केव्हातरी........
केव्हातरी तू मला समजून घेशील
आणि त्या क्षणाची मी वाट पाहिन
कदाचित तेव्हापण उशीर झाला असेल.....
तरीपण आनंद माझ्या हृदयास होईल.
केव्हातरी तूला समजेल कि
तू माझ्यासाठी काय होतास ते
कदाचित तेव्हापण मी नसेन तुझ्या आयुष्यात......
तरीपण समाधान माझ्या मनास होईल.
केव्हातरी आपली भेट होईल आणि समजेल तुला कि
कशी जगत होते मी तुझ्यावाचून ते
कदाचित तेव्हापण तू माझा नशील......
तरीपण तुला पाहून तृप्त माझे डोळे होतील .
केव्हातरी तूला समजेल
माझ तुझ्यावरच प्रेम
कदाचित तेव्हापण उशीर झाला असेल......
तरीपण शांती माझ्या आत्म्यास लाभेल .
अक्ष....
gr8
केव्हातरी तूला समजेल कि
तू माझ्यासाठी काय होतास ते
कदाचित तेव्हापण मी नसेन तुझ्या आयुष्यात......
तरीपण समाधान माझ्या मनास होईल.
केव्हातरी आपली भेट होईल आणि समजेल तुला कि
कशी जगत होते मी तुझ्यावाचून ते
कदाचित तेव्हापण तू माझा नशील......
तरीपण तुला पाहून तृप्त माझे डोळे होतील .
kharach kevhtari asa hoil...mast ahe kavita
thank you Kedarji & Preetiji :)
केव्हातरी तूला समजेल
माझ तुझ्यावरच प्रेम
कदाचित तेव्हापण उशीर झाला असेल......
तरीपण शांती माझ्या आत्म्यास लाभेल .
khupch chaan ahe kavita...!
thank you...