Author Topic: पहिली ते आठवी …. परीक्षा नाहीच ….  (Read 3431 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
पहिली ते आठवी …. परीक्षा नाहीच ….

आजच्या म. टा. मध्ये हि बातमी वाचली अन मन खिन्न झाले …. शिक्षण म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे एवढेच नव्हे, तर जीवनात जगण्याचा दृष्टीकोन निर्माण करणे हे मुलभूत कर्तव्य आहे असे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका निकालात म्हटले आहे … पण लिहिता वाचताच आले नाही तर जीवनात जगण्याचा दृष्टीकोन कसा निर्माण होणार ??? परीक्षा नाही म्हटल्यावर मुलांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही , त्याचे महत्वच त्यांना नसते. अशानेच शिक्षणाचा दर्जा घसरत चाललाय. आठवी पर्यंत मुलांना लिहिता वाचता किंवा साधे बेरीज वजाबाकी, भागाकार गुणाकारच करता आला नाही तर आठवी नंतरचे शिक्षण तो विद्यार्थी कसे पेलणार??? परीक्षा म्हनजेच आपण जे काय शिकलो त्याचे मुल्यांकन होय … त्याशिवाय त्याचे मूल्यमापन कसे ठरणार ????

असो …. ह्यात जे विद्यार्थी हुशार आहेत किंवा ज्यांचे पालक सुशिक्षित आणि हुशार आहेत असेच विद्यार्थी ह्या धोरणामुळे आठवी पलीकडे शिकणार …… पण जे विद्यार्थी थोडे कमी बुद्धीचे आहेत किंवा ज्यांचे पालक कमी शिकलेले, गरीब असतील अश्या विद्यार्थांना असल्या शिक्षणात काहीच रस राहणार नाही …. ह्यामुळे समाजाचा एक टप्पा शिक्षित राहणार तर  एक टप्पा कायम अनपढ असणार …. समाजामध्ये विषमता निर्माण होणार …. तेव्हा आपला देश कसा प्रगत होणार ??? मला वाटतं हा फार गहन चर्चेचा विषय आहे व त्यावर योग्य तो निर्णय झालाच पाहिजे …. मित्रानो आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत …

मिलिंद कुंभारे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
खरच हा फार गंभीर विषय आहे . शिक्षण म्हणजे खेळच झाला आताशा . नवनवीन सर्कुलर निघतात ,त्यात शिक्षणाला मजाकच बनवून ठेवलंय जसं . नवीन रुल्स असतात त्यातले बरेच एका सामान्य माणसाला माहित सुद्धा नसतात . आता हे काय नवीनच ?आठवी पर्यंत जर कुणालाच नापास केलं नाही तर दहावी आणि बारावी किती कठीण जाणार त्यांना ,कारण आठवी पर्यंत अभ्यासाची सवय राहणारच नाही कुणाला ,CBSE मध्ये तर दहावीची परीक्षा पण पर्यायी केली ,एकतर बोर्डाची द्या किवा शाळेतच ओर्गनाइज केली जाते ,हा सिब्बल यांचा नवीन रूल आहे ,त्याचे परिणाम काय हे कुणीच सांगत नाही ,अश्या  मुलांना ज्यांनी शाळेची परीक्षा दिली ,त्यांना पुढे जर poly करायचं असेल तर ते त्यासाठी  योग्य पात्रता नाही असं सांगितलं जातं ,त्यांना admission मिळत नाही. ते फक्त अकरावीच करू शकतात आणि ते पण त्याच शाळेत .   ……. सुनिता

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
sweetsunita,

CBSE मध्ये तर दहावीची परीक्षा पण पर्यायी केली ,एकतर बोर्डाची द्या किवा शाळेतच ओर्गनाइज केली जाते ,हा सिब्बल यांचा नवीन रूल आहे.....

हे काय नविनच ऐकतोय !!! मला माहितीच नव्हते … :(

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
हो !२००९ -१० पासून हा रूल लागू झाला आहे . तुम्ही रुल्स बघू शकता cbse च्या वेब साईट वर..

Offline vinod.shirodkar111

 • Newbie
 • *
 • Posts: 44
 • Gender: Male
 • तुझ्यासाठी कवी बनलो …:)
kharch......xam nasne mhnje no preparation......n no preapration mhnje mule abhysch nahi karnar.....n samjnar kase mg mulana kase n kay yete....mi swatah 8th paryant chy mulana shikvato....n i knw preparation shivay mulanacha base nit hote nahi....nusta homework karun kay fayda????? :(

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
vinod.shirodkar,

बरोबर आहे …  :(
शिक्षण क्षेत्रातले हल्लीचे हे नवीन नवीन प्रयोग कुठेतरी थांबायला हवेत ….
माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या ३ मुलभूत गरजा योग्य शिक्षण घेतल्याशिवाय पूर्ण होणे कठीण वाटते ….
आजच्या विद्यार्थ्यांमध्ये जगण्याचा खरा दृष्टीकोन रुजवला गेलाच पाहिजे ….

Offline vinod.shirodkar111

 • Newbie
 • *
 • Posts: 44
 • Gender: Male
 • तुझ्यासाठी कवी बनलो …:)
barobar ahe tuche pn....... :)
mulanmadhey shikshnachi janiv zhali pahije.......imp kalal pahije