Author Topic: प्रिय पुरुषा  (Read 1003 times)

Offline sulabhasabnis@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 101
 • Gender: Female
प्रिय पुरुषा
« on: October 14, 2012, 04:02:57 PM »
     प्रिय पुरुषा
प्रिय पुरुषा,
म्हणजे की मीच टाळतेय
तुला मित्र म्हणायचे
की आणखी काही नवरा, प्रियकर वगैरे
किंवा           
अतिलाडाने, अतिप्रेमाने, प्रियतम ,
प्राणेश्वर , प्राणनाथ इ.
म्हणजे की
तू कुठल्याही नात्यात बांधलाच जात नाहीस तर;
'नात्यालाही पुरून उरतो तो पुरुष'
तर असं की
तू भाऊ असण्यापेक्षापुरुषच
जास्त असतोस-
बाप असतानाही तू तुझं पुरुषपण
जिवंत ठेवतोस-
नवरा झाल्यावर तर तू स्वत:ला अखंड पुरुष समजतोस .
बाईला मित्र, सखा असण्याची
सुईच्या टोकाइतकीही परंपरा
आपल्याकडे नाही
तरीही एखादीला गवसला हा निखळ कवडसा
तर,
सखा म्हणूनही तुझ्यातून
वर चढतो तो पुरुषच -
आणि
तू बाईला जोखत राहतोस
ते तुझ्या तोलाने
तर माझ्या प्रिय पुरुषा-
तुझे पुरुष असणे आणि माझे बाई असणे
एवढा जैविक अपघात
सोडला तर -
आपण एकाच मनुष्यीय उंचीवर आहोत
वासना इच्छांच्या डोहाशी तुडुंब
बुडणारे ,
त्याच कातडीचे, त्याच जातीचे
पण ही समज यायचं
तुझं वय झालच नाही अनंतकाळापासून
तू फसतच गेलास,
तू आणखी खुजा होत गेलास-
तुझ्या पुरुष असण्यात, ते टिकवण्यात
पुरुषत्वाच्या अनाकलनीय नेभळट
काल्पनावादात - तर हे पुरुषा,
नाहीच निकामी करता आली कधीच
जगातल्या कुठल्याही धर्माला आणि संस्कृतीला
पुरुषपणाची तुझी अस्त्रं आणि शस्त्रं
उलट-
ती ठाम होण्यासाठीच
रचली देहकांडाची कुबाडे
पिटले तुझ्या आंधळ्या प्रधानतेचे दिंडोरे,
भिनवले तुझ्या रक्तात पुरुषसूक्त
माझ्या प्रिय पुरुषा
तुझी ती अंगावर चढवलेली
पुटे
तीच एवढी तू काढून ठेव
जगण्याच्या काठावर
आणि
उतर खोल आपल्या अस्तित्वाच्या
लख्ख पाण्यात- माझ्या बरोबरीने
विरघळून जातील दोन शरीरे तुझी माझी
त्या तळाशी
तिथं तुझा मनुष्योत्तम चेहरा मला
चुम्बायचाय !
             --------------   
            प्रा.कविता म्हेत्रे =-म्हसवड ---माण---सातारा.
                                                     (' मिळून साऱ्याजणी'--ऑगस्ट २०१२)
 
« Last Edit: October 14, 2012, 04:07:58 PM by sulabhasabnis@gmail.com »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: प्रिय पुरुषा
« Reply #1 on: October 15, 2012, 11:33:26 AM »
nice... i like it very much .... thanks for sharing.... :)

Offline sulabhasabnis@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 101
 • Gender: Female
Re: प्रिय पुरुषा
« Reply #2 on: October 15, 2012, 12:16:57 PM »
thanks Santoshi------!!

vg vader

 • Guest
Re: प्रिय पुरुषा
« Reply #3 on: October 18, 2012, 07:52:38 PM »
very fine

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: प्रिय पुरुषा
« Reply #4 on: November 14, 2012, 04:12:29 PM »
Thanks for sharing.Very good.