प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये दोन रंगाचे कपडे असायला हवेत. एक म्हणजे पांढरे आणि दुसरे काळे. खरं तर आपल्याकडे काळ
्या कपड्यांची फॅशन अगदी अलीकडच्या काळात स्वीकारली आहे. काळे कपडे वापरू नयेत, अशी रीत अनेक घरात आहे. त्यामुळे आपल्या आईच्या किंवा मावशीच्या वॉर्डरोबमध्ये काळे कपडे फारसे दिसत नाही. पण परदेशात मात्र काळ्या रंगांचा मोठ्या प्रमाणात कपड्यांमध्ये वापर केला जातो. त्यात लिटील ब्लॅक ड्रेस असणं अत्यंत आवश्यक मानलं जातं. प्रत्येक स्त्रीच्या वॉर्डरोबमध्ये ब्लॅक ड्रेस असलाच पाहिजे. विशेष म्हणजे असा ड्रेस आपल्या वॉर्डरोबमध्ये असावेत, असं आपल्याकडचे डिझायनर सांगायला लागले आहेत.
आपल्याकडच्या डिझायनरने आपल्याला वेस्टर्न फॅशन ट्रेण्डप्रमाणे कपडे खरेदी करण्याची सवय लावली आहे. अनेक फिल्मस्टार सिनेमात जे कपडे वापरतात किंवा त्यांच्या वॉर्डरोबमध्ये जे कलेक्शन असतं त्यात काळा ड्रेस असायला हवा, असा आग्रह धरतात. अर्थात पुरुषांना सुट्स, शर्टमध्ये हा रंग वापरता येतो. ट्राउझर्समध्ये तर ब्लॅक हा मोस्ट डिमांडिग कलर असतो.
जर फिल्मस्टार्सप्रमाणे आपल्याला लिटिल ब्लॅक ड्रेस वापरणं शक्य नसेल तर बरेच ऑप्शन आपल्याकडे आहेत. म्हणजे वेस्टर्न वेअर कधी तरी वापरत असाल तर त्यासाठी ब्लॅक कलरचा चालतोच. शिवाय जर कुतीर्ज वापरत असाल तर जरा डोळ्यात भरतील अशा डिझाइन्समध्ये तो विकत घेता यईल. शर्ट्स किंवा टॉप्स घेताना सॅटिन, शिफॉन अशा मटेरिअलमध्येही काळा रंग उठून दिसतो. अगदी देसी कपड्यांमध्येही काळ्या रंगाचे पेहराव नक्कीच खुलून दिसतात. अर्थात त्यात गोल्ड, कलरफुल भरतकामाने हे कपडे पाटीर्वेअर म्हणून वापरता येतील. आपल्याकडे संक्रातीला काळ्या रंगाचे कपडे वापरले जातात. त्यामुळे एखादी काळी साडी असतेच. ती घेताना ती पाटीर्मध्ये वापरता येऊ शकते. त्यामुळे आपल्या ब्लॅक लिटील ड्रेस ही कॉन्सेप्ट वन ब्लॅक अटायर म्हणून अडॉप्ट करता येईल.