Author Topic: माणुसकी....  (Read 1725 times)

Offline amitunde

  • Newbie
  • *
  • Posts: 33
माणुसकी....
« on: September 16, 2012, 12:25:23 PM »
माणुसकी....

न मानला धर्म
न मानली जात
धरली फक्त माणुसकीची कास
कारण हीच आहे माझी वाट ...

बेभान उधळणाऱ्या पावसाच्या सरींनी
नभी आकाशाच्या इंद्रधनुष्य उमटते
माय-माउली मातीतून, मादक सुगंध दरवळतो
जणू घेऊनी रूप परिसाचे, सृष्टीचे चराचर उजळिते
इथे नसे कधी दुजाभाव,
न कधी नरपशुंचा भेदभावाचा घाट,
बरसावे आपणही कधीतरी यासवे, हाच मनी ध्यास
कारण हीच आहे माझी वाट ...

करुनी पैशाला श्वास, लाविली संवेदनांची वाट
मारुनी ताव फुशारकीचे, समेटले सोंग सज्जनांचे
घेऊनी शिक्षण इयत्तांचे, कातडे पांघरले माणुसकीचे,
कातड्यालाच या लावावी आग, हाच मनी ठाव,
कारण हीच आहे माझी वाट ...


अमित उंडे...
सांगली

Marathi Kavita : मराठी कविता