वार्धक्यांतील एकांतात
स्मृतिंना उजाळा येतो
तारूण्यांतील इतिहास
प्रथम डोळ्यांसमोर येतो ।
शूरत्वाचे क्षण काहीं
पटापट जोडले जातात
कुणालातरी मोठ्याने
सारखे सांगावेसे वाटतात ।
गंमतीदार प्रसंग काहीं
उगींच मनां हंसवितात
चॉकलेटच्या गोळी परि
ते सारखे चघळले जातात ।
धूंद अशा त्या प्रीतिचे
क्षण जेव्हां मनीं येतात
वार्धक्यांतही अंगावर
रोमांच पुन्हां उभे रहातात ।
शिथिल झाल्या गाञांना
जेव्हा त्याची आठवण येते
स्वैर अश्या धुंदीत
पुन्हां जगावेसे वाटते ।
स्मृतिंच्या सान्निध्यात
मन जरी तरुण होते
शिथिल शरीर माञ
त्यासंगे न धांवू शकते ।
पुष्कळ दुःख जीवनात जरी
अनुभवास आले असले
तरी सुखाच्या क्षणांचीच
मनीं फक्त आठवण होते ।
वार्धक्यांत स्मृतिंना त्या
आगळाच रंग येतो
एक एक आठवणींचा हार
मनीं गुंफला जातो
रविंद्र बेन्द्रे
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/01/blog-post_12.html
http://www.kaviravi.com/2013/01/blog-post_12.html
chan kavita