Author Topic: ~ मन ~  (Read 2492 times)

Offline nphargude

  • Newbie
  • *
  • Posts: 38
  • Gender: Male
~ मन ~
« on: June 01, 2011, 12:05:16 AM »
मन मोठे असले पाहिजे आनंद आपोआप मिळतो,

छोट्या गोष्टीत समाधान मानणारयाना माणूस सुद्धा देव वाटतो.

उगीच दिखावा करण्यात काहीच अर्थ नसतो,

मनाने मोठे असणाऱ्यला कधीही गर्व नसतो.

श्रीमंत माणसे पैशाने कदाचित मोठी असतात हि,

सामान्य मात्र पैसे नसून हि मनाने श्रीमंत खूपच असतात.

आनंद वाटल्याने द्विगुणीत होतो,

तो तसाच ठेवला तर मोठा माणूस देखील मनाने संकुचित मनाला जातो.

मन हेच मोठे असावे बाकी सगळे व्यर्थ,

मोठा होवो कितीही मग माणूस तसा नसल्यास त्याला काहीच उरत नाही अर्थ...

Marathi Kavita : मराठी कविता