तू काही न बोलता
आज खूप काही कळले..
तुझे पाऊल जेव्हा
माझापासून दूर वळले...
मी झालो निशब्द
अन तू पाठमोरी निघून गेलीस..
आठवला तो दिवस
जेव्हा तू माझा जीवनात आलीस..
ती रम्य संध्याकाळ
अन ती पहिली घट्ट मिठी..
जणू वेल गुंतते वेलीत
अशाच मिलनासाठी..
हातात हात घट्ट होता
अन तो रातराणीचा सडा..
तो पसरलेला मंद सुवास
मंद सुवासात आपला जलद श्वास थोडा..
कसे विसरलीस तू हे सारे
जरा काहीसे आठवून पहा..
पण आज तुझे शेवटचे शब्द
'तू मला विसरून जा'..
आजही तशीच संध्याकाळ होती
अन रातराणीचा सुवास दरवळत होता
पण आज तोच सुगंध
माझा श्वासात गुदमरत होता
मी स्तब्ध त्याच झाडाखाली
जिथे तू पहिली भेटायला आलेलीस..
पण आज जाता जाता
रातराणीचा सडा पायाखाली तुडवून गेलीस..
-किरण पवार
http://kiranpawar0108.wordpress.com/
chan kavita
khup chan
thank you