सुखाचा शोध
गुढ काळोखाच्या अंती एक प्रकाश किरण
गुंजभर सुखासाठी किती आसूसते मन
मन लाचावते सुखा म्हणूनच दुःख होते
सुख मागता मागता दुःख समोर ठाकते
दुःख पचवले ज्याने सुख होई त्याचा दास
दिन रजनी दोन्हीचा एका गगनी प्रवास
जसा दिवस संपतो, सरे रात्रीचाही काळ
अरे दुःख आणि सुख सारा मनाचाच खेळ
kavi shrikul (sachin kulkarni)