Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: tejam.sunil@yahoo.com on December 06, 2012, 11:14:25 PM

Title: विरह त्या स्वप्नांचा
Post by: tejam.sunil@yahoo.com on December 06, 2012, 11:14:25 PM
खंत वाटते मनाला
मी आठवणीत हि उरलो नाही 
श्वासाचं काय घेऊन बसलोय
तिच्या मनात काय आहे हे पाहू शकलो नाही

दोन शब्दांच नात प्रेम
अन अजून दोन शब्द जोडून केला तिने " प्रेमघात "
उरलोच  नाही तिच्या आयुष्यात
तरी रडतो आहे तिच्या विरहात

खेळ मांडला होता स्वप्नाचा
साथ जन्म सात गाठींचा
दृष्ट लागली कुणाची नात्याला
अन क्षणात तुटलेल्या त्य स्वप्नाचा 

आता काहीच उरलं नव्हत 
फक्त उरली होती ती आठवण
मनाची वेदना मनात ठेवतो
मी अश्रूत करतो तिचे सांत्वन

@ सुनिल
Title: Re: विरह त्या स्वप्नांचा
Post by: केदार मेहेंदळे on December 07, 2012, 01:04:05 PM
kavitaa avadali pan "अन क्षणात तुटलेल्या त्य स्वप्नाचा" hyaat kaahi tari chukalyaa sarakh vatatay. 
Title: Re: विरह त्या स्वप्नांचा
Post by: niketan jadhav on December 20, 2012, 11:10:00 PM
kharach khup chan.....mi tuzya kavita mazya facebook. page var post karu shkto ka