Author Topic: चोरी  (Read 732 times)

Offline saarth

 • Newbie
 • *
 • Posts: 4
चोरी
« on: June 26, 2012, 12:20:00 PM »
निजले आलय सारे, शांत दिवे झाले
रस्ते उघडे पडले, सारी सामसूम झाली   ll १ ll

नजर भिरभीरती, लक्ष स्थिरावले त्याचे
करण्या चोरी एक, साळसूद सावली आली   ll २ ll

शांत चित्त, बेरड देह, एक ध्येय त्याचे
नकारात्मकतेला, कुठे धुसफूस कसली?   ll ३ ll

धीर केला तशात, पुढे जाण्याचा त्याने
याधीही तीजोऱ्यांची, बरीच साफसूफ केली   ll ४ ll

सदन रिकामे होते, तसदी नाही पडली
सोन्याचा देव उचलाया, काचकूच नाही केली   ll ५ ll

दिवस नवा आला, सारी गडबड उडाली
चोरीची साऱ्यांनी, कोरडीच काथ्याकुट केली   ll ६ ll

- सार्थ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: चोरी
« Reply #1 on: June 26, 2012, 12:26:52 PM »
khup chan kavita.... ekdam vegla vishay..... kavita avadli

Offline saarth

 • Newbie
 • *
 • Posts: 4
Re: चोरी
« Reply #2 on: June 26, 2012, 02:24:38 PM »
Dhanyawad Kedarji