मृगाचे ढग जमू लागले, या खुल्या नभात
पहिल्यांदा पाहिले तुला, माझ्या दरात
"स्पर्श तुझ्या शब्दाचा"
वर्षाव झाला मजवर, सुगंध रात राणीचा...
सतत तुझ्या स्मरणात, दिन रात रंगली
प्रगतिच्या वाटेवर, यशाने साथ सोडला
"दे पाय अपयशाच्या मस्तकावरी" स्पर्श तुझ्या शब्दाचा
उज्वल यशाने वर्षाव झाला, मान सन्मानाचा...
उच्च शिक्षण घेत होतो, सावकाराच्या कर्जात
वडिलांच्या निधनाने झाला, आम्हावर आघात
" दे कुटुंबाला आधार " स्पर्श तुझ्या शब्दाचा
स्वप्नांतुन जाग येता, केला कड़े लोट भावनांचा...
रास्ट्रास गरज तुझी, वडिलांचे शब्द गूंजती कानात
वातानुकूलित नोकरी, का उतरावे रन मैदानात
" पुत्र तू या राष्ट्रदेवाचा " स्पर्श तुझ्या शब्दाचा
रानी नरसंहार केला, त्या परकीय शत्रुचा...
फिरुनी परत येता, मी आपल्या माय भूमित
दिसले नाही " स्फूर्तिस्थान " शुभेछ्यांच्या गर्दित
" यशवत हो, कीर्तिवंत हो " स्पर्श तुझ्या शब्दाचा
पाराजयातही सुखावलो, गळा सौभाग्य लेंन पाहता...
chan kavita