सडा रक्ताचा..!
---------------------
कसे दार उघडे पडलेत
अंगणात हया सडा रक्ताचा
सापडलेत..!!
अनमोल हे थेंब थेंब तयाचे
रक्तालाही आज पाण्यासमान मोजले
न राहीला बंधुभाव
पैस्यांचेच आहे नाते ईथे
पैस्यांसाठीच विकतात
पोटच्या लेकी ही ईथे
डोळयांत मत्सर अन लोभच दाटलेत तयांच्या
नको रे दाखवु द्रौपदी पुन्हा ईथे
पाहुनी सारे हे आमुची मान ही आज पैस्यांखाली वाकलेत
रक्तांचे थेंब आज पाण्यासारखे वाहलेत....
कसे हे दार उघडे पडलेत....
नयनांनी हया आज असुरांचेच युग पुन्हा पाहीलेत...
रक्ताचा सडा आज अंगणात सापडलेत..
जन्म दिला ज्या मातेने
तिच्या सुखाला आज दुष्काळाने घेरलेत
अन्नसाठी हिंडताना पायातुनी रक्त घामासारखे पडलेत..
डोळयांतुन आज तिच्याही
रक्तच फक्त वाहलेत..
कसे दार उघडे पडलेत
अंगणात हया सडा रक्ताचे सापडलेत.... !!
-
© प्रशांत शिंदे
२३/०२/१३