माझं नेहमी असंच का होतं
मन तुझ्यात गुंतुन का राहतं
चांदन्यांनी भरुन सुदधा
आभाळ जसं रिकामं राह्तं
तुझी स्वप्न रोज येतात
डोळ्यांमध्ये अश्रु देतात
तरी सुदधा असं का होतं
मन रात्रीची वाट पाहतं
कधी मला उगाच गहिवरते
तुलाच आठवत मन हे झुरते
तरी पुन्हा असे का घडते
काळीज तुजसाठीच धडधडते
व्यर्थ हे सारे मला समजते
कळते पण ते कधी ना वळते
तुझी लत ही मोहीनी समान
कधी ना सुटे त्यातुन मान
तुच श्वास आणी तुच प्राण
दोन असु पण एकच जान
शेवटी तु जवळ नसली तरी
का प्रत्येक श्वासात तुझा सुवास
गणेश शिवदे