Author Topic: संस्कृती  (Read 848 times)

Offline saarth

 • Newbie
 • *
 • Posts: 4
संस्कृती
« on: May 30, 2012, 02:32:07 PM »
संस्कृती जाहली मरणप्राय
जगवणारी तुरळक गणती
मेली संस्कृती केंव्हाच
सर्वत्र जाहिरात होती      ll १ ll

संपली, काळवंडली संस्कृती
उजळवणारी तजवीज थोडी
गाडून टाकणारी तिजला
गर्दी संपत नव्हती         ll २ ll

जमवाया लोक जागृतीस
मित्रास कळविला मोर्चा
बघू उद्या म्हणाला
हात दुरूनच केला         ll ३ ll       

दुष्परिणाम प्रगतीचे
तुडवीत संस्कुती होते
मात्र लोकांना याचे
अप्रूप काहीच नव्हते      ll ४ ll

रक्षणास बोलावता
आले उपायास नव्हते
विकृतीचे बसता फटके
ते मोर्चात सामील होते      ll ५ ll

- सार्थ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: संस्कृती
« Reply #1 on: May 30, 2012, 04:46:41 PM »
hmmmm. chan kavita.

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: संस्कृती
« Reply #2 on: June 05, 2012, 10:52:23 AM »
Very Nice thought  :)