Author Topic: सागराच्या पोटी जन्म घेवूनी  (Read 1393 times)

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
सागराच्या पोटी जन्म घेवूनी....
 
सागराच्या पोटी जन्म घेवूनी
नभ वाळवांट पांघरे..
सावळ्या रंगाच रूप घेवूनी .
त्यांनी त्यागिले वर्ण पांढरे..

इंद्र द्वेषाच्या प्रकोपाचे संकट यांनी ओढले
पित्र हृदयी परतण्यास हृदय अपुले फोडले..

हृदय फुटुनी वाहिलेले रक्त अमृत जाहले..
भेग पडलेल्या मातेच्या हृदयात जावून वाहले..

पुत्र विरहाच्या दुःखाने मन मातीचे पाझरले..
अन उजाड झालेल्या शेत-वनात सुवर्ण बीज अंकुरले..

पुत्र विरहाचे दुःख तिने आसवांनी साचवले
नकळतच त्या मातेने अनंत जीव वाचवले..

डोंगरा  एव्हडा कर्ज उचलुनी माझा बाप होता वाकला..
त्याच्याच आसवाच्या सिंचनाने पिकलेला घास मी चाखला..

त्याच्या आसवाची चव जणू सागराची संपती...
खर्च केली त्याने विसरून मरणाची भीती..

माझ्या बापाच दुःख बघुनी बाप नभाचा तळमळला
अन सूर्य देवाच्या प्रकोपानी गर्भ त्याचा उखळला

 सागराच्या पोटी जन्म घेउनी ......

ब. भोसले

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
रीधय  स्पर्शी कविता

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
thank u sir

Patil Suchitra

 • Guest
palkana dileli sagrachi upama mahan ahe,ji sagrapekshahi athang ahe.

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
thanx...........