Author Topic: मी जेव्हा मरून जाईन  (Read 1816 times)

Offline Tushar Kher

 • Jr. Member
 • **
 • Posts: 78
 • Gender: Male
  • हिन्दी रचनाएँ
मी जेव्हा मरून जाईन
« on: October 26, 2012, 10:13:29 PM »
मी जेव्हा  मरून जाईन तेव्हा मला जाळू नका
आयुष्य भर जळत होतो, आणखी चटके देऊ नका

जेव्हा माझा अंत होईल तेव्हा तुम्ही रडु नका
जन्म भर मी रडत होतो, आणखी रडणे ऐकवू  नका

माझ्या मृतदेहावर नवीन कपडा घालू नका
आयुष्यभर बेअब्रू केले, आता झाकायचे सोंग करू नका

माझ्या  देहाचे ओझे खांद्या वरून न्हेवू नका
आयुष्याचे ओझे मीच माझे वाहिले उपकाराचे ओझे देऊ नका

माझ्या निस्प्रण देह वर कोणी फुले वाहू नका
माझ्या वेदनेचा गंध फुलांच्या वसत लपवू नका

माझ्या देहाच्या मातीला शेवटी नमस्कार करू नका
आयुष्यभर पाया खाली तुडवले, आता पाया पडू नका.


Author Unknown 
« Last Edit: October 26, 2012, 10:14:56 PM by Tushar Kher »

Marathi Kavita : मराठी कविता


madhavn kalewar

 • Guest
Re: मी जेव्हा मरून जाईन
« Reply #1 on: October 27, 2012, 04:41:35 AM »
महान आहेत तुझे विचार व तुझ्या कविता__Nice

Offline Tushar Kher

 • Jr. Member
 • **
 • Posts: 78
 • Gender: Male
  • हिन्दी रचनाएँ
Re: मी जेव्हा मरून जाईन
« Reply #2 on: November 10, 2012, 07:39:04 PM »
hi kavita mi lihleli nahi. pan aavadali mhanun post keli.