Author Topic: एकटेपण  (Read 2053 times)

Offline saarth

 • Newbie
 • *
 • Posts: 4
एकटेपण
« on: June 11, 2012, 01:50:39 PM »
एकटेपण

आजची रात्र वेगळी, ना कुणी सोबतीला
मनातही विचार ना, आज खास कुठला      ll १ ll

आजवर ना दिला, वेळ एकदाही स्वत:ला
म्हणोनीच एकट्याने, वाटे गाठले स्वत:ला      ll २ ll   

असा गेला ना वेळ, कधी एकटेच बसण्यात
करू लागलो विचार, काय तथ्य एकलेपणात      ll ३ ll       

राहण्यात एकटे असेल, काय वेगळी बात?
चंद्र; सूर्य ऐसेच का, विशाल नभी शोभतात      ll ४ ll     

एकलीच येतात माणसे, एकलीच जातात
परी जोडीदारासवेत, सारे आयुष्य घालवतात      ll ५ ll     

कशी थोर माणसे, एकलेपणास जिंकतात
उगाच काय त्यास, विचारवंत म्हणतात      ll ६ ll         

म्हणोनीच काय एकटा, देव राहतो देवळात
असेल मिळत त्यास, देवपण एकलेपणात      ll ७ ll     

आज मी हि बसलो, हा काय विचार करत
सुचले नेमके हेच, मला आज एकटेपणात      ll ८ ll   

- सार्थ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: एकटेपण
« Reply #1 on: June 11, 2012, 04:59:47 PM »
very good

एकटेपणात दुस-याची अपेक्षा असते.
एकांतात जीवनाची सार्थता कळ्ते.

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: एकटेपण
« Reply #2 on: June 12, 2012, 10:33:12 AM »
kavita chan aahe... avadli.