Author Topic: एक धेय्य... साकार करूया...१५ ऑगस्ट २०१३ रोजी... जय हिंद... जय महाराष्ट्र...!!!  (Read 2150 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
माझ्या कवी मित्र मैत्रीणीनो

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

आपल्या MK वर साधारणता १८५०० हून अधिक सदस्य असून दिनांक २४ मे, २०१२ रोजी दुपारी ३ वाजून १२ मिनिटे १५ सेकंद ह्या वेळी आपल्या लाडक्या MK वर साधारण ११८३ online सदस्यांची विक्रमी नोंद झाली होती. माझ्या मनात एक कल्पना आली आहे कि आपण ह्या वर्षी दिनांक १५ ऑगस्ट २०१३ रोजी दुपारी ४ वाजता अथवा सार्वमताने अथवा माननीय admin ने ठरविलेल्या वेळेवर जास्तीत जास्त सदस्यांनी online राहून एक विक्रमी उपस्तीतीची नोंद करून आपल्या देशाच्या झेंड्या प्रमाणे आपल्या लाडक्या MK चे नाव अजरामर आणि उंच करूया. ज्या ज्या मित्रांना हि कल्पना आवडली असेल किवा हे योग्य अथवा अयोग्य वाटत असेल त्यांनी त्यांनी कृपया आपापले अभिप्राय द्यावेत. कदाचित माझी हि कल्पना चुकीची अथवा अयोग्य हि असू शकते, जरी कोणाला तसे वाटत असेल तरीही त्यांनी आपापली मते द्यावीत.

धन्यवाद...

आपला कवी मित्र

प्रजुन्कुश...