विषय थोडा वेगळा आहे . पण मला मनापासून वाटले ते मी बोलतोय. इथे मराठी कविता या संकेतस्तळावर. खूप कवी रसिक आणि उदयोन्मुख कवी जोडलेले आहेत.
सगळ्यांच्या भावना एकच आहेत . तरीही असे खूप कमी आहे जे स्वतः कविता करून इथे पोस्ट करतात. आणि दुसर्यांच्या कविता टाकणारयाला पण दाद मिळतात,
त्यामुळे बहुदा खूप लोकांचा गैर समाज होतो की कवी कोण आणि कवी रसिक कोण. त्यामुळे जे खरच स्वतः कविता करतात त्यांचा मान राखून त्यांना या संकेतस्तळावर वेगळे पद द्यावे (जसे इथे Full मेम्बर, Jr . मेम्बर अशी पद आहेत). तर माझी कळकळीची विनंती आहे जे अधिकारक व्यक्ती आहे त्यांनी यावर विचार करावा, कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नाही. कदाचित हे बदल करायला काही तांत्रिक अडचणी असतील पण हे केले तर सर्व नव कवींना आनंद होईल. - हर्षद कुंभार