किती आठवावे तुला आश्रु अपुरे झाले,
किती साठवावे मनात शब्द फुटेना
झाले,
नकळत तुझ्या आठवणीने पापण्या ओल्या झाल्या,
त्या सर्व जून्या आठवणी पुन्हा ताजेतवाने झाल्या।
कधी आहेस तू समोर नुसता भास
माझ्या या वेड्या मनाला फक्त तुझाच ध्यास
नाही सोडली मी आस
क्षणी भासतो मला तुझा सहवास
नकळत तुझ्या आठवणीने पापण्या ओल्या झाल्या,
त्या सर्व जुन्या आठवणी पुन्हा ताजेतवाने झाल्या।
किती सावरु मी माझ्या आठवणीना,
किती थांबवावे मी माझ्या भावनांना,
किती झुरले मन माझे तुझ्यात
ते गुढ गुंफले माझ्या ह्दयात,
नकळत तुझ्या आठवणीने पापण्या ओल्या झाल्या,
त्या सर्व जुन्या आठवणी पुन्हा ताजेतवाने झाल्या।