Author Topic: मौन स्वतःच्याच मनाशी...  (Read 1650 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
मौन स्वतःच्याच मनाशी...
« on: September 16, 2012, 11:06:12 PM »
मौन स्वतःच्याच मनाशी... 
ही चित्र-कविता पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा...
http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_16.html

            मौन स्वतःच्याच मनाशी ... 

मौन स्वतःच्याच मनाशी  आपल्याच मनाने धरलेले
अन् इतरांशी बोलणेच नको  असे साईस्कर ठरविलेले ।
असें नेहेमीच होते   म्हणून वाचाच बंद होते
शब्द फुटत नाहीं अन् भावनाही मंद होते ।
उल्हास नाहीं, दुःख नाहीं  इतका जीव बनला अज्ञ
अपेक्षाही सोडून तो  आता बनला आहे स्थितप्रज्ञ ।
लादलेले असले तरी  वाटते हें मौन फार बरे
अपरिहार्य परिस्थितीमुळे  जगी एकला हेच खरे ।
नाहीं मिलनाचे सुख  नाहीं विरहाची हाय हाय
मनच मरून गेले हा  ह्या मौनाचा अर्थ काय ?                 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mvd76

  • Newbie
  • *
  • Posts: 38
Re: मौन स्वतःच्याच मनाशी...
« Reply #1 on: September 17, 2012, 11:01:26 AM »
Aawadali.....

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
Re: मौन स्वतःच्याच मनाशी...
« Reply #2 on: September 17, 2012, 11:59:14 AM »
thanks

divya1432

  • Guest
Re: मौन स्वतःच्याच मनाशी...
« Reply #3 on: September 29, 2012, 02:50:40 PM »
Beast