बलात्कार माणुसकीचा
जन्मला जेथून, उद्धार केला त्यांचा
नसे संयम ज्यास तो मर्द न खरा
धिक्कार असो या अश्लाघ्य वर्तनाचा
हा तर बलात्कार माणुसकीचा
ह्यांच्या परिस जनावरे बरी
कुठे हरवली आज माणुसकी?
धिक्कार असो ह्या लांडग्यांचा
हा तर बलात्कार माणुसकीचा
कामुकतेच्या अधिरतेची मनोविकृती
मर्द नाही जो करे अशी हि कृती
धिक्कार असो ह्या नामर्दतेचा
हा तर बलात्कार माणुसकीचा
जनावरांहून बत्थर हि वृत्ती
सदैव असे वासना हि चित्ती
धिक्कार असो ह्या नपुंसकतेचा
हा तर बलात्कार माणुसकीचा
~प्र. रा. पासे~
:(
balatkaar he napusankatech lakshan aahe..
Khara ahe kedarji
manasa manasa kadhi hoshil manus...