्काळ गं,
नशिबाची नको आबाळ गं..
सावध पोरी, जरा सावध गं..

आईची पुण्याई,रात्रीची गोड अंगाई,
बाप घामाचा,हात सतत कामाचा,
अपार कष्ट दोघांचे, प्रयत्न मोलाचे,
फक्त तुझ्या हातीच तयांचे सुख गं..
सावध पोरी, जरा सावध गं..

करशील तु नखरे लाख सिनेमावानी,
पण त्यांची वेगळीच असती कहाणी..
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं,
ओलांडू नकोस तु, लज्जेचा उंबरा गं..
सावध पोरी, जरा सावध गं..

म्हणेल जग कितीही,स्त्री-पुरुष समान,
पण स्त्री ही काचेच्या भांड्यासमान..
शील तुझे हाच अलंकार अंगी शोभावा,
संस्काराचा यमक शेवटी साधावा गं..
सावध पोरी, जरा सावध गं..

--श्रीनिवास गुजर