Author Topic: तुम्हाला कविता करण्याचा छंद केव्हा पासून  (Read 4757 times)

Offline nalini

 • Jr. Member
 • **
 • Posts: 94
kavita mala kadhi tharvun karta ali nahi.asech kadhitari shabda julun yetat.pan mala kavita vachayla khup avadtat.ani ya site mazi hi mothi garaj purna keli.thanks all of you

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Bahuli

 • Jr. Member
 • **
 • Posts: 91
 • Gender: Female
अजूनही आठवते, मी इयत्ता सहावीत असताना माझी पहिली कविता "फुलपाखरू",  विज्ञानाच्या वहीच्या पहिल्या पानावर लिहिली होती.घरी ती आईने पहिली...तिला खूपच आनंद झाला कि मी कविता रचू शकते......खरे तर हा वारसा मला माझ्या वडिलांकडूनच मिळाला आहे...ते खूप सुंदर कविता रचत... पण आश्चर्य म्हणजे मी जेव्हा माझी पहिली कविता रचली त्यावेळी पप्पा कविता करतात हे माहितही नव्हते....

Offline Vkulkarni

 • Jr. Member
 • **
 • Posts: 188
 • Gender: Male
 • Let's be friends !
  • "ऐसी अक्षरे मेळविन!" आणि "माझी सखी"
मुळात कवितेला छंद म्हणणे मला मान्य नाही. कविता हि वृत्ती आहे. एखाद्या विवक्षित घटनेने प्रेरीत होवून, किंवा एखाद्या विवक्षित घटनेमूळे लिहायला लागणे असो, किंवा लहानपणापासुन आवड असणे असो... कविता ही रक्तातच असावी लागते. असो...
मला असं नाही सांगता येणार कधी लिहायला लागलो ते, कारण माझी आई सांगते, लहानपणापासुनच मला सिनेमाच्या गाण्यात स्वत:चे शब्द घुसडून त्यांची मोडतोड करायची सवय होती. कदाचीत माझ्या कवितेची मुळं तिथेच रुजली असतील. ;D

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
 • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !
"प्रेमात पडले तर सगळेच कविता करतात" असे मला वाटते आणि मी सुद्धा कॉलेज लाएफ मध्ये असताना एकतर्फी प्रेमात पडलो होतो माजी पहिली कविता होती """"मला माहीत आहे तू माझ्यावर प्रेम करत नाही""""" त्यानंतर कविता करयला सुरुवात केली एक कविता तर कॉलेज च्या स्नेह संमेलना च्या दिवशी बोललो होतो तेव्हा टाळ्यांचा कडकडात झाला होता......  
« Last Edit: October 16, 2010, 10:56:29 PM by Rahul Kumbhar »

Offline महेश मनोहर कोरे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 158
 • Gender: Male
 • अवघड प्रेमाच्या कळ्या फुलतात मग माणुसकीच काय ?
कविता हा माझा श्वास आहे .....

जस कळायला लागल .............................

तेंव्हापासून आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक कविताच झाली  ................

Offline महेश मनोहर कोरे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 158
 • Gender: Male
 • अवघड प्रेमाच्या कळ्या फुलतात मग माणुसकीच काय ?

Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
chaan vatla apple mat vachun

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
2/1/2002 pasun....sakali 10 chya aaspas pahili kavita lihili. :)

Offline Ravi Padekar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 150
 • Gender: Male
 • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
शाळेत असतानाच मला कविता खूप आवडायच्या.... पण अस कधी वाटलं नाही की मी कविता करू शकेल. ऑफिस मध्ये मला खूप मोकळा वेळ भेटायचं मग त्या वेळेमध्ये मी विषय सुचवायचो, शब्द मांडायचो अशा रीतीने हळू हळू जमू लागली, कविता कशी ही मांडलेली असो पण ती लोकांपर्यंत कितपत पोचेल, त्यांना आवडेल याला जास्त महत्व आहे, आणि मी देखील तेच करतो, माझे विचार लोकांना आवडतात म्हणून माझा उसाह वाढतो..... धन्यवाद!

Offline Ravi Padekar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 150
 • Gender: Male
 • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
शाळेत असतानाच मला कविता खूप आवडायच्या.... पण अस कधी वाटलं नाही की मी कविता करू शकेल. ऑफिस मध्ये मला खूप मोकळा वेळ भेटायचा मग त्या वेळेमध्ये मी विषय सुचवायचो, शब्द मांडायचो अशा रीतीने हळू हळू जमू लागली, कविता कशी ही मांडलेली असो पण ती लोकांपर्यंत कितपत पोचेल, त्यांना आवडेल याला जास्त महत्व आहे, आणि मी देखील तेच करतो, माझे विचार लोकांना आवडतात म्हणून माझा उसाह वाढतो..... धन्यवाद!