Author Topic: मी भारतीय अखंड काव्य  (Read 942 times)

Offline dr. shakil momin

  • Newbie
  • *
  • Posts: 2
मी भारतीय अखंड काव्य
« on: June 30, 2012, 08:49:29 PM »
माझा भारत महान ..
कारण तो माझा आहे..
मी,
मी आहे,
मी भारतीय.  II धृ II
रामभाऊ जाऊन आले फ्रान्सला
सांगत होते,
त्यांचे यजमान म्हणाले त्यांना
रात्री फ्लश वापरू नका,
शेजा~यांना आवाजाचा त्रास नको.
पण येथे,
मी काय घाबरतो त्या शेजा~याला,
माझाच संडास, माझाच फ्लश,
माझाच आवाज.
मी वाटेल ते करीन,
शेजारी बसू दे ...... II १II
माझा भारत महान ..
कारण तो माझा आहे..
मी,
मी आहे,
मी भारतीय.  II धृ II

Marathi Kavita : मराठी कविता