गुंगीत राहतो सोंग करतो असेही
फरक नाही तसे जगण्याचा पडत काही....
दिन मुका रात्र अबोल तशीही
निरर्थक बडबडीचा फायदा तसा काही नाही...
प्रश्नार्थकी भाव दर्शविले तरीही
कसा काय कोणी कधी पुसित नाही.....
अस्थाव्यस्त क्षणाचा विस्कटलेला पसारा
पडेल आहे तरी कोणी आवरीत नाही .....
एकमेका अबोला करून कुठे फायदा काही
लालच रंग आहे रक्त वेगळे नाही.......
जळताना चितेवरी भाव वेगळे नाही काही
तुझी राख अन माझेहि वेगळे काही नाही..
.....मंदार बापट
far chan gajhal aahe mandaar....
Dhanyawad....bs praytn krt ahe kahi nwin krnyacha :)
chan mst.....
Thanks Sagar