Author Topic: Love at first sight!!!  (Read 1293 times)

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,415
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Love at first sight!!!
« on: May 01, 2013, 11:58:08 AM »
Love at first sight!!!

आपण नेहमी सिनेमा मध्ये किंवा कथा, कादंबरी मध्ये बघतो, वाचतो……बघताक्षणी कुणीतरी कुणाच्या प्रेमात पडतं ……. पण खरच का ते प्रेम असतं! ……। कि असतं ते फक्त आकर्षण ………क्षणिक ………कि असतं ते एक मृगजळ ………. जे कालांतराने होतं निर्जळ !!!!

ती तिच्या एका कवितेत लिहिते ………. तिचे एका अनोळखीवर? प्रेम जडले!!!……… काही दिवसांनी ती दुसरी कविता लिहिते……. माझ्या उदरात तुझा अंश वाढतोय …………. कधीची वाट बघतोय तुझी ……… परत कधी येणार रे माझ्या सख्या ???………. का असंच असतं Love at first sight???

कधी कधी हे प्रेम नुसतंच एकतर्फी असतं ……… त्यातून साहजिकच कुण्या एकाचा प्रेमभंग होतो ……… अन वर्तमानपत्रात बातमी छापून येते ……… एका मुलाने एका मुलीवर ACID फेकले……… किंवा एका मुलीने त्याने प्रतिसाद दिला नाही म्हणून आत्महत्या केली !!!………. का असंच असतं Love at first sight???

आपण २१ व्या शतकातले तरुण/तरुणी असंच नकळत कुणावर तरी प्रेम? करतो ………. मग हळूहळू एकमेकांत गुन्ततो…… अन गुंता जास्तच वाढला कि आयुष्यभर रडत बसतोय!!!

मग प्रेम हे असं Love at first sight असावं कि असावं ते एक बंधन ……… जिथे प्रेम आपसूकच जडतं ……… दिवसेंदिवस हृदयात खोलवर रुजत जातंय ……… ते प्रेम असतं मुरलेलं , मुराब्ब्यासारखं अविट………. गोड ……… चिरतरुण ……… निर्मळ !!!!

मला वाटतं हा एक आजच्या तरुण पिढीसाठी गंभीर चर्चेचा विषय असून त्यावर चिंतन करणे खूप गरजेचे आहे!!!

रसिक मित्रानो आपण सगळेच कधीतरी कुणाच्यातरी प्रेमात पडतोच !!! आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया येथे अपेक्षित आहेत!!!


चार मिनिटांचा सहवास,
चाळीस वर्षांचा प्रवास,
गुंतलंय मन तिच्यात,
अजूनही  बघतोय वाट,
देशील  का तू मला साद!


मिलिंद कुंभारे
« Last Edit: May 01, 2013, 12:13:12 PM by मिलिंद कुंभारे »

Marathi Kavita : मराठी कविता

Love at first sight!!!
« on: May 01, 2013, 11:58:08 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):