Author Topic: संसाराची ही नौका  (Read 1141 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
संसाराची ही नौका
« on: September 13, 2012, 09:19:58 PM »
ही चित्र-कविता पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा... http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_13.html

संसाराची ही नौका …

प्रीतिच्या संगीताने  जीवनाला सूर लावले
दुर्दैवाच्या फटक्याने  परि ते बेसूर झाले ।
श्रमांच्या सिंचनाने  बाग फुलविली जीवनांत
परि भयाण वादळाने  उजाडली ती क्षणांत ।
संसाराची ही नौका  जीवन सागरांत लोटली
एकाच काळ लाटेने  तिला रसातळाला नेली ।
खेळ हा असा विचित्र  दैव ते खेळते आहे
सुख दुःखाच्या निःश्वासाने काळास पुढे ढकळत आहे ।।

रविंद्र बेंन्द्रे

Marathi Kavita : मराठी कविता