नदी
ना बोलते ना हसते
एकट्यांसाठी क्षणभराची साथी बनते,
मिळेल ते घेऊन आणि असेल ते देऊन
सदैव आपली वाहत रहाते.
कधी उद्रेक करते
कधी मोकळीच बसते,
कधी खळखळ हसते
तर कधी अचानकच कोसळते.
ना दुर्गंधीची तक्रार
ना देण्याचा अधिकार गाजवते,
वाट अडविली तिची तरी
आपली दुसरी वाट शोधून जाते.
सदैव कार्यरत राहण्याचा बोध देते,
फक्त घेण्याऐवजी थोडे देण्याचाही संदेश खरा देवून जाते