नमस्कार !!मी अमरावतीकर मुलगी ,सुनिता माझे नाव ,
पदवी पर्यंत शिक्षण, झाले माझे राव ,
बरीच वर्ष ओरिसा मध्ये राहायचा योग आला
मायदेशाचा विरह बराच काळ सोसावा लागला
मराठी बोलण्या साठी मी तरसून गेलेली
घरच्या वरण-भाताला मी विसरून गेलेली
जेव्हा कधी यायची मी मायदेशी ,
आई लाड पुरवायची हौशी-हौशी
मराठी सिनेमा अन गाण्याचा तर संबंध च उरला नव्हता
ई टीवी ,मी मराठी साठी मी तेथे केबल वाल्या सोबत पंगाच केला होता .
पण माझ्या एकटी साठी तिथे काहीच बदलणार नव्हत
संपला वनवास आता मी अमरावतीकर झाले
एवढ्या दिवसाच्या मनातल्या इच्छा पूर्ण करीत आले
पण एकच तेवढे दुखं आहे आता मला
लाड करणारे आई-बाबाच देवाघरी गेले ,

ऑन लाईन का असेना ,तुमच्या सर्वांच्या सहवासात अन तुक-बंदी करण्यात मला थोडा का होईना माता-पित्याचा विरह कमी वाटायला लागला . धन्यवाद मित्रांनो !!!
