Author Topic: थोडेसे आवाहन करायचे आहे मला...  (Read 1285 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार

मी कविता तर खूप लिहिल्या
आहेत माझ्या मोबाईल मध्ये पण…
 त्या इथे नेट वर टाकू वाटत नाही.


का कोण जाने पण हल्ली कोणालाच
 काही मनातले सांगू वाटत नाही.


मनात तर खूप काही आहे पण…
ते स्वतःजवळ ठेवू वाटते.


शब्दात तर ते मांडले आहे पण…
 तुम्हाला सांगू वाटत नाही.     


बहुतेक आयुष्याच्या ध्येयापुढे...
 सारे फिके झाले आहे.


 हल्ली सारे लक्ष ...
जणू स्वप्नांच्या पाठी लागले आहे.


ध्येयामागे धावत तर नाही मन पण…
 अडून त्यासाठीच बसले आहे.  - हर्षद कुंभार


( माझ्या ध्येयातले मुख्य ध्येय आहे पुणे येथे स्थायिक होणे… त्यासाठीच सर्वाथाने प्रयत्न चालू आहे पण त्यासाठी मला पुणे मध्ये
नोकरी मिळणे गरजेचे आहे मित्रांनो… 
थोडेसे आवाहन करायचे आहे मला. जे कोण Software कंपनी मध्ये आहात त्यांनी प्लीज Dot Net या Language मध्ये पुणे येथील कंपनीमध्ये
काही Reference असेल तर प्लीज मला सांगावे. - हर्षद कुंभार  (Email - harshad.kumbhar @gmail.com) )