"ह्योच नवरा पाह्यजे" ह्या सिनेमातील श्री दादा कोंडके यांनी लिहिलेली , राम लक्षुमण यांनी स्वरबध्ध केलेली आणि सौ उषा मंगेशकर यांनी गायलेली "आला थंडीचा महिना" ह्या लावणी वरून रचलेली हि "आला गर्मीचा महिना" हि लावणी.
मुळ लावणीतला इरसाल बाज तसाच ठेवायचा प्रयत्न केला आहे. पण तो खूप जुना काळ होता. तेंव्हाच्या इरसाल पणाच्या कल्पना आणि आताच्या फार वेगळ्या आहेत. म्हणून इरसाल पाणा जरा जास्त वाटू शकेल. तरी कृपया ह्याला अश्लील म्हणू नये. हे मुळ लावणीच विडंबन हि नाहीये. चाल आणि इरसालपणा मात्र तोच आहे. म्हणून हे गाणं 'विडंबन कवितेत' न पोस्ट करता 'शृंगारिक कविते' पोस्ट करत आहे.
आला गर्मीचा महिना
झटपट मळा ह्यो भिजवा
अंगी पेटलाय वणवा
अंगी पेटलाय वणवा
उसाचा दांडा कुनी चोखवा
कोवळ्या अंगावर पेटलीय
नाजूक जवानीची ज्वाळ
गर्मी सहन होईना
अंगात उठलाय जाळ
धनी गेलेत गावाला(ढूम ढूम ढूम ढूम ढूम)
धनी गेलेत गावाला
सोबतीला कुणी बी नाय
असा एकटीनं मांडलाय
श्रींगाराचा ह्यो डावं
आग विझं ना बाई गं गंगंगंगंगंगं
आग विझं ना बाई गं
पावण्याला निरोप पाठवा
अंगी पेटलाय वणवा
अंगी पेटलाय वणवा
उसाचा दांडा कुनी चोखवा
आला गर्मीचा महिना
झटपट मळा ह्यो भिजवा
अंगी पेटलाय वणवा
अंगी पेटलाय वणवा
उसाचा दांडा कुनी चोखवा
गोर्या अंगावर ओढलय
गुलाबी शिलिपच जाळं
द्या सोडून भीडभाड
करा कि मार्दाच काम
घ्या पुढ्यात मजला(ढूम ढूम ढूम ढूम ढूम)
घ्या पुढ्यात मजला
कुरवाळा कि गोरं अंग
ज्वानी मुळं झालया
एकटीला अवघड झोपणं
लई दुखतया अंगगगगगग
लई दुखाताया अंग
खात्रीचा उपाय घडवा
अंगी पेटलाय वणवा
अंगी पेटलाय वणवा
उसाचा दांडा कुनी चोखवा
आला गर्मीचा महिना
झटपट मळा ह्यो भिजवा
अंगी पेटलाय वणवा
अंगी पेटलाय वणवा
उसाचा दांडा कुनी चोखवा
का ओ घाई पावणं
किती तुम्हा थांबवावं
असं किती चालायचं
अंगाला अंगांनी झोंबण
रात्र बाकी अजून बी(ढूम ढूम ढूम ढूम ढूम)
रात्र बाकी अजून बी
तुमच्याच साठी हि खासं
पाया पडते मी तुमच्या
जरासं थांबवाल का वो
लई उडतया पाखरूरूरूरूरूरू
लई उडतया पाखरू
जरासं थोपटून निजवा
अंगी पेटलाय वणवा
अंगी पेटलाय वणवा
उसाचा दांडा कुनी चोखवा
आला गर्मीचा महिना
झटपट मळा ह्यो भिजवा
अंगी पेटलाय वणवा
अंगी पेटलाय वणवा
उसाचा दांडा कुनी चोखवा
अंगी पेटलाय वणवा
आई गं!
केदार....