जुन्या जखमा जरा कुठे खपली धरत होत्या
नी तु पुन्हा नवीन जखम दिली
आता रक्त घळघळुन वाहीलं नाही
पण" दर्द" पुर्वीपेक्षा जास्त राहीला
तेवढीच मी जिवंत असल्याची जाणीव
आता औषधांची गरज उरली नाही
मनाच्या जखमांना ते लावणार तरी कसे
हळुहळु मनाला समजावु लागलो
आणी तुला माफ करत राहिलो
जखमा सोडुन उरलेलं शरीर शोधणं अवघड आहे
तुझ्या शब्दांची धारच वेगळी आहे
ते जखमा करतात न दिसुन येणा-या
आणी वाचवतात औषधपाण्याचा खर्च
तुझे घाव कधी पुर्णपणे मारत नाहीत मला
ते जिवंत ठेवतात तुझ्या आठवणीत
क्षणोक्षणी मरण्यासाठी
-गणेश शिवदे
irshaad! irshaad!
:D thanks kedar sir
सुंदर कविता..
शेवटच्या ओळी खुप छान आहेत...!
khup chan...