आता ट्रान्सलिटरेशन टूल वापरून देवनागरीमध्ये लिहिणे सोपे झाले आहे. गूगलमध्ये जे टूल आहे तेही चांगले आहे पण ते बोंडल्याने भरवल्यासारखे आहे. यासारखे टूल वापरण्यासाठी जेथे हे टूल असेल त्या साईटवर जावे लागते. डाऊनलोड करून स्वत:च्या कंप्युटरवर असं टूल असलं तर आपल्या फावल्या वेळात देव्नागरीमध्ये लिहिणे शिकता येईल. नाही का!
मित्रांनो, असं एक टूल मी सध्या वापरत आहे. त्याचं नाव आहे बराहा ८.० त्यासाठी
http://www.baraha.com / या साईटवर जाऊन हे फ़्री सोफ़्टवेअर डाऊन लोड करून घ्या. बंगलुरुच्या एका कंपनीने याला विकसीत केले आहे. हे टूल वापरून देवनागरीतच नाही तर इतर भारतीय भाषांच्या लिपीमध्येही लिहिणे शक्य झाले आहे.
देवनागरीत लिहिण्याची मनापासून इच्छा, मेहेनत करण्याची तयारी आणि थोडीशी जिद्द, या तीनही गोष्टी असल्या तरच हे शक्य आहे.
शुभेच्छा.
सुहास फणसे
