Author Topic: मला कळत नाही  (Read 1839 times)

Offline Tushar Kher

  • Jr. Member
  • **
  • Posts: 78
  • Gender: Male
    • हिन्दी रचनाएँ
मला कळत नाही
« on: September 29, 2012, 10:17:57 PM »
सत्य कळत नाही, मला सत्व कळत नाही
हे रुपेरी जगा मला तुझे रंग कळत नाहीत !

देशासाठी स्वतःचे, व स्वहिता साठी देश-बांधवांचे
रक्त वहावणारे दोघे ही, राजनेता कसे?
मला कळत नाही !

दोस्तासाठी जीव देतात तेच खरे दोस्त
पण स्पर्धेसाठी , दोस्ता चा गळा कापणारे दोस्त!
मला कळत नाही !

कळतात मला एकमेकांचे होण्याची इच्छा बाळगणारे प्रेमी;
पण, एकमेकांना , नेहेमीसाठी विसरणारे प्रेमी!
मला कळत नाही !

गोजिरवाण्या कन्यारत्नाचे खरे तर लाड़ करते आई
पण उमलताक्षणी, त्या कळीला कुसकरणारी आई!
मला कळत नाही !

खरे त्तर दुःख स्वजनांचे आणतात डोळ्यात अश्रु,
पण त्यांच्या आनंदात ही का येतात हर्षाश्रु!
मला कळत नाही !


तुषार खेर
« Last Edit: September 30, 2012, 02:46:02 PM by tusharkher »

Marathi Kavita : मराठी कविता