लिहायचे कुणासाठी
लिहायचे कश्यासाठी
शेवाळल्या तळ्याकाठी
जड जड झाली दिठी
सुकलेल्या पानावरी
उदासली सांज सारी
मनातली अक्षरे ही
मनाआड गेली सारी
वेदनांत मरतांना
वेदनांचे गाणे झाले
ऐकतांना दूर कुठे
कुणा डोळी पाणी आले
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
chan ahe kavita..
विक्रांत
छान कविता
त्या आसवांची शाई अन
वेदनांचे शब्द झाले
लिहायचं कुणां साठी
मनी एक नावं आले....
dhanyvaad kedar, prashnt