भुजंगप्रयात
भुजंगप्रयात हे अक्षरगणवृत्त आहे. यात लघुगुरूक्रमानुसार शब्द येतात. याचे ४ खंड असून, प्रत्येक खंड हा ५ मात्रांचा असतो. एकूण अक्षरे १२ , एकूण मात्रा-२०, यती ६ व्या अक्षराअंती. यती म्हणजे थांबणे.(pause)
हे वृत्त मराठीत मोठ्या प्रमाणात वापरले गेले आहे. समर्थ रामदासस्वामींचे मनाचे श्लोक याच वृतात आहे
भुजंगप्रयातचा लघुगुरू क्रम असा आहे -
ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा
१ २ २ १ २ २ १ २ २ १ २ २
ल म्हणजे लघु अक्षर आणि गा म्हणजे गुरू अक्षर. लघु अक्षराची १ मात्रा आणि गुरू अक्षराच्या २ मात्रा
उदाहरणे...
कशी को । ण जाणे । अकस्मा । त लाट
कशी कोण जाणे अकस्मात लाट
दुभंगून जाई तुलाही मलाही
कधी भेट होई? अता राहवेना
प्रवासी जराही, तुलाही मलाही
----- प्रवासी महाशय
पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
-----सुरेश भट
रसिक नव कविनो प्रयत्न करून बघा
.