'मात्रा' च्या आधारावरही गझल होऊ शकते
ज्या प्रमाणे कवितेला यमक असण्याचा नियम असतो, तसच गझलेला 'मात्रे'चा नियम असतो.
शब्दांतील अक्षरांचा प्रकार ओळखून त्याच प्रकारच्या अक्षरांची मांडली दुसऱ्या ओळीत करायची.
यात अक्षराचे प्रकार दोन....
१) लघु - म्हणजे काना-मात्रा, उकार-अनुस्वार नसलेली अक्षरे.....
उदा: अ, ब, क, ड
आणि पहिली वेलांटी , पहिला उकार असलेली अक्षरे.
उदा: हि, तु
२) गुरु - कान -मात्रा, दुसरा उकार, दुसरी वेलांटी असलेली अक्षरे...
उदा: तू, जी, मी
आणि जोडाक्षरे....
उदा: स्वास्थ्य
गझल मध्ये "काफिया" आणि "रदीफ" काय असते ह्यावर थोडी माहिती ....
संदर्भ :
"तुज बघता सारा हिशेब चुकला होता
मी अमावास्येला चंद्र पाहिला होता
तो एकच झाला गुलाब अवघा लाल
जो ओठांवरती तुझ्या टेकला होता
तालात नादली तुझी पैंजणे तिकडे
हृदयाचा ठोका इकडे हुकला होता
डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा
मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता
निथळता चांदणे असह्य अंगावरती
मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता
तू मिठीत घेता श्वास थांबले होते
मज मारायचा डाव चांगला होता
पाहिले जयाने तुझे लाजरे हासू
माणूस तो आयुष्यातून उठला होता
चढणार होते जहर तुला हे माझे
मी कवितेतून दंश ठेवला होता"
वरील संदीपच्या गझलेत 'चुकला' 'पाहिला' 'टेकला' 'चांगला' 'ठेवला' ह्याला "काफिया" म्हणतात आणि मतल्यात ते दोनदा आले आहेत. काफियाचे अनेकवचन "कवाफी" आहे. "होता" जो शब्द आहे त्याला "रदीफ" म्हणतात जो मतल्यात दोनदा आला आहे आणि प्रत्येक शेरामध्ये शेवटी आले आहे. रदीफ हे पूर्ण गझलेत कधीही बदलत नाही.
मतल्यात गझलेची जमीन(मात्रा) निश्चित होते आणि ती पूर्ण गझलेत कधीही बदलत नाही. प्रत्येक काफियाचे "अलामत" सुद्धा निश्चित असते जसे कि वरील गझलेत 'उठला' 'ठेवला' 'चांगला' 'टिपला' हे काफिया आहेत त्यात प्रत्येक काफियाचा शेवट हा "ला" हे यमक आहे. "ला" च्याआधी "अ" हे स्वरचिन्ह आहे(अलामत म्हणजेच स्वरचिन्ह होय).
this information is shared from Madhura Kulkarni's poem "गझल" her comments & reply from प्रसाद पासे....