Author Topic: आता एकाकी राहिल्यावर...  (Read 1565 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
आता एकाकी राहिल्यावर...
« on: September 27, 2012, 09:31:46 PM »
.
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this...
http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_27.html


             आता एकाकी राहिल्यावर…

आता एकाकी राहिल्यावर माझे मला कळून आले
अबोल माझे प्रेम तिला  कधींच नाहीं समझले  ।
हाय परि झाली नव्हती  ओळख स्त्रीच्या हृदयाची
काय किंमत तिच्या जवळी उत्कट अबोल प्रेमाची  ।
बोलल्या विना कां  स्त्रीस ते कळत नाहीं
भावना स्पर्शात तिला प्रेम समजून येत नाहीं  ।
गुपित हें स्त्री मनाचे  नव्हते मला कळले
म्हणुन अबोल राहून तिजवर प्रेम केले  ।
प्रेमभावना सुप्त ठेवून  जीवनीं सुखाला मुकलो
अन माझ्या प्रियेला कायमचा मी गमावून बसलो ।।

    रविंद्र बेन्द्रे
« Last Edit: September 27, 2012, 09:32:44 PM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता