नमस्कार,
आपणा सर्वांस राहुल कुंभार व अनिल जाधव ह्यांचा हार्दिक प्रणाम.
मराठी कवितासाठी आता पर्यंत आपण जो काही प्रेम, आपलेपणा दाखवला त्याचे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही. सर्व २८०० पक्ष जास्त रसिकांचे व moderators चे सप्रेम आभार.
दिवाळी ही जवळ येउन ठेपली आहे. दिवाळी म्हणजे नव चैतन्याची रास, सगळी कड़े अंधाराचा विनाश होउन उजेडाचा प्रकाश. हाच उजेड नव-निर्मिती चा बदल घडवून आणतो.
ह्या दिवाळीत मराठी कविता ही बदलत आहे, नव्या रुपात, नव्या रंगात, नव्या कवितां सह. बदलणार नाही ते आपले प्रेम, आपल्या कवितांच्या आवडी.
ह्या दिवाळी साठी आम्ही कवितांचा "दिवाळी विशेषांक" काढत आहोत. ह्या करीता आम्हाला भरपूर रसिकनी मेल पाठविले, कविता पाठवल्या. आता ह्याच पैकी काही सुंदर कविता "दिवाळी विशेषांक" मध्ये प्रसिद्ध होतील. आपल्याला ही जर आपल्या कविता "दिवाळी विशेषांक" मधे प्रसिद्ध करायचा असतील तर आपल्या कविता rahul@marathikavita.co.in , admin@marathikavita.co.in ह्या id वर पाठवा.
तसेच आपल्याला मराठी कविता ह्याचे नविन रूप, नविन रंग कसे वाटले हे ही कलवा. आपल्या निवडक प्रतिक्रिया आम्ही "दिवाळी विशेषांक" व मराठी कविता मध्ये आपल्या नावा सकट प्रसिद्ध करू.
जाता जाता एक विनंती करतो, कृपया कविता वाचल्यावर आपले मत नोंदवा जेने करुन कवीला आपले विचार व भावना समजतील. या साईटला कवितां पुरते मर्यादित न ठेवता एक पावूल पुढे जावून अपना कड़े जर काही छान मराठी लेख असतील तर ते तुम्ही मराठी लेख या सेक्शन मध्ये पोस्ट करू शकता. Eg. Your own articles, News paper articles. Etc
आता इथेच विश्रांति घेतो, आपल्याला मी मराठी कविता वर भेटतच राहीन.
ही दिवाळी आपल्याला चांगली जावो ही सदिच्छा व आपण दिवाळीचा फराळ कवितांचा रुपात मराठी कवितां चा प्रेक्षकांना द्यावा हीच इच्छा.
धन्यवाद,
राहुल कुंभार व अनिल जाधव