Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: Madhura Kulkarni on March 04, 2013, 03:11:34 PM

Title: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 04, 2013, 03:11:34 PM
रेशमी अनुबंध हे अन
अबोल साऱ्या भावना
शब्दांत त्या मांडू कशी
वेड्या मना मज सांग ना.....
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on March 04, 2013, 03:58:02 PM
घे समजूनी सख्या रे
मूक भावना नजरेतल्या 
उधळते  तुजवरी सख्या रे
कळ्या अबोल प्रीतीच्या  :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 05, 2013, 12:56:41 PM
रात्र आज एकटी
चंद्रा लागता ग्रहण
रातकिड्यांचे किरकिरणे
करते ती श्रवण .....
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on March 05, 2013, 04:21:50 PM
लपुनी ढगा आड तो
हळूच बघतो ............................वसुंधरेला
भासे तिला जणू लपला ..............चंद्र
ढगांत बनून कृष्ण सावळा  
 

केदार.... :)
Title: Re: चारोळी
Post by: swapnil nagre on March 05, 2013, 05:03:03 PM
beuty ful poem
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 06, 2013, 04:36:23 PM
swapnil nagre, Thanks!
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 06, 2013, 04:37:59 PM
Kedar dada,
आता माझ्या ओळी.

पांघरून हिरवळ भवती
चंद्राला म्हणते धरती
आकाशीचा थाटलेला
खोटा तुझा साज
दिवसा मात्र विरून जातील
चांदण्या धोकेबाज
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on March 07, 2013, 12:38:18 PM
चांदण्या झुरती चंद्रा साठी
चंद्र झुरतो  पृथ्वी साठी
चांदण्यांवर पृथ्वीचा आकस
चंद्र बिचारा  पृथ्वीसाठी बेबस

केदार....
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 09, 2013, 03:38:58 PM
वाह...वा!

झाडाच्या सावलीत धरती,
पांघरून हिरवळ वरती,
चंद्राला बघ म्हणते,
का घालतोस घिरट्या भवती?

:D
Title: Re: चारोळी
Post by: Amey Sawant on March 09, 2013, 11:07:58 PM
mast jamli ahe pangat (y)
Title: Re: चारोळी
Post by: Amey Sawant on March 09, 2013, 11:09:11 PM
शरदाचं चांदणं !!

विचारांच्या अंधारात चांदोबाला शोधणं...

तो गवसला कि एकटक त्याला पाहणं !!!

अचानक जाग येताच, फुटक्या चेश्म्याने परत चाळणं...

ते मनात भरलेलं, शरदाचं चांदणं !!!

................................................amu♥♥♥ - प्रेरणा - संदेश प्रताप, AAM

Wednesday, 18 April 2012
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 10, 2013, 03:31:40 PM
अमेय दादा, स्वागत आहे आमच्या कवितांच्या भेंड्यांमध्ये.

चांदण नभीच,
पाण्यात उतरल,
वाहुनिया आल

माझ्या ग घागरीत.....

शोधे चांदण्यांना
चंद्र हि वरून,
पाहतो डोकावून

माझ्या ग घागरीत......
Title: Re: चारोळी
Post by: Amey Sawant on March 10, 2013, 07:41:24 PM
पाहतो डोकावून

माझ्या ग घागरीत......mastach :)
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on March 11, 2013, 01:23:29 PM
उजळत्या पूर्वेची
चंद्राला भीती
बघून घेतो पृथ्वीला
सूर्य यायच्या आधी  ::)


केदार...............
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on March 11, 2013, 01:27:32 PM
mdhura

tujyha ghagritlya chandanyanvarun ek kavita suchali aahe. udya post karin.....
ani chandr pruthvi varchya tyjhya charolicha reply kasa vatala te kalav. :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 11, 2013, 02:34:20 PM
अमेय दादा,

धन्यवाद!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


केदार दादा,

तुला माझ्या ओळींवरून काही दुसऱ्या ओळी सुचतात, म्हणजे म्हणजे माझ्या कविता तुला आवडतात. त्या बद्दल धन्यवाद!
बाकी तुझ्या चंद्र आणि पृथ्वी वरच्या ओळी कश्या झाल्यात, हे सांगायची गरजच नाही.........पण तरीही, तू विचारलस म्हणून...... "झक्कास"!
Title: Re: चारोळी
Post by: Amey Sawant on March 12, 2013, 07:29:39 AM
kedar ji..mastach ahe...chan kalpana
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 12, 2013, 06:15:19 PM
अमेय दादा,

भेंड्या सुरु ठेवूयात.


बाण शब्दांचे
खोल रुतले उरी
डोळ्यांतूनी
बरसल्या सरी
Title: Re: चारोळी
Post by: Amey Sawant on March 13, 2013, 06:30:38 PM
शब्दांनी गुंतवलं,
विचारांनी थकवलं !
पुढे जगायचं,
म्हणून स्वतःला बदललं !!-amu♥♥♥

Wednesday, 13th March 2013.
Title: Re: चारोळी
Post by: akash raut on March 13, 2013, 08:51:28 PM
premat ase ka ghadate,
kuni padate ,kuni adakhalate,
chahul manachi khoti,
fasavihi jadu karate.

@xs........ :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 14, 2013, 03:19:31 PM
Amey Sawant,  आणि akash raut,
वाह, वाह, बंधू हो! मस्त राव!

आता माझी......

प्रेमात पडताना
सावरता आले नाही,
वाहत गेले मन हे
आवरता आले नाही.......
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on March 14, 2013, 04:44:50 PM
प्रेमात नुसतं पडायचं असतं
विचार न करता
वहात जायचं असतं
...........................सावरायचं नसतं
...........................अन आवरायचं नसत





केदार....
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on March 14, 2013, 04:47:58 PM
अमेय, मस्त.....आता माज्या ओळी......

शब्दांशीच आता खेळायला लागलो
शब्दांमधेच आता रमायला लागलो
हसत हसत जगायचं म्हणून
शब्दांमधूनच व्यक्त व्हायला लागलो   


केदार....
Title: Re: चारोळी
Post by: Amey Sawant on March 14, 2013, 06:14:12 PM
Madhura ji....chan vyakta kartat thumi kami shabdat (y)
Kedar ji....charoli la charolit response mast dilat..khup chan (y)
ani Akash ji....everlasting kavita....khup khup chan :)
tumha sarvanna dhanyawad, mala parat shabdat adakavnyasathi :)...

2 words : prem, मन

प्रेम म्हणजे...

प्रेम म्हणजे, तू येण्याची चाहूल
तूला समजण्याची केलेली नकळत भूल
मनात सजवलेलं गुलाबाचे फूल
डोळ्यात पाहिलेलं स्वप्नांचे संकूल
हृदयात बाळगलेलं आईचे मूल
तुझ्या नी माझ्यात बांधलेलं विश्वासाचे पूल

प्रेम म्हणजे सर्व काही...
तू नसलीस की काही नाही !!!
..............................amu♥♥♥

Wednesday, 16 January 2013
Title: Re: चारोळी
Post by: Amey Sawant on March 14, 2013, 06:19:06 PM
just jamli :P

घाबरट मन

अजूनही हिम्मत नाही,
मन व्यक्त करण्याची !
फक्त वाट पाहतो,
ती आयुष्यात येण्याची !!-amu♥♥♥
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on March 15, 2013, 12:15:00 PM
ती हि पहात असेल वाट
तू विचारण्याची
पुढाकार घ्या कोणीतरी
नाहीतर गोची होईल दोघांची


केदार..... ;) :) ;)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 15, 2013, 03:10:23 PM
मस्त मजा येते राव..... कवितांच्या भेंड्या खेळताना.


अमेय दादा,
मस्त रे.....काय कविता करतोस!

"मी एकटा कुठे आहे?"

तुझ्या मोहक आठवणींचा सुगंध.........     सोबतीस माझ्या !   
मनी जपलेले ते रेशमी बंध........        सोबतीस माझ्या !

तुझ्या न माझ्या प्रीतीचे अनुबंध.....    सोबतीस माझ्या!
तुझ्यामुळे सारे मज जडलेले छंद......    सोबतीस माझ्या!
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on March 15, 2013, 04:59:32 PM
तू नसताना
तुझ्या आठवणी सोबतीस माझ्या
तू नसताना
तो चंद्र सोबतीस माझ्या
.........................................मी एकटा कुठे आहे?
........................................तू नसताना
........................................तो एकटेपणाच सोबतीस माझ्या 
Title: Re: चारोळी
Post by: Amey Sawant on March 15, 2013, 06:06:13 PM
Kedar ji....just jamavli......reality ahe :P

नाही तीचे काही हाव भाव,
मी मात्र करतो तीच्यापाठी धावाधाव !
नशीबाने होते आमची भेट,
नाहीतर होतो जीवावर घाव !!-amu♥♥♥
Title: Re: चारोळी
Post by: Amey Sawant on March 15, 2013, 06:10:32 PM
Madhura.....tuzya kavitela milte julti...me banavleli kavita......kharach..tiche shabda hote he :) me kavitet mandle...

तुझे शब्द ♥मला मिठीत घे♥

तुझ्या कोमल हृदयाची चाहूल,
माझ्या हृदयाला ऐकूदे...
मला मिठीत घे !

तुझ्या श्वासात अडकलेला माझा जीव,
तसाच राहूदे...
मला मिठीत घे !

तुझ्या प्रेमाचा सहवास,
असाच आयुष्यभर मनात बाळगुदे...

मला मिठीत घे !!!
मला मिठीत घे !!!
..............................amu♥♥♥

Saturday, 7 July 2012
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on March 16, 2013, 03:35:37 PM
श्वासात श्वास अडकला होता

जेव्हा स्पर्श तुझा झाला होता

अव्यक्त होता हा भाव

यालाच प्रेम म्हणतात का राव?
 
Title: Re: चारोळी
Post by: Amey Sawant on March 16, 2013, 06:15:33 PM
mastach predeep rao....swaghat ahe tumcha
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on March 17, 2013, 06:40:40 PM
Dhanyawad ameyji

Madhura didichya "RAV" ya shabdawarun suchalelya ya char oli.

Thanks once again
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 18, 2013, 02:34:18 PM
Prajdeep, स्वागत आहे.....


सारेच वाटे नवे नवे मज
आज काहीसे अनोळखी का......
जाणते ती रातराणी,
लाजते मी सारखी का?
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on March 18, 2013, 08:07:35 PM
धन्यवाद मधुरा दी ! :)
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on March 18, 2013, 08:15:35 PM
लाजू नकोस अशी तू
लाजेल चंद्रही तुला बघून
वेडा होईल तोही तुझा
बघेल सारखा ढगा आडून लपून लपून ...............

;)  :D
Title: Re: चारोळी
Post by: Amey Sawant on March 18, 2013, 08:17:19 PM
vooooovuuuu.....mastach pradeep ji (y)
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on March 19, 2013, 09:18:18 AM
धन्यवाद अमेयजी
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 19, 2013, 01:49:03 PM
मस्त रे प्राजदीप.....

नदीत पडले
चांदण्यांचे प्रतिबिंब,
नाही पाऊस तरीही
झाले कशी ओलीचिंब?
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on March 19, 2013, 08:18:38 PM
धन्यवाद मधुरा दी  :)
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on March 19, 2013, 08:30:15 PM
पाणी नव्हतेच ते

होता तुझ्या मिठीचा ओलावा

जाणवतोय अजूनही

सांग मी कसा विसरावा .........


:) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on March 20, 2013, 10:08:37 AM
 :) :) :) :) :) :) :) :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 20, 2013, 01:33:19 PM
लाट उसळली पुन्हा एकदा,
भिजला सागर पुन्हा नव्याने
वेग तिचा, आवेग तिचा हा
तिजला सावर पुन्हा नव्याने......
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on March 20, 2013, 01:39:28 PM

लाट अशीच उसळती राहू दे!
वेग तिचा असाच कायम राहू दे!

तुझ्या ओळी आवडल्यात!
मिलिंद कुंभारे


Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 20, 2013, 01:44:15 PM
Thanks.....
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on March 20, 2013, 03:44:07 PM
सावरू कसा मी

तुझ्या आठवणींच्या लाटांमधून 

बुडून जावेसे वाटते

तुझ्या हृदयरूपी सागरामधून ............
;)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 20, 2013, 10:58:33 PM

पत्र का लिहितेस तू?
मी वाचतो डोळे तुझे
अडकून हि मी मजेत का?
हे प्रेमाचे जाळे तुझे.....
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on March 21, 2013, 10:59:19 AM
kon mhnat ithe nav kavi aahet..... :)
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on March 21, 2013, 12:04:56 PM
बघितले मीही डोळ्यात तुझ्या

प्रेमाच्या सुंदर अदा

प्रेम करतेस माझ्यावर

मग म्हणतेस का ग दादा
 

;) :D ::) :P
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 21, 2013, 01:35:48 PM
बापरे ! हि चारोळी काही पटली नाही मनाला.......

भावनांचे मोल हे
अनमोल रे....
हृदयी घुसले
बाण बनुनी बोल रे......
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on March 21, 2013, 03:43:43 PM
मधुरा, अमेय, प्रजदीप

आपल्या सगळ्याच्या चारोळीतून काही न काही घेऊन हा सल्ला देतोय. Be a sport.


चाला आता
जरा जपून रे
निसरड्या वाटेवरी
केळ्याचे साल रे

दिसती इथे ना
डोळे कुणाचे
शब्दांतुनी उमगती ना
भाव मनीचे

आकाशातले चांद तारे
जळा मधुनी घागरीत येउं दे
उसळत्या लाटा, भिजला सागर
मनातल्या मनातच राहू दे

शब्दांशी आता पुन्हा खेळा रे
लिहा चारोळी नवीन आता रे
चुकले वळण चारोळीचे इथे रे
तिजला सावर पुन्हा आता रे

केदार.......
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 21, 2013, 04:10:39 PM
केदार दादा,
तुला माहीतच आहे कि आपण सर्व जण एकमेकांना मनापासून बहिण-भाऊ मानतो. आपल्या कविता मात्र तश्या खऱ्या किव्हा मनापासून नसतात.....म्हणून जेव्हा प्राजदिपच्या चारोळ्या जेव्हा चुकीचा अर्थ घेऊन पुढे आल्या तेव्हा वाईट वाटल. पण ठीक आहे....तो लहान आहे अजुन....सोडून देऊया.
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on March 21, 2013, 04:13:08 PM
mhnunach mi hi charoli lihili..... chalta hai.....age badho :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 21, 2013, 04:16:49 PM
चल, अंताक्षरी चालू ठेवते मी....आणि तू हि चालू ठेव.

पुन्हा पुन्हा जगते ती 
तिचं रात्र वादळी...........
येते कशी जुळुनी पुन्हा 
आठवणींची साखळी

Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on March 21, 2013, 04:59:39 PM
वादळी रात्री नंतर
पहाट निरव शांत
भिजलेल्या मिठीत चूर
शांत, क्लांत गात्र  :)

केदार............
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on March 21, 2013, 05:17:38 PM
मिस मधुरा जी आपल्या कविता आणिक चारोळ्या खरच छान आहेत.... अपेक्षा आहे आम्ही ही भेंड्यामध्ये सहभागी
होउ का ??   :)
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on March 21, 2013, 06:24:34 PM
कवितांची मजा घेत लिहिली होती चारोळी

का खुपली लोकांना माझी चारोळी

पटकन यमक जुळले

आणि लिहिली होती चारोळी
  :(
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on March 21, 2013, 06:32:59 PM
मधुरा दीदी तुझ्यासाठी


स्वर्गापालीकाडले नाते आपले

एका भाऊ आणि बहिणीचे

नको लाऊ चुकीचे अर्थ

माझ्या त्या चारोळीचे
 
Title: Re: चारोळी
Post by: Amey Sawant on March 21, 2013, 09:22:31 PM
hummmmm
Title: Re: चारोळी
Post by: Amey Sawant on March 21, 2013, 09:31:30 PM
ek chotasa savvnvad zalela...me ani mazya ek frnd madhe....post karu iichitoo............

Note : ithe me konacha name specify nahi karat ahe. konachya bhavannana haani nahi karat ahe @admin

Sucha ::

काल रिम झिम पडणा-या पावसाने,
अंगण माझे भिजून गेले..
डोळ्यातून निसटलेले अश्रूं सारे,
पावसाने एका क्षणात वाहून नेले....♥

amu::

पावसाळा काय, उन्हाळा काय...
आज आहे, उद्या नाही !
माझ्या डोळ्यातील आश्रू मात्र...
कायमचे राही !!!
............................ amu♥

Tuesday, 19 June 2012
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on March 22, 2013, 09:32:08 AM
अश्रून मधले भाव माझ्या

समझून घेतले नाही कोणी

वाहत डोळ्यातून असताना

पुसायला मात्र नाही कोणी  ................


:(
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 22, 2013, 01:47:31 PM
कविवर्य - विजय सुर्यवंशी.,
नक्कीच तुम्ही सामील होऊ शकता. स्वागत आहे.
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on March 24, 2013, 02:45:32 PM
@praajdip:
शब्दांशी खेळताना भावना सांभाळ रे.....
यमक जुळले म्हणून कविता लिहिणे तू टाळ रे.......
Title: Re: चारोळी
Post by: sylvieh309@gmail.com on March 24, 2013, 02:52:09 PM
hmmm na boltahi khup bolata yet  ;D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on March 29, 2013, 04:13:39 PM


शब्दांच्या या खेळात ,,,
शब्द्च  बोलुन जातात .....
वेडया त्या भावना मग...

नाती तोलुन जातात...

         कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 02, 2013, 03:37:50 PM
आरश्यात जेव्हा मी छबी न्याहाळत होते....
प्रतिबिंबाऐवजी मी तुजला पाहत होते.....
हसले गाली मी पण कळी तुझीच खुलली,
कितीवेळ मी तुजला पाहून लाजत होते......
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 02, 2013, 03:39:45 PM
kya baat! apratim! :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 02, 2013, 03:40:51 PM
धन्यवाद! तुझीही होऊन जाऊ दे कि एक चारोळी....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 02, 2013, 03:46:28 PM


हि चारोळी खास तुझ्या आग्रहास्तव!!!!!!!!!!! :) :) :)

बेधुंद :)

बेधुंद मी, बेधुंद तू;
बेधुंद सारी पानें फुलें;
अन,
बेधुंद वाहती भन्नाट वारे:
सांग सखी, मी छेडू कसे;
तुझ्या प्रीतीचे तराणे! :)

मिलिंद कुंभारे :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 02, 2013, 03:55:34 PM
ती चारोळी आवडली नाही का, मधुरा ताई ???
तर पुन्हा एक चारोळी खास तुझ्या आग्रहास्तव!!!!!!!!!!!

स्तब्ध

स्तब्ध मी, स्तब्ध तू;
स्तब्ध सारी रानें वने;
अन स्तब्ध ते
नदीचे हिरवे किनारे;
प्रिये, तुज सांगू कसे;
मी, गुज माझ्या मनीचे!

मिलिंद कुंभारे
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 02, 2013, 03:59:22 PM
मला आवडली चारोळी पण इंटरनेट थोडावेळ बंद होत म्हणून रिप्लाय द्यायला वेळ लागला.

गोठले सारे कसे बघ,
गारवा हा छेडतो.....
डोळ्यात अजुनी झोप हि
क्षणात एका मोडतो....
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on April 03, 2013, 12:27:56 AM
आजकाल काही सुचत नाही

शब्द माझे जुळत नाही

लिहायचे आहे बरेच काही

पण हात पुढे सरसावत नाही
:(
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 03, 2013, 09:24:04 AM
Dear praajdeep!

khupach chan charoli lihilis! :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Yogesh9889 on April 03, 2013, 05:34:14 PM
khup chan jugal bandi suru aahe... :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 03, 2013, 08:25:04 PM
कळीचे फुल होतांना हवा आधार वेलीचा....
जरासा स्पर्श मायेचा, जिव्हाळा गार मातीचा.....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 04, 2013, 09:09:22 AM
प्रिय मधुरा ताई!!!! :) :) :) :) :)
अप्रतिम ओळी आहेत!
खूपच आवडल्यात!!!!
मिलिंद कुंभारे  :) :) :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 04, 2013, 09:25:26 AM
प्रिय मधुरा ताई!!!!
तुझ्या दोन ओळींना;
माझ्या चार ओळी!
बघ तुला आवडतात का?


कळतच नाही;
हरवतो कुठे;
गंध ओल्या मातीचा;
अन केव्हा संपतो;
पावसाळा!

आता ग्रीष्म;
आयुष्याला चिकटलेला;
मंजिल जवळ असताना;
रस्ता मात्र लांबलेला!

तरीही तो मात्र आसुसलेला;
जणू
कित्येक दिवसांचा तहानलेला;
पुन्हा एकदा
त्याच पावसात चिंब भिजायला!
शोधीत पुन्हा
हरवलेला गंध तो ओल्या मातीचा!

मिलिंद कुंभारे :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 04, 2013, 02:09:27 PM
मिलिंद दादा,
मस्त! खरच छान!

ओल्या ओल्या मातीमध्ये
रुजले रे बघ माझे मन,
अंकुर तयाला फुटताना,
फुलले रे बघ सारे वन
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on April 04, 2013, 05:27:41 PM
आठवणीँचा हा खेळ रंगला.....
नात्यांचा तो दुरावा आज संपला.....
स्पर्श तुझा सखे अलवार तो.....
जणु मी जाहलो दवांनी ओला.....
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 04, 2013, 05:51:48 PM
ओलावा दवाचा,
फुलपानावर,
झेलत अंगावर
पावसाची सर.....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 06, 2013, 10:26:04 AM
(http://img43.imageshack.us/img43/994/anubandh.jpg)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 06, 2013, 02:03:24 PM
हृदयावरचे ते
खोल होते घाव....
प्रेमात बुडुनहि
पार पडली जीवनाची नाव.....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 06, 2013, 02:09:33 PM

अनुबंध

रेशमी अनुबंध ते,
क्षणभंगुर कासेच जाहले,
वेड्या मना आवरू, सावरू कसे,
काळजाचे रे झाले, तुकडे-तुकडे!

मिलिंद कुंभारे  :( :( :(
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 06, 2013, 05:07:54 PM
मस्त रे मिलिंद दादा!

माझ्या त्या दोन शब्दांना त्याच जागांवर ठेवून,
जी चारोळी केली आहेस, ती अप्रतिम आहे.


आता माझ्या चारोळी...

तुकडे वेचून घे,
सांडू नको कुठेही
वेड्या मनाच्या भावना
मांडू नको कुठेही....
Title: Re: चारोळी
Post by: कौस्तुभ (मी शब्दवेडा) on April 07, 2013, 06:27:43 PM
Nice
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 08, 2013, 03:55:34 PM
धन्यवाद कौस्तुभ !
Title: Re: चारोळी
Post by: Yogesh9889 on April 09, 2013, 10:43:42 AM
Ek chota sa payatn mi hi karun pahila,
kahi chuka aslyas kalvave...

Mazya manatil gondhal,
tuzya manatil shantata olakhu pahi,
aani maze hruday,
tuzya mukhatun yenara hokarachi vaat pahi...

Yogesh Kadu
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 09, 2013, 11:30:38 AM
योगेश छान प्रयत्न आहे!
तुझ्या चारोळी वरून सुचलेली ही एक चारोळी!
बघ तुला आवडतेय का!! :) :) :)

मन वेडे माझे, उंच उंच उडती;
तुझ्याच मनीच्या
त्या शांत बेटावरती, येउन विसावती!
हृदय वेडे माझे, असे का धडधडती;
जणू तुझ्याच मिलनाची
आतुरतेने वाट  पाहती!


मिलिंद कुंभारे  :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Yogesh9889 on April 09, 2013, 12:35:59 PM
Milind dada... Khup mast aahe tumchi charoli...
awadli mala... :)
.
mala tumchya itk kavyatmak lihayla suchat nahi...
tari mi prayatn kart asto...
.
aaple molache margdarshan amchya sathi mahatvache aahe...
dhanyawad...
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 09, 2013, 02:44:18 PM
प्रयत्न चांगला होता योगेश.

तुझे आमच्या कवितांच्या भेन्ड्यांमध्ये स्वागत....

आता माझ्या चारोळी....

मनातले प्रेम वाहे दुथडी भरून....
तयापुढे अमृताची गोडी जाईल विरून...
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 09, 2013, 02:52:54 PM

मनातले प्रेम
मनातच का थांबले?
ओठांवरती आले असते
गोडी त्याची जाहली असती
अमृतापारीही गोड गं!

मिलिंद कुंभारे  :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 09, 2013, 03:17:19 PM
घ्याव्या भावना जाणून,
फक्त डोळ्यांतून,
नयनांची हि भाषा,
नसते दाखवायाची बोलून....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 09, 2013, 03:25:27 PM
तुजकडे पाहता
तुज नयनात
मी हरवतो!
तुला नकळत
तुझ्या प्रीतीचा
गोडवा मी चाखतो!
:) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on April 09, 2013, 03:25:40 PM
बोललेल्या शब्दांचे
अर्थ असतात फसवे
नजरेच्या भाषेला
नसतात आड पडदे 

केदार ....
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 09, 2013, 03:34:29 PM
वाह! केदार दादा, मस्त!
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 09, 2013, 03:36:33 PM
डोळ्यांवरच्या पाकळ्यांना मिटून स्वप्ने बघू जरा....
स्वप्नांना त्या जगवण्यासाठी थोडे कष्ट करू जरा...
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on April 09, 2013, 05:28:07 PM
(http://i45.tinypic.com/3449wso.jpg)
Title: Re: चारोळी
Post by: Yogesh9889 on April 09, 2013, 10:53:55 PM
ratri padlelya swapnat,
ti mazya mithit hoti,
dole ughadlya nantr,
tich punha dur jat hoti...
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 09, 2013, 11:36:18 PM
नजर तुझ्यावर खिळली माझी..
तुजसंगे प्रीती जुळली माझी....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 10, 2013, 09:56:11 AM
(http://img41.imageshack.us/img41/7185/gulmohar.jpg)
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on April 10, 2013, 12:23:02 PM
मधुराच्या चारोळीवर आल्या 
नव्याण्णव प्रतिक्रिया
सगळ्यांवर कडी माझी
शंभरावी प्रतिक्रिया


केदार ....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 10, 2013, 12:35:48 PM
मधुराच्या चारोळीवर आल्या
शंभर प्रतिक्रिया
माझ्याकडून तीला
१०१ शुभेस्यांचा
मनापासून नजराना!

मिलिंद कुंभारे  :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 10, 2013, 02:22:16 PM
धन्यवाद! धन्यवाद!!
पण मला वाटत कि आपण सगळेच इतक्या छान चारोळ्या करत आहोत, कि मलाही तुम्हा सर्वांना अभिनंदन करावस वाटतंय.....
म्हणूनच, मनापासून अभिनंदन !
आणि या 'चारोळी' उपक्रमातून आपला एक 'छान कवींचा' असा जो ग्रुप तयार झालाय, तेच मला खूप महत्वाच वाटत.
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 10, 2013, 02:54:42 PM
चांदण्यांचा नेसून शालू,
धावत धावत आली,
सागरात मिसळूनी
तयाशी एकरूप झाली....

भुलली विशाल कायेला,
पण माहित तिजला नव्हते,
काया विशाल तरीही
त्याचे पाणी खारट होते.....
Title: Re: चारोळी
Post by: Yogesh9889 on April 10, 2013, 03:07:31 PM
Ti ayushatun jatana,
Athvani aandan mhanun deun geli,
Aani tichya naynatil swapne olich theun,
Mala korda nirop deun geli...
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 10, 2013, 03:16:53 PM
yogesh छान प्रयत्न आहे!
असाच प्रयत्न करीत रहा!
चारोळी जमेल तुला! :) :) :)

आयुष्यातून माझ्या जाता-जाता  :'( :'( :'(
आठवणी तुझ्या,
मनात माझ्या कोरून गेली,
स्वप्ने तुझी अधुरीच राहिली,
अन कोरडाच निरोप,
मजला देऊन गेली! :( :( :(

मिलिंद कुंभारे
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 10, 2013, 03:55:33 PM
योगेश कविता मराठीत लिहित जा! इंग्लिश मध्ये वाचायला ताण पडतो!
मराठी typing साठी खालील लिंक follow कर!
http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/
Title: Re: चारोळी
Post by: केदार मेहेंदळे on April 11, 2013, 11:52:56 AM
कळता सागराचे वास्तव
अश्रू नयनातून ओघळला
नवल वाटले तिजला
तो हि खारट होता

केदार....
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 11, 2013, 02:48:55 PM
निर्मळ पाणी तिचे
गोड होते कधीकाळी...
खारटपणा सागराचा
तिचं अंग अंग जाळी...
Title: Re: चारोळी
Post by: Yogesh9889 on April 11, 2013, 04:49:59 PM
सरून गेली रात्र
आणि टळून गेली वेळ...
पण थांबता थांबेना
तुझ्या आठवणींचा खेळ...
Title: Re: चारोळी
Post by: rudra on April 11, 2013, 10:12:27 PM
v.nice...
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 13, 2013, 02:59:23 PM
Thanks!
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on April 15, 2013, 09:07:44 PM

रातराणीचा तो खेळ....
अन नाजुक होती ती वेळ....
बंध तुझिया प्रेमाचे सखे...
जणु उन सावलीचा मेळ.....
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 16, 2013, 04:20:03 PM
वाह! वाह!

कविता लिहितेस तू....
मज शब्द हि अनोळखी...
जगाहून हि वेगळी
लाभली मला सखी!
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 16, 2013, 05:04:34 PM
रातराणीच्या फुलांनी,
बहरली होती रात!
फुलांच्या दुनियेत,
लाभली तुझी साथ!
मृदू स्पर्श तुझा,
अन सजली होती रात!
ओठांना ओठ टेकलेली,
अन थांबली होती पहाट!

मिलिंद कुंभारे
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on April 16, 2013, 08:43:49 PM
ना कळे मला

हा खेळ भावनांचा

कसे सांगू तुला

मनी कल्लोळ अव्यक्त भावनांचा
 
Title: Re: चारोळी
Post by: rudra on April 17, 2013, 10:07:04 AM
u both r brilliant.........
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 17, 2013, 02:27:46 PM
फिरु कशी मी परत आता?
अंधारल्या दाही दिशा....
जीवनात बघ रात जाहली...
होईल का रे सांग उषा???
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on April 17, 2013, 07:46:08 PM
निसर्गाचा क्रमच असतो

रात्री नंतर दिवस उजाडतो

जीवनाचेही असेच असायचे

दुखः नंतर दिवस सुखाचे

दुखः मुळे सुख मिळते

सुखामुळे दुखः विसरते

माणसाचे तर  असेच असते

दुखः ला तर किंमतच नसते
 
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 17, 2013, 10:56:08 PM
वाटेत चालताना
काट्यांना मी
तुडवीत गेले.....
आता फुलांचीही
मनामध्ये या बसली धास्ती...

वनामध्ये या माणसांच्या,
वारा बनुनी, फिरुनी आले,
आणि नंतर कळले मजला;
लांडग्यांची ती होती वस्ती.......
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on April 18, 2013, 12:50:03 AM
dhanyawad madhura di
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on April 18, 2013, 12:56:26 AM
नाही राहिली मला आता आवड कवितेची

धुसर झाली आहे शाही त्या पेनाची

आता कोऱ्या कागदालाही किंमत नव्हती

कारण शाहीने कागदाची साथ सोडली होती
:'( :'( :'(


मधुरा दी तुझ्यासाठी
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 18, 2013, 07:39:27 AM
Nice try, Prajdeep.

कोरा कागद तुझा हा,
कोरा नाही राहिलेला....
शाईहूनहि निर्मळ
आसवांनी लिहिलेला...

Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on April 18, 2013, 11:36:53 AM
स्याही संपली म्हणून,
सोडू नकोस तू,
कविता लिहायचा!
शोधू नकोस तू,
पेन दुसरा तिसरा!
रक्ताच्या थेंबा थेंबानी,
लिही तू कविता!
अन ओसंडून जाऊ दे,
नयनी गोठलेल्या भावनांना!

मिलिंद कुंभारे
Title: Re: चारोळी
Post by: Yogesh9889 on April 18, 2013, 04:52:32 PM
Antarangi pavsat,
Tu chimb bhijleli,
Tuzya ashrutil themb n themb,
Janu moti banun padleli. .   
*******YOGESH*******
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on April 18, 2013, 04:52:33 PM

भावना माझ्या मनाच्या सखे,
कधी कळतील काय गं तुला....
निरंतर जपलेली गुलाबाची फुलं तुला द्यायचा,
कधी धीर होइल काय गं मला...

  भेटीसाठी मी अजुनही अधीर आहे....
  आतुरता माझ्यासारखीच आहे का तुला..
  फुलपाखरापरि  अजुनही मी फिरतो...
  खरच तू भेटशील का माझ्या फुला ......
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 20, 2013, 02:33:35 PM
Wow! well done!
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on April 21, 2013, 07:36:58 PM
माझ्या मनाला कोणी समझावे

प्रेमापासून  कसे दूर राहावे

वाटते नेहमी त्याच वर्गात बसावे

प्रेमाचे धडे वारंवार शिकत राहावे
 
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on April 26, 2013, 08:32:50 PM
thank you madhura ji....
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on April 26, 2013, 08:38:49 PM
तुला पाहुनी मी..
आजही थिजतो...
मनातल्या भावनात...
स्वताच हरतो....
तुझ्या ओढित शब्द सुचतात कधीतरी..
अन मित्र म्हणतात..
मी कविता करतो...
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on April 27, 2013, 04:57:07 PM
पाहुनी त्या फुलाकडे
गाली तुझ्या खुलली कळी...
डोळ्यांत वसले स्वप्न नवे
अन हंस विहरति जळी...
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on May 15, 2013, 09:29:03 PM
काय झाले असे  की
थांबल्या आपल्या चारोळ्या
सुरुवात करतो नव्याने
होऊन जाऊद्या चारोळ्या
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on May 16, 2013, 10:31:25 AM
शब्द सारे गोठले अन भावनाहि गोठल्या...
हरवलेल्या वाटा माझ्या, शोधताना संपल्या....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on May 16, 2013, 10:57:57 AM
मधुरा ताई  :)

ओसंडून जावू दे, नयनी गोठलेल्या भावनांना,
कदाचित तो प्रवाह, शोधील एक चोरवाट,
घेईल ध्यास अंतरीचा अन गवसेल त्याला,
एक नवी वाट,एक नवी पहाट!

मिलिंद कुंभारे
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on May 16, 2013, 11:02:52 AM
जुने सोडुनिया, आले नवतीचे वारे....
मनावरी अजूनही जुन्याचे पसारे....

बंद केली समाजाने सारी सारी दारे...
बसवले कळ्यांवरी कठोर पहारे.....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on May 16, 2013, 11:13:33 AM

नको करूस भावनांना कैद असे,
उघड तू बंद दारे,
झुगारून सारे पहारे,
कळी न कळी उमलू दे,
गंध आसमंती दरवळू दे,
फुलपाखरांशी अवती भवति भ्रमरू दे! :) :) :)

मिलिंद कुंभारे
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on May 16, 2013, 11:23:31 AM
सनातनी समाजाची खोड कधी मोडणार नाही....
स्वतःच्याच पाकळ्यांत बंद कळी कधी उमलणार नाही...
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on May 16, 2013, 11:37:00 AM
आज आहे ती स्तब्ध,
मीही झालोय स्तब्ध,
कळेना मज,
मोडणार कोण सामाजाची रे बंधनं,
उमलणार कधी रे कळी ती पाकळ्यांत बंद! :( :( :(
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on May 16, 2013, 11:40:38 AM
बांधले होते आम्हाला जोखडांनी कुणी...
तोडण्या सुसज्ज झालो मिळूनी साऱ्याजणी....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on May 16, 2013, 11:49:39 AM

गेलेत ते दिवस, अन बदललेत युगं,
बघ आज सारे मोकळे आभाळ,
बळ पराकोटीचे तुझ्या  पंखात,
घे भरारी अन कर सार्थक स्त्रीजन्माचं! :) :) :)

मिलिंद कुंभारे
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on May 16, 2013, 11:53:28 AM
:)
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on May 16, 2013, 11:59:40 AM

बघून हि स्माईली,
प्रसन्नता मनी दाटली,
कळी उमलली अन,
रानेवने सारी हिरवीगार झाली!
:) :) :) :) :) :) :) :) :) :)

मिलिंद कुंभारे
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on May 16, 2013, 05:06:38 PM
गार गार वारा, हिरव्या हिरव्या वनातला....
गंध ओल्या या मातीचा ओढ लावतो मनाला....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on June 01, 2013, 03:38:20 PM
वाऱ्याने ढगांशी गुज सांगू दे,
पावसाने सरी सरींमध्ये बरसू दे,
पानाफुलांमध्ये थेंब थेंब बिखरू दे,
तहानलेल्या मनाला  चिंब चिंब भिजू दे!!!

मिलिंद कुंभारे
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 01, 2013, 10:08:48 PM

वेल उभी भुईवर,
तिला फुटता अंकुर,
दाटून आला ऊर,
बघ आभाळाचा..

ढग पाणावला,
मोर बनात नाचला,
भूमीवरी पसरला,
रंग पावसाचा.....


Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 02, 2013, 12:27:28 PM
प्रेमाच्या या पावसात सखे.....
आज मला न्हावुन जाऊ दे.....
केसात माळलेल्या या तुझ्या गजय्रात.....
निष्प्राण श्वास हा माझा
आता फुले दे.....
प्रेमाची स्पंदनं अन प्रेमाची ही भाषा.....
आता नजरेला कळु दे.....
घायाळ त्या प्रेमळ मनाला साथ आता तुझी मिळु दे....
थरथरत्या ओठांची चाहुल
आरक्त स्पर्शाने थांबु दे.....

प्रेमाच्या या पावसात सखे मला आता चिँब भिजु दे.....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on June 04, 2013, 10:37:52 AM
ढग पाणावला,
मोर बनात नाचला,
भूमीवरी पसरला,
रंग पावसाचा.....

sundar..........
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 04, 2013, 12:58:26 PM
प्रेमाच्या या पावसात....
सखे मी तुझ्यासोबत भिजेन....
गंधित या आपुल्या नात्याचे....
रंग भुमीवरी उधळेन....
कोसळणाय्रा पावसातही तुझ्या आसवांना....
मनाच्या कोपय्रात जपेन....

कवि-विजय सुर्यवंशी.
      (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 07, 2013, 09:41:36 AM

ढग पाणावला,
मोर बनात नाचला,
भूमीवरी पसरला,
रंग पावसाचा.....

sundar..........

Thanks Milind dada.... :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 07, 2013, 09:57:34 AM
पावसात भिजलेली हिरवीशी  पाने...
मातीस गंध नवा दरवळे आनंदाने....

आज वाटते नव्याने पुन्हा उमलून यावे...
थेंब प्रत्येक पावसाचे तुझ्यासाठीच जपावे...   
 
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 16, 2013, 07:34:51 PM
दोन डोळे,
फार भोळे...
सांग का बनले
अश्रुंचे तळे?
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 16, 2013, 08:32:16 PM
पावसातले ओले ओले,
क्षण ते सारे, जपले रे....
डोळ्यांतून तो पुन्हा बरसला,
पुन्हा पुन्हा मी भिजले रे....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on June 18, 2013, 11:29:59 AM
आज वाटते नव्याने पुन्हा उमलून यावे...
थेंब प्रत्येक पावसाचे तुझ्यासाठीच जपावे...   

कळी उमलली वाटतं ......
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 18, 2013, 12:54:56 PM
:)

पुन्हा नव्याने खुलून यावे,
नवजीवनाचे सुगंध माझे
वेलीवरी उमलले जरी मी,
आकाशीचे छंद माझे.....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 18, 2013, 05:06:53 PM
पृथ्वी म्हणे चंद्राला माझे प्रेम तुझ्या वरती
चंद्र म्हणे पृथ्वीला मग कशाला घिरट्या मारते सुर्या भोवती  :D :D :D
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 18, 2013, 05:09:12 PM
पृथ्वी म्हणे चंद्राला माझे प्रेम तुझ्या वरती
चंद्र म्हणे पृथ्वीला मग कशाला घिरट्या मारते सुर्या भोवती
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 18, 2013, 07:29:53 PM
छान सुनिता..... :)

वेडात अशी वेडावले....
कि वेडात तुला पाहिलेले...

वेडात तुझ्या गुरफटुन...
वेड्या चंद्रा मन तुला वाहिलेले..... :)

कळलं नाही तेजाळणारा  तो प्रभाकर कधी मनास भावला.... :|
अनं सर्वस्व त्याच्या तेजाला वाहिलेले.... :p:)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 18, 2013, 08:45:11 PM
Sunita,

तुझे कवितांच्या भेंड्यांमध्ये मनापासून स्वागत!!!

आता मी....

काही बोलायचं...
काही सांगायचं....
बरसणाऱ्या पावसात
बेधुंद नाचायचंय....
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 18, 2013, 08:58:16 PM
छान मधुराजी.

प्रिय सई....

मनातल्या आभाळात
मेघ येतात भरुन....
रुतु होतात हिरवे
आठवणीँना पांघरुण....
शिशिरातला प्रवास
उमेद हरवलेला....
आयुष्याच्या पानगळीत
अस्तित्व जाईल विरुन....
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 18, 2013, 09:10:11 PM
विजय दादा,

खूप छान! मस्त! काळजाला भिडणारे लिखाण.....खूप छान!

पण हि सई कोण? म्हणजे उत्तर देण बंधनकारक नाही....तुला वाटलं तरच उत्तर दे.
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 18, 2013, 09:28:19 PM
सई माझी जिवाभावाची....
मैत्रिण कि प्रेयसी अजुन कळलंच नाही....
आहे अशी वेडी माझ्यावर हक्क गाजवणारी जीला माझी कविता कधी कळलीच नाही....
सोबत असुनही मी जवळ नसायचो....
दुराव्यात जिच्या मी विरहगीत गायचो....

AND madhuraji thanks for reply.....
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 19, 2013, 03:23:42 PM
:)

निसर्ग सारा बहरून गेला फक्त तिच्या येण्याने....
सूर्य हि पावसात भिजला फक्त तिच्या येण्याने...

Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on June 19, 2013, 03:47:49 PM
इंद्रधनू रंग सारे उधळून गेला
फक्त तिच्या येण्याने....
सूर्यही चंद्रासम शीतल झाला
फक्त तिच्या येण्याने....
:) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 19, 2013, 03:53:01 PM
तिच्या येण्याने मनी
बहरले वृंदावन...
गेले भान हरपून,
नाचलो होऊन बेभान...
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on June 19, 2013, 04:05:36 PM
तिच्या येण्याने
प्रेमांकुर एक मनी अंकुरले
जीवन सार्थकी लागले अन
अंगणी माझ्या नंदनवन फुलले ......
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 19, 2013, 04:43:10 PM
तिचे हसणे नाजूक
अन मोहक लाजणे,
ती बघते वळून
येते आकाशी चांदणे...
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 19, 2013, 04:52:56 PM
पावसाचा प्रत्येक थेंब पिऊ पाहतोय  चकोर
पावस सरींनी वसुंधरा नेसली हिरवा शालू नवा नकोर
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 19, 2013, 04:59:14 PM
तिचे येणे तिचे जाणे  जीवास वेड लावी
जातांनाच परत येण्याचा ध्यास मनी लावी
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 19, 2013, 09:00:05 PM
सांजवेळी अंगणात
माझ्या चंद्र उतरतो,
'गेली कुठे रे चांदणी?'
मला विचारतो.
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 19, 2013, 09:26:43 PM
सांजवेळी अंगणात
माझ्या चंद्र उतरतो,
'गेली कुठे रे चांदणी?'
मला विचारतो.         
                    त्या दिवशी आकाशात अवस असावी जरूर ,
चंद्र तुमच्या अंगणात चांदणीला शोधे भिरभिर ,
सापडली त्याला चांदणी तुमच्या चेहऱ्या मधे ,
म्हणून त्याच्या जीवाला "सुकून" वाटतोय की "सुरूर "
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 19, 2013, 10:08:37 PM
Sooo sweet Sunita.....Really nice!!!

आंगणात माझ्या
आरास चांदण्यांची
तुझ्यासाठी खास जागा,
एक माझ्या हृदयाची....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 19, 2013, 10:42:16 PM
प्रेमा साठी रडणे माझे ,प्रेमा साठी हसणे ,
जीवनी जर प्रेम नसले ,कशासाठी हे जगणे .
कुणाच्या तरी  हृदयात जागा असावी आपली ,
ही कल्पनाच मनाला हळुवार करी गुदगुली .
हृदयी बसून प्रियकराच्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलावे .,
प्रेमाचाच  बहर हा,ह्याने  जीवन भर बहरून राहावे .  ;)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 20, 2013, 05:11:08 PM
रात्र पसरते घेऊन 
आकाशी चांदणकाया..
तुझा दुरावा, जाते रे हि
सारी शोभा वाया....
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 20, 2013, 07:46:29 PM
मोगय्राच्या फुलांना मन माझे भाळलेले.....
त्याच फुलांना तु तुझ्या केसात माळलेले.....
तुझ्या विरहात सई मोगरा वाळुन गेला.....
वेड्या तुझ्या प्रेमाला मीच सई टाळलेले.....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 21, 2013, 11:03:50 AM
chan,,saine keli mokali waat pritichya bandhanachi,
ka mug assa durawaa ki virah sosava ya jiwani,
miluni  ek whawe hich apekha amuchi,
an prem he amar raho hich sadiccha sarvanchi :D :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 21, 2013, 01:36:52 PM
सुनिताजी मराठी TYPE केलं असतं तर सईला पण आवडलं असतं. हरकत नाही, तरिही छान चारोळी आहेँ
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 21, 2013, 03:58:03 PM
नयनांतुनी बोलायची असते प्रेमाची भाषा,
प्रेम फक्त करायचं असत, नसते ठेवायची आशा.....
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 21, 2013, 04:47:32 PM
वेडात असा वेडावलो की वेडात तुला पाहिलेले.....
वेडात तुझ्या गुरफटुन वेडात मन वाहिलेले.....
कळले नाही नयनात तुझ्या कसा हरवुन गेलो.....
होते काही तुला बोलायचे सई नेमके तेच राहिलेले......
भावनाशुन्य नजरेत आता दोघे.....
आठवणीत साय्रा बुडालेले.....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 21, 2013, 10:56:59 PM
वेडात असा वेडावलो की वेडात तुला पाहिलेले.....
वेडात तुझ्या गुरफटुन वेडात मन वाहिलेले.....
कळले नाही नयनात तुझ्या कसा हरवुन गेलो.....
होते काही तुला बोलायचे सई नेमके तेच राहिलेले......
भावनाशुन्य नजरेत आता दोघे.....
आठवणीत साय्रा बुडालेले.....
:) :) हे प्रेम सखी ग जीवास वेड लावी ,
स्वप्नवत वा जागृत याचे भान मनी न राही ,
असंख्य भावनांचा  हा खेळ उरी चाले ,
पापण्याच्या परद्या पलीकडेही साक्षात मूर्ती तुझीच पाही  ;) ;)sweetsunita :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 21, 2013, 11:09:06 PM
नयनांतुनी बोलायची असते प्रेमाची भाषा,
प्रेम फक्त करायचं असत, नसते ठेवायची आशा.....
:) :)छानच आहे ............ तुझ्या ओठावर यावे फ़क़्त माझेच नाव ,
                              ही अपेक्षा केली तर चुकले कोठे हो राव ?
                             तुझ्या  नयनातील भावना मी समजून आहे ,
                               पण तुझ्या मुखातून मला साद अपूर्व  गोड साहे [वाटे ]............... sweets
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 22, 2013, 10:23:57 AM
सुनिता, विजय, तुम्हा दोघांमुळे चारोळी करायला नवा उत्साह आला.. छान करता दोघही कविता   :)

तुझेच नाव आहे सतत माझ्या ओठी.
आसवांची दाटी डोळा फक्त तुझ्यासाठी...

तुझ्यासाठी जपले मी चांदणे पदरात,
तुझ्याविना एकांतात झुरते हि रात....


मधुरा कुलकर्णी
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 22, 2013, 01:43:11 PM
धन्यवाद मधुराजी.....
सुनिताजी छान चारोळी होती.....

रात्र झाली की सई तुझी स्वप्नं पडु लागतात.....
तुझ्या गोड जाणीवांनी भावना कडु लागतात.....
तु स्वप्नात येतेस सई आणी चांदणेही हसते.....
स्वप्नातले इतिहास पुन्हा स्वप्नातच घडु लागतात.....
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 22, 2013, 03:46:14 PM
क्षण सोनियाचे,
झाली ओलीचिंब धरा,
नभातून बरसल्या,
आज अमृताच्या धारा...

मधुरा कुलकर्णी
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 22, 2013, 04:02:39 PM
तुझ्या या भावनेला मोरपंख मिळतील.....
काळजाचे शब्द  आज काळजाला कळतील.....
या ऊन-पावसात तु गा खुशाल गाणी.....
सई तुझ्याही मनात मग इंद्रधनु ढळतील.....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 22, 2013, 04:15:20 PM
रात्र झाली की सई तुझी स्वप्नं पडु लागतात.....
तुझ्या गोड जाणीवांनी भावना कडु लागतात.....
तु स्वप्नात येतेस सई आणी चांदणेही हसते.....
स्वप्नातले इतिहास पुन्हा स्वप्नातच घडु लागतात.....
                                                                 मस्त !
                                                                            !हळुवार वाऱ्याने पदर हलला जरी
                                                                             तुझ्या प्रेमळ स्पर्शाचा भास होतो उरी
                                                                             डोळ्यातच रात्र सरते ,भान नसे मना ,
                                                                             मनातील भवनाचा ठाव लागे जना ............. सुनिता नाड्गे [शेरकर ]
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 22, 2013, 04:41:38 PM
सई तुझ्यासोबत असल्यावर कविता सुचते.....
शब्दांची पाखरं होऊन आभाळभर फिरते.....
तुझ्या अलगद स्पर्शाने उलघडीत जाते मनातलं हळवेपण.....
शब्द होतात भावुक अनं कविता काळजात शिरते.....
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 22, 2013, 04:46:50 PM
आठवण तुझी कि
होता तुझा भास,
श्वासा-श्वासात माझ्या
फक्त तुझी आस....

गेलीस दूर जरी
मनी तुझा सहवास,
मग होत नाही
तुझ्या विरहाचा त्रास!!!


मधुरा कुलकर्णी
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 22, 2013, 05:07:54 PM
धन्यवाद मधुरा आणि विजय !!!तुमच्या सर्वांमुळे मलाही हुरूप चढतोय ।  :D :D :D
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 22, 2013, 09:12:28 PM
चांदण्या कवेत घेऊन रात आली...
चंद्राचेच राज्य चाले चांदणमहाली....

अंधारातही तिच्या,
एक नवखा प्रकाश,
टीमटीमते रातदिवे
अन सजले आकाश....

Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 22, 2013, 09:36:52 PM
अंधारातही तिच्या,
एक नवखा प्रकाश,
टीमटीमते रातदिवे
अन सजले आकाश....


:)या अंधाऱ्या रात्रीही मला तुझी चाहूल लागे। 
असो चांदण्यांची आरास वा काजळी रात्र लाभे,
तुझ्या  चंदनी देहाचा गंध ठसला मनी
बंद  लोचानानी तुला  हृदयी पाहूनी............
...... सुनिता नाड्गे [शेरकर ]
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 23, 2013, 11:04:12 AM
रात्रीत वाहतो हा मंद मंद वारा
चांदण्यांवरीहि चंद्राचा पहारा...
धुंद वेळी अश्या तुझ्याचसाठी
बघ सखे हिरवी होतो धरा
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 23, 2013, 04:09:50 PM
!हळुवार वाऱ्याने पदर हलला जरी
  तुझ्या प्रेमळ स्पर्शाचा भास होतो उरी
डोळ्यातच रात्र सरते ,भान नसे मना
   मनातील भवनाचा ठाव लागे जना ............. सुनिता नाड्गे [शेरकर ]
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 24, 2013, 10:15:45 AM
माझ्या मनातील भाव तिने हेरलेले.....
एसटीच्या बाकावर दोघांचे नाव कोरलेले.....
अजुनही ती एसटी छळत असते मला.....
मी गाफिल होतो अनं सईने काळीज चोरलेले.....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 24, 2013, 01:01:07 PM
माझ्या मनातील भाव तिने हेरलेले.....
एसटीच्या बाकावर दोघांचे नाव कोरलेले.....
अजुनही ती एसटी छळत असते मला.....
मी गाफिल होतो अनं सईने काळीज चोरलेले.....
:) :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 24, 2013, 04:19:33 PM
एसटी च्या बाकावर तिचे लिहू नका  नाव
एसटी तर राष्ट्रीय संपत्ती आहे  ना राव ?
नाव कोरायचे तर तुझ्या  हृदयाची कर पाटी
मग पहा  सई कशी धावत येते तुझ्या साठी ! :D :D
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 24, 2013, 05:08:01 PM
वाह! ,मस्त चालू आहे...चालू दे, चालू दे.
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 24, 2013, 05:13:37 PM
 :D :D :D :D :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 24, 2013, 06:52:55 PM
छान सुनिता जी :D:D:D

एस टी आहे राष्ट्रिय संपती याची मला जाण.....
नाव कोरण्याचा पराक्रम सईने केला.....
अन नव्हते तिला भान.....
पुन्हा असं कधिच घडणार नाही.....
याचं नेहमी भान ठेवेन.....
अनं प्रेमाच्या तिच्या अडिच अक्षरांसाठी.....
पाटी माझ्या ह्रुदयाची तिच्या हाती ठेवेन.....

     - विजय सुर्यवंशी.
      (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 24, 2013, 09:03:45 PM
नुसतीच पाटी तिच्या हाती देऊन चालणार नाही गडे ,
तिच्या बरोबर तुलाही गिरवावे लागतील प्रीतीचे धडे  :D :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 24, 2013, 09:23:41 PM
ह्रुदयाची पाटी अनं प्रेमाचे धडे.....
अडिच अक्षरांचे शब्द वाटताहेत बे चे पाढे.....
कठिण असले तरी पाढे म्हणावेच लागणार.....
तुझ्या माझ्या नात्यासाठी सई.....
प्रेमाचे धडे हे गिरवावेच लागणार,....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 24, 2013, 09:27:11 PM
प्रेमाचे धडे गिरविणे हेच तुझे काम
तिने साद दिल्यावर वसूल झाला दाम  :D :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 24, 2013, 09:46:36 PM
सई तु दिलीस साद.....
अन मिळाली माझी दाद.....
हसु येतयं या लोकांना आपल्या नात्यावर....
कसा एकटा घालु यांच्याशी मी वाद..... :(
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 24, 2013, 09:57:52 PM
वाद कुणाशी घालून वेळ  वाया घालू नकोस
सर्वांना पटविण्याचा घाट घालू नकोस
सई जर तयार अन तू  ही आहेस  तयार
तर प्रेमाला  तुमच्या येऊ द्या न बहर  :D :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 24, 2013, 10:15:14 PM
छान सुनिता जी..... :*

सुनिता जी अडिच अक्षरांच्या या खेळात.....
वाद आता होणारंच.....
नाती समजावुन सांगताना.....
वेळ वाया जाणारंच.....
श्वापदांच्या जगती काटेच गुलाबांच्या फुलांना बोचतील.....
अन माझ्या अन सईच्या नात्याचं मोल त्याना कधीच नाही कळणार..... :(
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 24, 2013, 11:33:24 PM
प्रेण  हे अक्षर गिरविता येते पटकन
संबंधातला दुरावा संपुष्टात येतो का चटकन ?
नसेल सई ची हरकत तर समजून घ्या सारे ,
नाहीतर उगाच वेळ जाईल ,अन थांबेल प्रेमाचे वारे  ,
:D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 25, 2013, 10:47:44 AM
सुनिता जी छान सल्ला होता..... :D


मला सई, अन सईला मी हवा आहे.....
आमचं नातं म्हणजे दोन घरातील दुवा आहे.....
भेदभावाचे कलह आम्हाला थांबवायचे आहे.....
अभागी या माणसांना आता प्रेमाने जिंकायचं आहे.....
सई आधी ही तयार होती अन आता ही आहे.....
तिच्या वेड्या हट्टासाठी मला सर्वाँना सोबती घ्यायचं आहे.....
सरतेशेवटी निर्णय हा तिचाच असेल.....
अन प्रेमाच्या या फांदीवर अंकुर लवकरंच फुलेल.....

कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 25, 2013, 11:10:54 AM
तुमच्या या  प्रेम बंधनाची ,
आम्ही आतुरतेने वाट पाहतोय ,,
घाई झाली आम्हाला पण,
प्रेमाच्या या वेलीवर नवा अंकुर कधी फुटतोय ।  :D :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 25, 2013, 11:21:08 AM
छान REPLY दिलात सुनिता जी.....

तुमच्या या  प्रेम बंधनाची ,
आम्ही आतुरतेने वाट पाहतोय ,,
घाई झाली आम्हाला पण,
प्रेमाच्या या वेलीवर नवा अंकुर कधी फुटतोय । 


नातं हे जुळुन आलं तर मी आनंदाने नाचेन.....
सईवरील कविता मी मोठमोठ्याने वाचेन.....
शब्दांची फुले होतील अन कवितांचा पाऊस पडेल.....
मग आपणही हसाल खळखळुन अनं हसण्यासाठीही कविता रचेन.....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 25, 2013, 11:27:34 AM
thats the spirit :D :D
खळ-खळून हसल्याने प्रकृती छान राहीन
तुम्ही दिलीत संधी तर आभार तुमचे  मानीन  :D :D :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 25, 2013, 11:39:08 AM
हसण्यासाठी योग.....
अन वेळ च हवा काय.....
अन संधी देण्यासाठी.....
'तुमच्यासाठी काय पण' म्हणायलाच हवं काय...? :D
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 25, 2013, 11:46:26 AM
 :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 25, 2013, 11:52:15 AM
डोळ्यात आँसु अन ओठावर हसु.....
हि किमया तर गाडीच्या मिरर ची पण आहे.....
खेळ खेळण्या हा चारोळीचा.....
सुनिता जी, आपल्या चार ओळींची गरज साहे.....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 25, 2013, 01:31:09 PM
गाडीचा  मिरर असो वा असो आरसा
प्रतिबिंब त्यात दिसे जसा कि तसा
डोळ्यात तुमच्या असेल  जर आसू
तर दिसणार कसे आरश्यात हसू  :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 25, 2013, 01:38:49 PM

केदार ,मिलिंद ,अन मधुरा का केलेस बंद लिहिणे
तुमच्या चारोळी साठी आसुसलोय आम्ही पाहुणे
तुमच्या चारोळ्यांची अंताक्षरी येवू द्या रंगत
मग आम्हीही चारोळ्यांची मांडतोय पंगत  :D :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 25, 2013, 02:16:53 PM
लंबगोल आरश्याची आहे किमया न्यारी.....
ट्रॅफिकमध्ये आसु अन हसुची गंमत भारी.....
:D :D
केदार, मिलीँद अनं मधुरा.....
तुमच्याविना चारोळी चा हा खेळ अधुरा.....
पुन्हा येवु द्या शब्दांना बहार.....
अन गवसु द्या पुन्हा कवितेचा किनारा..... :D
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 25, 2013, 08:47:58 PM

वाह! माझ्यावर सुद्धा कविता करून टाकली तुम्ही.... मस्त, मस्त!

ऐका तर मग,

ट्राफिक असो वा गर्दी मला एकटेपणाचा शाप आहे,
इंजिनीअरिंगच्या शिक्षणाचा डोक्याला माझ्या ताप आहे....
पण 'कविता करणे' सोडण माझ्यासाठी पाप आहे....
तुमच्या माझ्यावरच्या कविता माझ्या यशाचं माप आहे...  :) :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 25, 2013, 09:46:09 PM
घेतला एकदा  इंजिनियर बनण्याचा वसा,
मग डोक्याला ताप आहे म्हणता कश्या ,
हातात घेतलेलं काम कधी अर्धवट सोडायचं नसते ,
आपल्या बरोबरच आई -बाबांनी पाहिलेलं  ते स्वप्न असते .  :) :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 25, 2013, 09:51:38 PM
इंजिनियर बाई तुमच्या वर मराठी साहित्त्याची छाप .,
उत्कृष्ठ कविता अन चारोळ्याची प्रस्तुती तुमच्या यशाचे माप .  :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 26, 2013, 12:17:03 AM
आभारी आहे मधुराजी.....

:D :D

वाह! माझ्यावर सुद्धा कविता करून टाकली तुम्ही.... मस्त, मस्त!

ऐका तर मग,

ट्राफिक असो वा गर्दी मला एकटेपणाचा शाप आहे,
इंजिनीअरिंगच्या शिक्षणाचा डोक्याला माझ्या ताप आहे....
पण 'कविता करणे' सोडण माझ्यासाठी पाप आहे....
तुमच्या माझ्यावरच्या कविता माझ्या यशाचं माप आहे...  :) :)

आता इंजिनिअरबाई तुम्ही ऐका.....

"दिवस सारा सरुन  गेला.....
अन चांदरातीला सुरवात झाली.....
खेळ खेळण्या चारोळीँचा.....
पुन्हा आता लगबग झाली....."

     विजय सुर्यवंशी.
  (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: swara on June 26, 2013, 12:31:35 PM
सकाळच्या वेळी
चांदण्यांचा भास
आजही मला
तुझीच का आस  >:(
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 26, 2013, 12:59:07 PM
प्राची छान चारोळी होती.....

" खरी आस असल्यावर तुला....
दिवसा चांदण्यांचेही भास होतील....
मनात उमटतील तुझ्या इंद्रधनु....
अनं उन्हातही सरी पावसाच्या येतिल...."

    - विजय सुर्यवंशी.
    (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: swara on June 26, 2013, 01:51:53 PM
मनात उमटतील तुझ्या इंद्रधनु....
अनं उन्हातही सरी पावसाच्या येतिल...."

khup chan vijay sir..
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 26, 2013, 02:15:19 PM
 Thanks prachi.......

"सोबती आता कुणीच नाही....
उरले  फक्त शब्दांचे मेळ.....
साथ मिळाली प्राची तुझ्या चारोळीची.....
अन पुन्हा रंगला भेँड्यांचा खेळ...."

-     विजय सुर्यवंशी.
     (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 26, 2013, 02:26:34 PM
लक्षण बरे नव्हे ,दिवसा तारे दिसणे .
प्राची यालाच म्हणतात गोंधळात असणे  :D
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 26, 2013, 02:39:18 PM

"सोबती आता कुणीच नाही....
उरले  फक्त शब्दांचे मेळ.....
साथ मिळाली प्राची तुझ्या चारोळीची.....
अन पुन्हा रंगला भेँड्यांचा खेळ...." :D :D
:D :D
असा मायुस होऊ नको आम्हीही आहोत सोबतीला ,
भेंड्यांचा खेळ हा पुन्हा येईल नव्या भेटीला .
संगणकाचे रुसणे झाले होते आमच्यावर
नाही आमचा अजिबात राग अहो तुमच्यावर  :D :D :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 26, 2013, 02:59:21 PM
Thanks sunita.....

"राग आपला नव्हता माझ्यावरी....
ऐकुनी मज बरे वाटले....
नव्या या सुरुवातीला....
अश्रु आनंदाचे मनी दाटले....
मायुस मी आधिही नव्हतो....
ना पुन्हा होणार....
शब्दांतुन जपलेलं आपलेपण....
नाही कधिच लयास जाणार...."

कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: swara on June 26, 2013, 03:02:51 PM
sunita and vijay sir mast ans dil doghani  :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 26, 2013, 03:07:16 PM
धन्यवाद प्राची पण तु विशेषःत सुनिताच्या विनोद बुध्दीचं कौतुक करायला हवं.... :D:D
Title: Re: चारोळी
Post by: swara on June 26, 2013, 03:12:55 PM
hahahaaaa  :D
khar aahe sir tumch

साथ जरी  असेल एक
सोबती सखी  अनेक
शब्दात जरी प्रश्न एक
उत्तरे असतील ती अनेक
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 26, 2013, 03:13:10 PM
"राग आपला नव्हता माझ्यावरी....
ऐकुनी मज बरे वाटले....
नव्या या सुरुवातीला....
अश्रु आनंदाचे मनी दाटले....
मायुस मी आधिही नव्हतो....
ना पुन्हा होणार....
शब्दांतुन जपलेलं आपलेपण....
नाही कधिच लयास जाणार...."

अति बरे वाटले तुमचा प्रतिसाद वाचून
           आपली म्हणणारी माणस  भेटत नाही अशी कोठेही शोधून
          शब्दांच्या या माळेला जपावेच लागणार
          हीच आपली ओळख याला सांभाळावे लागणार  :D :D :D
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 26, 2013, 03:16:06 PM
धन्यवाद विजय तुम्हाला माझे लिखाण आवडते ,ऐकून बर वाटलं  :)
Title: Re: चारोळी
Post by: swara on June 26, 2013, 03:18:13 PM
vijay siranshi sahmat  :)
sunita mam ,tumche likhan saral ani spasht aahe
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 26, 2013, 03:26:21 PM
धन्यवाद प्राची  :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 26, 2013, 04:00:22 PM
धन्यवाद प्राची....
आणी सुनिता असंच लिखाण ठेवा....

"साद देऊनी दाद मिळवता....
माझा मीच हरवलो....
रुसली सई माझ्यावर....
जणु मी तिला विसरलो...."
:D:D:D
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 26, 2013, 11:19:11 PM

"साद देऊनी दाद मिळवता....
माझा मीच हरवलो....
रुसली सई माझ्या..जणु मी तिला विसरलो...."

साद येता तुझी ओढ लागे मना ,
सांग कशी येऊ ठाव लागे जना ,
सई तुझी नाजुकशी डोळे मिटून धावी ,
बोचणाऱ्या बोलांचे काटे, मनी तिच्या घाव लावी
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 27, 2013, 12:35:20 AM
साद देऊनी दाद मिळवता....
माझा मीच हरवलो....
रुसली सई माझ्यावर....
जणु मी तिला विसरलो...."
:D:D :) :)
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on June 27, 2013, 03:11:36 PM
साथ जरी  असेल एक
सोबती सखी  अनेक
शब्दात जरी प्रश्न एक
उत्तरे असतील ती अनेक .....

मस्तच..... :)
Title: Re: चारोळी
Post by: swara on June 27, 2013, 05:52:15 PM
thnku  :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 28, 2013, 11:25:17 PM
सुनिता अतिशय छान सई चं उत्तर दिलंस.....

 
साद येता तुझी ओढ लागे मना ,
सांग कशी येऊ ठाव लागे जना ,
सई तुझी नाजुकशी डोळे मिटून धावी ,
बोचणाऱ्या बोलांचे काटे, मनी तिच्या घाव लावी...



"अंतरीच्या ओढिने संगम जाहला आपुल्या नात्याचा....
सई दुभंगुन कधी ते जाईल का....??
जरी बरसले बाण हे बोलांचे....
परी कवच हे प्रितीचे कुणी भेदेल का....??"

कवि-विजय सुर्यवंशी.
      (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on June 29, 2013, 10:23:05 AM
कवि - विजय सुर्यवंशी, prachi B, sweetsunita......

छान रंगलाय खेळ चारोळ्यांचा ...असेच खेळत राहा ...... मी मध्ये मध्ये येत राहील umpiring करायला ...... :D


जरी बरसले बाण हे बोलांचे....
परी कवच हे प्रितीचे कुणी भेदेल का....??"
छान...... :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 29, 2013, 10:40:40 AM
धन्यवाद मिलींद.... तुमच्या प्रतिसादाबद्दल.....
Title: Re: चारोळी
Post by: swara on June 29, 2013, 12:43:04 PM
हरवलेली परी
आता पुन्हा आलीय
काव्य करण्यात
तल्लीन झालीय
:D :D :D :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 29, 2013, 01:19:33 PM
छान प्रपत्न प्राची..... :D

"तल्लिन झालेलं तुला पाहता...
मीही मग स्फुरलो...
वाचुन गहिय्रा मनाचे परी तुझे काव्य...
मी न माझा उरलो..."
Title: Re: चारोळी
Post by: swara on June 29, 2013, 03:29:16 PM
khup chan vijay sir :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 29, 2013, 04:11:41 PM
धन्यवाद प्राची.....

"रिमझिम तु बरसत राहा.....
वळवांच्या सरीप्रमाणे तु बरसु नको.....
शब्दांच्या सानिध्यात तु पेटव ज्योती.....
विझणाय्रा वणव्यास्तव राहु नको.....
गंध शब्दांचे तु छेडुनी पाहा.....
फुलेही तुझेच गीत गातील.....
एकांताच्या क्षणी धुंद होऊनी.....
अबोल भावनांच्याही मग कविता होतील....."
.
.
. कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 29, 2013, 11:07:32 PM
धन्यवाद मिलिंद !चारोळ्या वर परत आल्याबद्दल आणि आमच्या तुकबंदी आवडल्या बद्दल सुद्धा ...। अम्पायरिंग च का ,तुम्ही तर पक्के खिलाडी आहात या खेळातले .... तुमच्या प्रतिक्रिया नेहमीच अपेक्षित आहेत । तुम्ही माझे ब्लॉग वाचले .तुम्ही प्रसंशा केलीत आवडलं । प्रयत्न सफल झाला म्हणायचे ..........  :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 29, 2013, 11:15:37 PM
अरे कुठे हरवलात सगळे.....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 29, 2013, 11:24:51 PM
"अंतरीच्या ओढिने संगम जाहला आपुल्या नात्याचा....
सई दुभंगुन कधी ते जाईल का....??
जरी बरसले बाण हे बोलांचे....
परी कवच हे प्रितीचे कुणी भेदेल का....??"


नाते हे नसे जन्माचे,
परी,असे आपल्या मनाचे गुंफलेले   धागे ,
जरी नसे निभावण्या बंधन काहीही,
तरी सहज शक्य  नाही विसरण्या जोगे ,
अंतरीच्या या शब्द संगमात ,
मिळण्या येतील बरीच काव्य गंगा
संबंध दुभंगण्याचा? :) ;) तर होणारच  नाही पंगा
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 29, 2013, 11:37:07 PM
. छान विनोदबुध्दी वापरलीत. :D :D
.
.
मिळण्या येतील बरीच काव्य गंगा
संबंध दुभंगण्याचा? :) ;) तर होणारच  नाही पंगा
.
.
" अंतरीच्या ओढीने जवळीक जाहली दोघांची....
नाते सई करुया अधिक रुढ....
बंध प्रितीचे करु बळकट....
जसा FEVICOL चा जोड...." :D :D
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 29, 2013, 11:45:06 PM
फेवीकोलला मागणी वाढलीय सिनेमात फार
प्रीतीचे बंध बळकट करण्यासाठी मनात आलाय विचार
तर फेवीकोलच का ?
आपल्या प्रीती अन सई वर श्रद्धा नाही काय यार ? :D :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 30, 2013, 12:01:01 AM
अहो सुनिता जी श्रध्दाचं नाव नका घेऊ....
आता तिला घेऊनी कुठे जाऊ....
खुप रागीट आहे तिचा बाप....
अनं खडुस तिचा भाऊ....
.
.
. सई असता सोबती श्रध्दाचं काय काम....
सईला सोडुन मी का जोडु दुसय्राशी नाम.... :p :D :D
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 30, 2013, 12:08:34 AM
नाते सई करुया अधिक रुढ....
बंध प्रितीचे करु बळकट.... :) :)

नाव प्रीतीचे  प्रीतीने तुम्हीच  तर हो घेतले
दुजोरा दिला आम्ही तर पोटात का हो दुखले ,
खरच प्रीतीची प्रीती नाही आवडत आपल्याला ,
की सईच्या कोप-भवनात जाण्याची भीती आहे तुम्हाला ? :D :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 30, 2013, 12:21:50 AM
नाव प्रितिचे प्रितीने मी घेतले....
त्याला किनार सईच्या प्रितीची....
सोबत हवी असता मला सईची....
का फिकीर करावी मी इतरांची....
.
.
.सुनिताजी तुमच्या धिराने हे पुर्णत्वास नाते आले....
तुम्हास मी कसा विसरेन....
नाव ठेवण्या आमुच्या छकुल्याचं....
तुम्हाला आग्रहाने बोलवेन.... :D :D
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 30, 2013, 12:28:08 AM
छ्कुल्याच नाव ठेवे पर्यंत मजल गाठलीस ,
अभिनंदन आम्हा सर्वां कडून बरीच प्रगती केलीस !!!!! :D :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 30, 2013, 12:39:03 AM
छकुल्यांची नाव तर आधीच....
सईने ठरवली आहेत....
जगी पाऊल ठेवण्या आधी....
त्यांची KG ला ADMISSION पण झाली आहेत....
ठरवत असते सगळं तीच....
मी नुसताच ऐकत बसतो....
वर्तमानाच्या या नियोजनात....
मला भविष्यातील ओझी वाहणारा नवरा दिसतो.... :D :D
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 30, 2013, 01:02:59 AM
[size=0px]ठरवत असते सगळं तीच....[/size][/size][size=0px]मी नुसताच ऐकत बसतो....वर्तमानाच्या या नियोजनात....मला भविष्यातील ओझी वाहणारा नवरा दिसतो... :D :D :D
    [/size]छकुला आहे फक्त [/size][/size]तुम्हा दोघांचा ,[/size]     कुणी खाऊ घालावे अन कुणी [/size]न्याप्पी बदलावी हा वाद तुम्हा दोघांचा
[/size]आम्हाला तर फक्त मेजवानिशी मतलब
[/size]बारसे होईल तेव्हा बोलवा सर्वांना करू नका गफलत :D :D
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 30, 2013, 01:06:42 AM
 :D :D :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 30, 2013, 12:31:41 PM
छान सुनिताजी :D:D

"सुनिता जी इतक्यात करु नका घाई....
जबाबदारी पेलवण्या अजुन नाही सक्षम सई....
सगळं काही होऊ द्या शिस्तीने....
नाहीतर अति घाई संकटात नेई.... :D:D:D "
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 30, 2013, 01:44:50 PM

"सुनिता जी इतक्यात करु नका घाई....
जबाबदारी पेलवण्या अजुन नाही सक्षम सई....
सगळं काही होऊ द्या शिस्तीने....
नाहीतर अति घाई संकटात नेई.... :D:D

ऐकून झाला आनंद इतका
शब्दांत सांगू न शकणार जितका ,
सई ची काळजी आहे तुम्हाला ,
आत्ता तुमच्या वर विश्वास पक्का झाला ,
सई आहे एका शहाण्या हातात मी मानीन
  तुलाच  तिच्या  सुख-दुखाची जाणीव होईन  :D :D 
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 30, 2013, 06:59:23 PM
आभासी या स्वप्नाला कवितेचे रुप आले.....
झाड भावनेचे हे शब्दांनी जाहले ओले.....
मृगजग तुझ्या नयनातील सई.....
कंठी माझ्या ओथंबलेले.....
काव्यफुलांना या क्षणी बहार आला....
निसर्ग सारा दवांनी ओला.....
नाते आपुले दृढ झाले.....
अन सोबतीला शुभेच्छांचा वर्षाव झाला.....
.
.
. कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: Yogesh9889 on June 30, 2013, 08:07:23 PM
Wah... wah...

Char olinichya kavitanchi,
Mast rangleli hi pangat,
Amhi deun pratikriya,
Karto tumchi sangat...

:-D :-D :-D :-D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 30, 2013, 08:12:58 PM
स्वागत आहे योगेश :D
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on June 30, 2013, 08:57:22 PM
वाह! छान चालू आहे कि....वेळ मिळाला कि मी पण यात सहभागी होईन. :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 30, 2013, 09:26:58 PM
मधुरा जी आम्ही वाट बघतोय.... :D
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 30, 2013, 10:31:17 PM
आभासी या स्वप्नाला कवितेचे रुप आले.....
झाड भावनेचे हे शब्दांनी जाहले ओले.....
मृगजग तुझ्या नयनातील सई.....
कंठी माझ्या ओथंबलेले.....
काव्यफुलांना या क्षणी बहार आला....
निसर्ग सारा दवांनी ओला.....
नाते आपुले दृढ झाले.....
अन सोबतीला शुभेच्छांचा वर्षाव झाला.....
.
.सर्वच या जगती
प्रत्यक्ष रुपात नसती
हा सई चा आभास
परी असे पूर्ण विश्वास
एन केन कारणे आपली जमली पंगत
असावा लोभ आता न सोडावी संगत  :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 30, 2013, 10:34:11 PM
वाह! छान चालू आहे कि....वेळ मिळाला कि मी पण यात सहभागी होईन.


आम्ही तुझीच वाट पाहत आहो ,प्लीज मधुरा...।  :) :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 30, 2013, 11:17:32 PM
शब्दांच्या सानिध्यात पंगत नवी पाडुया....
यमकछंदांच्या सोबती नाती नवी जोडुया....
संगतीत या चारोळींच्या..... पर्व नवे सुरु करु या....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 01, 2013, 12:17:11 AM
नवे पर्व सुरु व्हावे
असे माझीही सदीच्छा ,
सुरुवात  केली तुम्ही ,
आमच्या अनेक शुभेच्छा  :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 01, 2013, 12:37:30 PM
शुभेच्छा आपल्या मिळाल्या....
अनं शब्दांच्या भावना आज शब्दांना कळाल्या....
सुरुवात जरी आमुची असली तरी....
आपल्या सोबतीनेच साय्रा कविता जुळवता आल्या....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 01, 2013, 03:12:13 PM
 :) :) :) :D :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 01, 2013, 03:42:55 PM
"जास्त तुम्ही हसु नका....
हसलात तर दात दिसतील....
हसताना चमकणारे दात....
नक्कीच 'COLGATE' चे असतील....
अन अति चमकले जर दात आपले....
तर COLGATE वाले आपल्याला ब्रँड अंबॅसिडर करतील....
असंच हसु चालु राहीलं आपलं....
तर काजल अग्रवालला सगळ सोडावं लागेल....
घरदार चालवण्यासाठी पुन्हा मिठाच्या शोधात फिरावं लागेल....
.
.
. :D:D माफी असावी सुनिता सहज थट्टा केली:D
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 01, 2013, 03:44:33 PM
 :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 01, 2013, 03:52:41 PM
स्माईल नको तुम्हीपण खेळा....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 01, 2013, 04:27:48 PM
कधी कधी स्तब्ध राहून,
बरंच काही सांगता येतं ,
पकडता न येणाऱ्या धाग्यांना,
मनातच गुंफता येतं  :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 01, 2013, 04:56:53 PM
" रेशमाच्या धाग्यांनी आपण.....
कधी कधी नाती विणतो......
भावनांच्या गर्तेखाली.....
कुणासाठी तरी हरवतो....
स्तब्ध राहुनही.....
ठाव मनाचा घेतो....
एकांताच्या समयी सुध्दा.....
इमले स्वप्नांचे रचतो....."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 01, 2013, 05:13:18 PM

रेशमी धाग्यां सारख्या कोमल - मृदू या भावना
उमजेल का कधी कुणा, सखे मज सांग ना ,
सुटेल का ग  बंध सारे दडपनाऱ्या प्रीतीचे ,
उल्ल्हासुनी गाईल का  नव-राग कोकीळ सांग ना  :)............। सुनिता
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 01, 2013, 06:32:24 PM
"तुझिया मनाच्या भावना सखे....
एकदिवस त्याला उमजतील....
कोकिळा ही मग गाईल मंजुळ गाणी....
अनं बंध प्रितीचे मोकळे होतील....
गंधित होतील स्पंदनं श्वासांची....
अन ठाव मनाचे नजरेत भरतील....
तुझ्या प्रितीस साजण्या....
उन्हात मेघ बरसतील....
आरक्त अन कंठित भावनांची....
हृदयी तुझिया शिल्पं होतील...."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on July 01, 2013, 10:21:59 PM
तुम्हां दोघांच्या आग्रहास्तव...माझ्या चार ओळी..... :)


सरली किती युगे,
त्या पल्याड पोचताना,
किती जोरात धावले,
पण वाटच संपेना....


तुझ्याकडे येण्यासाठी
जीव किती हा झूरतो,
तुझ्या विरहात डोळा,
ढग पाण्याचा भरतो...

जिथे तिथे तुझी
प्रतिमा दिसते,
पाहून माझ्याकडे,
किती मोहक हासते.....

जरी इतकी जवळ,
तरी का दुरावा?
प्रेमाचा तो क्षण
वाटे हवा हवा....


मधुरा कुलकर्णी.
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 01, 2013, 10:27:27 PM
मस्तच :D
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 01, 2013, 10:55:12 PM
बऱ्याच ओळींचा प्रसाद दिलाय ,अतिशय आवडला ...  :) :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 01, 2013, 10:58:06 PM
 vijay :)अतिशय आवडली कविता ...  :) :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 01, 2013, 11:07:44 PM
सुनिता आपल्याला कविता आवडली... पैसे वसुल झाले मग... :D
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 01, 2013, 11:35:46 PM
"प्रतिसादाने तुमच्या हर्ष मजला झाला....
चार ओळींच्या चारोळीला आज पुन्हा भाव आला....
पुन्हा सुचले यमकछंदांचे तेच बहाणे तराणे....
अन काव्यफुलांना आज बहार आला....
तुमच्या शब्दांच्या सानिध्यात....
रुतु सारे बहरुन येतील....
मनातील भावनांना शब्दांची परिभाषा मिळेल....
अन या मनभावनांची काव्यफुले होतील...."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 01, 2013, 11:45:28 PM
"प्रतिसादाने तुमच्या हर्ष मजला झाला....
चार ओळींच्या चारोळीला आज पुन्हा भाव आला....
पुन्हा सुचले यमकछंदांचे तेच बहाणे तराणे....
अन काव्यफुलांना आज बहार आला....
तुमच्या शब्दांच्या सानिध्यात....
रुतु सारे बहरुन येतील....
मनातील भावनांना शब्दांची परिभाषा मिळेल....
अन या मनभावनांची काव्यफुले होतील...." :) :)
                                                     संगतीने एकमेका,
                                                      काव्य सुगंध दरवळणार
                                                      ही काव्य सुमनेच,
                                                      आपल्या नात्याची गोष्ट सांगणार.......  सुनिता :)     
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 02, 2013, 10:25:24 AM
"नात्याला आपुल्या आज अर्थ आला....
अन मन भावनांना कवितेची बाग मिळाली....
आनंदाच्या  आसवांनी झाले ओले सारे मन....
अनं आसवांचीही कवने झाली...."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on July 02, 2013, 08:27:44 PM
तुम्हा दोघांमुळे कविता करायला मजा येते आणि उत्साह मिळतो....

माझ्या काही ओळी...


कधी कधी वाटत,
मनोसोक्त जगावं....
कधी तरी पक्ष्यापरी
मुक्तपणे उडावं.....

नियम द्यावे तोडून,
दूर दूर जावं....
कुठल्यातरी वेलीवर
फुल बनून फुलावं....

तेव्हातरी निदान कोणी
फुलासारखं जपावं,
रुतण सोडून काट्यांनीहि
वाऱ्यावरती डुलावं.....


मधुरा कुलकर्णी.
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 02, 2013, 08:55:55 PM
नियम द्यावे तोडून,
दूर दूर जावं....
कुठल्यातरी वेलीवर
फुल बनून फुलावं....
   छान ओळी रचल्यास !मधुरा :) :)

कुणीतरी जपावं मला नाजूक  फुलासारखे
असे प्रत्येकालाच  मनोमनी वाटते न सखे
परी प्रत्येक सुंदर अन अनमोल वस्तूला,
जपण्या साठी जसे  कवच असते काही
तसेच फुलालाही जपण्या साठी काटे असतात नाही ?
पण फुलंच जेव्हा घायाळ होते काट्यांच्या बोचण्याने ,
तेव्हा वाटते हे काट्यांचे कवच नको अन नको ते घायाळणे ,,,,,,,,सुनिता  :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 02, 2013, 09:11:03 PM
"नात्याला आपुल्या आज अर्थ आला....
अन मन भावनांना कवितेची बाग मिळाली....
आनंदाच्या  आसवांनी झाले ओले सारे मन....
अनं आसवांचीही कवने झाली...."विजय छान लिहिलस  :) :)

आनंदीही अश्रू अन अश्रू दुखातही,
आनंद-घन बरसे असे सुखातही.
पाणावलेल्या नेत्रांना उसंत असावा  जरा, 
काळजाचा  ठाव घेते  भावना रुपी धरा  ,,,,,,सुनिता  :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 02, 2013, 09:30:51 PM
 thanks sunita..... :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 02, 2013, 10:41:10 PM
भावना रुपी धरेला आता जपायला हवं....
.
.
.
भावना रुपी धरेला आता जपायला हवं....
आयुष्याच्या वेड्या वळणी मनाला सावरायला हवं....
.
.
.
रोजंच माडतो पसारा  मनाच्या घरात....
आठवणींच्या या पसाय्राला आता आवरायला हवं....
.
.
.
बालपणीच्या बागेत बागडलो मनसोक्त....
वास्तवाच्या जगती आता दौडायला हवं....
.
.
.
काळजाला तडे देणारे भेटतात सर्वजण....
कुणा आपल्यासोबत या तड्यांना सांधायला हवं....
.
.
.
प्रवासी तर नेहमी भेटतात चालताना....
कुणा परक्याला प्रेमाने आपलंस करायला हवं....
.
.
.
इमले स्वप्नांचे तर रोजच रचतो मनात....
घर प्रितीचं आता सईसाठी बांधायला हवं....
.
.
.
आयुष्यात हरत तर नेहमीच आलो....
कुणाच्या आशेसाठी आता जिँकायला हवं....
.
.
.
शब्दांच्या दाहकतेने दुर केले नात्यांना....
रेशमाच्या धाग्यांनी या नात्यांना आता विणायला हवं....
.
.
.
भावना रुपी धरेला आता सावरायला हवं....
आयुष्याच्या वेड्या वळणी सावरायला हवं....
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 02, 2013, 11:05:56 PM
भावना रुपी धरेला आता सावरायला हवं....
आयुष्याच्या वेड्या वळणी सावरायला हवं....सावरायला हवं.... :)
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on July 03, 2013, 09:57:25 AM
कवि - विजय सुर्यवंशी..
इमले स्वप्नांचे तर रोजच रचतो मनात....
घर प्रितीचं आता सईसाठी बांधायला हवं....

sweetsunita....
पाणावलेल्या नेत्रांना उसंत असावा  जरा,
काळजाचा  ठाव घेते  भावना रुपी धरा .....

Madhura....
कधी कधी वाटत,
मनोसोक्त जगावं....
कधी तरी पक्ष्यापरी
मुक्तपणे उडावं.....

फारच छान ..... :) :) :)

आयुष्य अधांतरीच थांबल्यागत झालंय.........
दोन दिवस आयुष्यातले निवांत जगावं वाटतं.........
झुगारून देऊन सगळीच बंधनं......
काही क्षण स्वतः साठीच जगावं वाटतं .......

मिलिंद कुंभारे
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 03, 2013, 10:53:34 AM
आयुष्य अधांतरीच थांबल्यागत झालंय.........
दोन दिवस आयुष्यातले निवांत जगावं वाटतं.........
झुगारून देऊन सगळीच बंधनं......
काही क्षण स्वतः साठीच जगावं वाटतं ....... :) छान!!!!
               आयुष्याचा धापाधापित स्वतः साठी जगायचंच राहिलं
जीवनाचे गुपित हे पूर्णपणे उमलायाचाच राहिलं.... sunita :)
                         
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on July 03, 2013, 11:09:22 AM
किती दिवस असं खोटं खोटं हसावं, खोटच जगावं,
जगाला फसवाव, कि स्वतः लाच समजवावं,
आज पुन्हा वाटतं, कुशीत तिच्या शिरावं,
अन  पुन्हा एकदा मनसोक्त रडावं ......
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 03, 2013, 02:12:13 PM
किती दिवस असं खोटं खोटं हसावं, खोटच जगावं,
जगाला फसवाव, कि स्वतः लाच समजवावं,
आज पुन्हा वाटतं, कुशीत तिच्या शिरावं,
अन  पुन्हा एकदा मनसोक्त रडावं ......
    वाह वाह छान ! :) :) आपण तरुण झाल्यावर वाटते पंख फुटलेत की  काय?  जगाच्या पाठीवर  कुठेही भरारी मारू शकतो, पण दुनियादारीच्या  जाळ्यात फसल्या वर मात्र स्वतः साठी जगणं राहूनच जाते . तेव्हा मायेची पाखर शोधता आईची कुशीच मिळते ,त्याच्या सारखी दुसरी आपल्या हक्काची अन प्रेमाची जागा मिळू शकत नाही ... :)
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on July 03, 2013, 02:47:13 PM

sweetsunita......छान लिहिलंय

दुर्मिळ झालीय ती मायेची कुशी आज मला,
अन खऱ्या अर्थाने झालोय मी पोरका,
स्थिरावलीत सगळीच सुख स्वप्ने क्षणार्धात आता,
भरारी घेऊ कसा, शून्या नजीक थांबल्या साऱ्या दिशा .......  :( :( :(
Title: Re: चारोळी
Post by: swara on July 03, 2013, 06:05:26 PM
दही दिशि आनंद आहे
प्रेमाचा ओलावा आहे
मित्रा सावर स्वतःला मायेची
कुशी अजूनही तुझ्या सोबत आहे
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on July 03, 2013, 06:11:11 PM
धन्यवाद सुनिता दी, मिलिंद दा....

तिच्या शिवाय.....

तिच्याशिवाय जगणे
नाही आता शक्य....
ती च माझ्या शब्दांत,
ती च माझ वाक्य....

ती च सारे ऋतू,
उन्हाळा-हिवाळा,
नयनांमधला ती च
धुंद पावसाळा......

ती च डोकावते आज
माझ्या कवितेत....
तिचीच छाप आहे
माझ्याही प्रतिमेत....


मधुरा कुलकर्णी.
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 03, 2013, 10:24:49 PM
अरे वाह! छान चाललाय खेळ.....
.
.
.


      "चांदरात"
.
.
.
"चांदण्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात....
मी सईला पाहिलं....
पाठमोय्रा लोभस तिच्या प्रतिमेला....
प्रेमळ नजरेने न्याहाळलं....
.
.
हळवं माझं मन....
तिच्यात गुंतत गेलं....
कळालंच नाहि कधी....
नातं प्रितीचं उमलत गेलं....
.
.
चांदण्यांच्या प्रकाशात फुले प्रितीची वेचताना....
साथ आम्हास चंद्राची होती....
प्रितीच्या अशा एकांत समयी....
सई माझ्या मिठीत होती....
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)
.
.
.
(चांदराती वर कविता करता करता....
शृंगारीक कविता झाली....
गांभिर्य वेळीच उमगले म्हणुन....
पुर्ण कविता POST नाही केली.... :| )
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on July 04, 2013, 10:01:52 AM
तीच सारे ऋतू,
उन्हाळा-हिवाळा,
नयनांमधला तीच
धुंद पावसाळा......

मधुरा ताई...
फारच छान लिहिलंय .......
अगदी माझ्याच मनातलं ...... :)

तिचं ऐवजी तीच असायला हवं होतं असं वाटतं ....... :-\

prachi B....
thanks for nice lines.... :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 04, 2013, 11:31:54 AM
दुर्मिळ झालीय ती मायेची कुशी आज मला,
अन खऱ्या अर्थाने झालोय मी पोरका,
स्थिरावलीत सगळीच सुख स्वप्ने क्षणार्धात आता,
भरारी घेऊ कसा, शून्या नजीक थांबल्या साऱ्या दिशा .......   
मिलिंद ,मधुरा ,विजय अन प्राची छान जमलीय तुकबंदी ,अतिशय भावनापूर्ण ..........
दाही दिश्या बोलावतात तुला नको असा उदास होऊ
जीवनाच्या या एकटेपणी नको असा विचलित होऊ
शोधता गवसेल तुम्हाही यशाची पायरी
वेळ  असता हाती तू मनास सावरी
नसे जरी ममत्व अन कुरवाळणारी माय ती
परी असे आशिष तिचा तू न   अनाथ या जगती .........। सुनिता  :)
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on July 04, 2013, 11:43:10 AM
sweetsunita......

नसे जरी ममत्व अन कुरवाळणारी माय ती
परी असे आशिष तिचा, तू न अनाथ या जगती .........

अगदी  बरोबर आहे ...छान .... :) :) :)

ह्यावर मी एक कविता लिहीन लवकरच ......
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 04, 2013, 11:49:51 AM
धन्यवाद मिलिंद  :)तुमच्या कविता आणि चारोळ्यांची आम्ही वाटच पाहतोय
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on July 04, 2013, 02:38:05 PM
मधुरा, सुनिता, प्राची आपल्या प्रतिसादातूनच जन्मास आलेली हि एक कविता .... बघा आवडते का ????


तुझे नसणे ... स्वप्न अधुरे ......

तुझे नसणे
जगण्यास माझ्या
ग्रहण जसे
स्वप्नवत सारे
स्वप्नातच तुझे भेटणे
अंश मी तुझे
कि माझ्यातच
अंश तुझे
चाहूल तुझी
कि भास मनाचे ......

दिस सरले
ऋतू बदलले
नभ एक चिमुकले
ओंजळीत माझ्या
नकळत  अवतरले
त्याचे बिलगणे
त्याचे खिदळणे
बा~ ~  बा ~ ~ असे
बोबडेच बोलणे
सारेच कसे लुभावणे ......

मज कळेना
तुझे नसणे
खंत असे
कि तुझे असणे
सत्य दुजे
दु:ख अंतरीचे
कि सुख परतीचे
आभास म्हणावे
कि मज आशिष तुझे
क्षण फसवे
खेळ नियतीचे
कि गतजन्मीचे
तुझे, स्वप्न अधुरे ......

मिलिंद कुंभारे
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 04, 2013, 03:09:26 PM
 :) :) :) vvvveeeeeeeeeeeerrrrrrrrrryyyyyyyyyyyyyy nice
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on July 04, 2013, 06:30:06 PM
Good one Milind da...
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 04, 2013, 11:17:38 PM
छान आहे, मिलिंद....
.
.
.
"तिला आठवता मनात माझ्या....
आसवांची भरती होते....
एकाकी या जिवनी फाटतो शिड होडीचा....
अनं नौका हि आयुष्याची भुतकाळात बुडुन जाते...."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on July 05, 2013, 09:33:46 AM
Madhura, कवि - विजय सुर्यवंशी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद .... :)

कवि - विजय सुर्यवंशी
तिला आठवता मनात माझ्या....
आसवांची भरती होते.... :)

फारच सुंदर ...अगदी मनातलं बोललात ...... :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 05, 2013, 05:32:52 PM
धन्यवाद मिलिंद ओळी आवडल्या बद्दल...
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 06, 2013, 09:41:14 PM
अरे कुठे गेले सगळे :/
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 07, 2013, 12:13:39 AM
अरे कुठे गेले सगळे  :) :)
          विजय ,,,

भिरभिर शोधे नजर कुणा
हुरहूर वाटे का हो मना
येईल कुणीतरी नव पाहुणा
म्हणून का देता साद या जना ? ............. सुनिता  :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on July 07, 2013, 08:56:07 PM
काळोखामधे या सरली किती युगे,
तुटले रे सारे, जीवनाचे धागे,

ते कोवळेसे नाते सुटले आता मागे,
जाळूनी तयांचे बांधले तु थडगे.....

गेला किती काळ, ओढण्यात हे गाडगे,
मागण्या प्रेमाची भिक हाती या वाडगे.....

~मधुरा कुलकर्णी.
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 07, 2013, 10:45:18 PM
जमली गझल जेव्हा मला, सारे जळून गेले...
अन सादर केली तेव्हा, सारे पळून गेले..... :D :D :D
           

वाह छान मधुरा !!  :) :) 
शब्दांचा हा खेळ अंगवळणी तुझ्या
     कुणी जळो कि प्रशंसा वाहो का तुजवरी बोझा,?
     कविता ,गझल अन चारोळ्या लिहिणे असे तुझी कला
     सर्वदा प्रशंसा अन प्रतिसाद देईन  मी तुला 
    कुणी प्रशंसक असो वा नसो ,मी पदो-पाऊली असणारच तुला .......... सुनिता  :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 07, 2013, 11:03:44 PM

अरे कुठे गेले सगळे  :) :)
          विजय ,,,

भिरभिर शोधे नजर कुणा
हुरहूर वाटे का हो मना
येईल कुणीतरी नव पाहुणा
म्हणून का देता साद या जना ? ............. सुनिता  :)
.
.
.
छान लिहलंत सुनिता...
.
.
.
"नव पाहुण्याचं जाउ द्या...
आता तुम्हीच बोला...
मनाचे गुज शब्दांतुन  खोला...
शब्दांच्या सोबतीने करा चारोळी अनं गजला..."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 07, 2013, 11:10:43 PM
विजय ,,जुनं ते सोनं असलं तरी नव ते हवं असते  :) :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 07, 2013, 11:19:50 PM
माझ्या चारोळी अन कवितांना कुठे अंत आहे
ही शब्द सरिता निरंतर झुळझुळ वाहे ,
कधी वाटे   मिलिंद ,मधुरा ,कवी , तुम्हा  ऐकावे जना
तुम्ही सर्वांनी फुलविलेल्या शब्द बागेची भुरळ पडे मना  :) :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 07, 2013, 11:21:55 PM
चांदण्यांच्या प्रकाशात फुले प्रितीची वेचताना....
साथ आम्हास चंद्राची होती....
प्रितीच्या अशा एकांत समयी....
सई माझ्या मिठीत होती....
                                विजय ,छान कविता :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 07, 2013, 11:30:26 PM
धन्यवाद सुनिता...
.
.
.
"चारोळी करता करता...
कविता मग शृंगारीक झाली...
सईची सोबत अनं खट्याळ हसु...
कविता ही मग गंधित झाली..."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 07, 2013, 11:39:27 PM
गंध तुझ्या कवितेचा mk वर दरवळतो
आम्हा वाचकांच्या मनास भुरळ घालतो  :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 07, 2013, 11:48:57 PM
THANKS SUNITA....
.
.
.
"मी फक्त मांडल्या भावना...
संगतीने तुमच्या आम्हास शब्द सुचले...
भावना त्या छेडुनी पाहिल्या...
आपल्या प्रभावाने तयाचे काव्य जाहले..."
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 07, 2013, 11:56:50 PM
नसे मी इतकी विलक्षना
कि देवू कुणा मी प्रेरणा
तुम्हाच जवळी  हो  शब्द खजाना
मिळती आम्हा तुमच्या पाऊलखुणा ,,,,,,,,,सुनिता  :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on July 08, 2013, 05:51:34 PM

जमली गझल जेव्हा मला, सारे जळून गेले...
अन सादर केली तेव्हा, सारे पळून गेले..... :D :D :D
           

वाह छान मधुरा !!  :) :) 
शब्दांचा हा खेळ अंगवळणी तुझ्या
     कुणी जळो कि प्रशंसा वाहो का तुजवरी बोझा,?
     कविता ,गझल अन चारोळ्या लिहिणे असे तुझी कला
     सर्वदा प्रशंसा अन प्रतिसाद देईन  मी तुला 
    कुणी प्रशंसक असो वा नसो ,मी पदो-पाऊली असणारच तुला .......... सुनिता  :)

धन्यवाद! खूप गोड....धन्यवाद सुनिता!!! :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on July 08, 2013, 06:17:56 PM
माझी एक नवीन गझल.....

विचारात झुरणे मला मान्य नाही,
तुझे दूर जाणे मला मान्य नाही...

समोरून या घाव घालावयाला,
छुपे वार करणे मला मान्य नाही....

उगा वाद घालू नको तू अताशा,
अशी मात होणे मला मान्य नाही....

किती काळ संवेदना गोठवू मी,
मनी 'मात्र' कुढणे मला मान्य नाही....


बना शूर थोडे, भिडा संकटांना,
पराभूत होणे मला मान्य नाही....

~मधुरा कुलकर्णी.
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 08, 2013, 09:27:01 PM

समोरून या घाव घालावयाला,
छुपे वार करणे मला मान्य नाही.... छान  कविता मधुरा  :)
                   
                   काव्याच्या या जगती जागा असावे  प्रेमाला
                      नसो कुणा रागद्वेष ,नसो कुणाचा  छुपा घाला 
                          कुणी हीर ,कुणी रांझा ,संग-साथ लाभावे ,
                              प्रेम रसात तरंगताना फक्त तू न मी असावे ...   सुनिता  :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 08, 2013, 10:34:44 PM
छान उत्तर सुनिता.... :)
.
.
.
"प्रितीच्या या परिक्षेत.... राग अन द्वेशाचे प्रश्न ही येतील....
विरहात सोबती नसेल कुणी....
अन गैरसमज जागा प्रितीचे घेतील....
करुन त्रागा इतरांसी....
बंध नात्याचे विरतील....
आयुष्याच्या भरकटलेल्या क्षणी....
सहजतेच्या भेटी होतील....
अश्रु ढळतील मग पाणावलेल्या नयनी....
अन वेडी मने जुन्या आठवणीत बुडतील....
समजुन येतील आपुल्या चुका.....
अन माफींचे हेवेदावे होतील....
उजळुन येतील गंधित भावना....
अन बंध प्रितीचे पुन्हा जुळतील...."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 09, 2013, 11:08:28 AM
फार फार धन्यवाद विजय! :) !
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on July 09, 2013, 11:14:19 AM
स्तब्ध मी स्तब्ध तू
स्तब्ध सारी राणे वने
स्तब्ध नदीचे हिरवे किनारे
प्रिये तुज सांगू कसे
गुज माझ्या मनीचे ...... :-\
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 10, 2013, 11:48:57 AM
कशी हि शांती अन कशी ही स्तब्धता
संपल्या साऱ्या चारोळ्या की ,
लिहिण्याची नसे उपयोगिता ,
कि म्हणावे झाली सर्वा उपलब्धी आता........ सुनिता :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 10, 2013, 10:26:29 PM
गंभिर आहे आशय :)
.
.

कशी हि शांती अन कशी ही स्तब्धता
संपल्या साऱ्या चारोळ्या की ,
लिहिण्याची नसे उपयोगिता ,
कि म्हणावे झाली सर्वा उपलब्धी आता........ सुनिता :)
.
.
.
.

शांतीच्या असल्या क्षणी कसल्या ह्या आरोळ्या....
जिवनातले विरल्या का भावना....?
की सुचेनात मग चारोळ्या....!!
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on July 11, 2013, 09:16:21 AM
धुंदी कळ्यांना अन धुंदी फुलांना!
शब्दरूप आले मुक्या भावनांना!

:) :) :)
सर्व जन चारोळ्या लिहित रहा ....
:D :D :D
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 11, 2013, 04:28:41 PM
 अरे वाह,मिलिंद ! चारोळ्यांची पंगत मांडणे
                     काम नसे हे कुणा एकाचं   ,
                     मिलिंद ,केदार अन मधुरा
                     तुम्ही पण एखादी चारोळी फेकाचं  !!!  :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on July 12, 2013, 11:31:57 PM
सुनिता दी, खास तुझ्या आग्रहास्तव....

का लपवू भावना आता मी,
ओठांवर आले गीत तुझे....
शब्द तुझे, सूर-ताल तुझे
अन त्याला संगीत तुझे.....

Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 13, 2013, 03:10:58 PM
 :)  धन्यवाद  मधुरा  :)  शब्दबंधाच्या या जगती मी अशी भाम्भावलेली ,
                              न उमजे यमक छंद रचना माझी रेंगाळलेली  :(
Title: Re: चारोळी
Post by: santoshi.world on July 13, 2013, 04:00:38 PM
sunita and madhura tumhi doghi pan instant charolya mast karata ha ... keep posting :)

Title: Re: चारोळी
Post by: santoshi.world on July 13, 2013, 04:09:33 PM
हवे तसे व्यक्त कर स्वत:स
नको पडू शब्दबंधात,
आवडो न आवडो ती कोणा
कर तू रचना मुक्तछंदात...

- संतोषी


:)  धन्यवाद  मधुरा  :)  शब्दबंधाच्या या जगती मी अशी भाम्भावलेली ,
                              न उमजे यमक छंद रचना माझी रेंगाळलेली  :(
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on July 13, 2013, 04:12:14 PM

हवे तसे व्यक्त कर स्वत:स
संतोषी ताई,
पटलंय ... :)



नको पडू शब्दबंधात,
आवडो न आवडो ती कोणा
कर तू रचना मुक्तछंदात...

- संतोषी


:)  धन्यवाद  मधुरा  :)  शब्दबंधाच्या या जगती मी अशी भाम्भावलेली ,
                              न उमजे यमक छंद रचना माझी रेंगाळलेली  :(
Title: Re: चारोळी
Post by: santoshi.world on July 13, 2013, 04:22:04 PM
@ milind : tai vaigare nako mhanu re ... tuzya peksha lahan ahe mi 10 years ne :P :D ..... ani mi tula dada etc. mhananar nahi ha ............ coz tai dada ase nate lavalech pahije ka darveli nikhal maitri asu shakat nahi ka  :-\ ..... ani ho tuza reply na quote chya varati lih ... mhanje patakan lakshat yete ... quote chya aata nako lihus .... reply shodhava lagato mag :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 13, 2013, 07:05:57 PM
(मिंत्रांनो तुमच्या सानिध्यात चारोळी लिहायची म्हटली की त्याची कविताच पुढे सुचते)
.
.
  "परतुनी ती येईल का ?"
.
.
मुक्तछंदानेच शब्दबंध हे जडती...
भावनांच्या सानिध्यात दुर मजला नेती...
अनं आयुष्याच्या हिंदोळ्यावर बसुनी...
यमकछंदांचा पसारा मांडती...
.
.
कुणी विरह तर कुणी प्रिती...
सोबत घेऊनी नात्यांची निती...
आभासी या शब्दांच्या  जगती...
कुणी स्वप्नांचे इमले बांधती...
.
.
प्रितीबंधांचे अविस्मरणीय क्षण...
स्तब्ध ठेऊनी अबोल ओठी...
आठवणीस त्या वाट देण्या...
कुणी करतं कविता आपुल्या सईसाठी...
.
.
कुणी वर्णितं तिचे खट्याळ भाव...
कुणी तिझिया सौंदर्या भुलती...
कुणी तिजला आपुल्या कवेत घेऊनी...
स्वप्नांच्या त्या झुल्यावर झुलती...
.
.
भावनेला शब्द शोधणारा तो कवि...
मग स्वताच्या जगती हरवुन जातो...
स्वप्नात दिसणाय्रा सईकरता...
सजिव भावनांची कविता करतो...
.
.
दिवसा गणिक दिवस हे निघुनी जाती...
हा वेडा शब्दगंधात विरतो...
अनं स्वप्नातल्या स्वप्नपरि साठी...
सजिव भावनांना शब्द शोधतो...
.
.
सोडुनी जाता सई त्याला या नश्वर जगातुनी...
आयुष्यातली त्याची उमेद संपते...
सोडुनी ती गेल्यावरही...
तिच्या कवनांनी त्याच्या मनाची वही भरते...
.
.
करतोय तो विचार अजुनही...
परतुनी ती येईल का...??
विरहाचा तो योग संपुनी...
गीत प्रितीचे साकार होईल का...??
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 13, 2013, 11:09:38 PM
मुक्तछंदानेच शब्दबंध हे जडती...
भावनांच्या सानिध्यात दुर मजला नेती...
अनं आयुष्याच्या हिंदोळ्यावर बसुनी...
यमकछंदांचा पसारा मांडती  :) :) :) :) :)
                                      ही यमक-छंदाची जुळवण जमेना मला
                                      म्हणून चारोळीचाच प्रसाद देते  आहे तुला
                                        कविता लिहिणे आताशा जरा अवघडच झाले
                                        मात्रा यमकाच्या गुंतागुंतीत मी चक्रमच झाले  :(.... सुनिता
Title: Re: चारोळी
Post by: vinod.patil.12177276 on July 14, 2013, 11:05:30 AM

जीवनाचा अर्थ माझ्या
शब्दाविन सापडेना
आत मनाशी शब्द भांडले
शब्द शब्दाला जुळेना

ते वेड माझे कधी मलाही
सोडुन गेले कळेना
मन लोटले खाईत तरी
वेड मनास येईना ...
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 14, 2013, 12:41:23 PM

मुक्तछंदानेच शब्दबंध हे जडती...
भावनांच्या सानिध्यात दुर मजला नेती...
अनं आयुष्याच्या हिंदोळ्यावर बसुनी...
यमकछंदांचा पसारा मांडती  :) :) :) :) :)
                                      ही यमक-छंदाची जुळवण जमेना मला
                                      म्हणून चारोळीचाच प्रसाद देते  आहे तुला
                                        कविता लिहिणे आताशा जरा अवघडच झाले
                                        मात्रा यमकाच्या गुंतागुंतीत मी चक्रमच झाले  :(.... सुनिता
:p
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on July 14, 2013, 10:15:11 PM
Thanks Santoshi. :)

sunita and madhura tumhi doghi pan instant charolya mast karata ha ... keep posting :)




आता माझी एक चारोळी....


डोळ्यात हरवले शब्द अन,
मी बोलताना थांबले,
अंतर तुझ्या-माझ्यातले,
  नकळत माझ्या संपले.....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 14, 2013, 10:34:31 PM

डोळ्यात हरवले शब्द अन,
मी बोलताना थांबले,
अंतर तुझ्या-माझ्यातले,
  नकळत माझ्या संपले..... :) :)
         अरे वाह! मधुरा  :)
आता माझी बारी हं !! :) :)
   
शब्द हरवले डोळ्यात कि ,मूक झाल्या भावना ,
,गुपित सखे अंतरीचे आज मज सांगना
    सख्य तुझे नी माझे असे काव्यातुनी बहरलेल ,
निरंतर साद तुझी मज  येईल ना सखे सांगना, :) :) :)
     
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 14, 2013, 10:38:20 PM
sunita and madhura tumhi doghi pan instant charolya mast karata ha ... keep posting :)
 
               :)
धन्यवाद संतोषी !!! :) :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 14, 2013, 11:45:33 PM
मुक्या भावनांना बघ आता सई....
पाणिदार डोळ्यांची साथ आहे....
कळले मजला तुझिया मनाचे गुपित....
अनं जपलेल्या शब्दबंधांची जी बात आहे....
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 15, 2013, 02:24:50 PM
nice "charoli"vijay. :)
Title: Re: चारोळी
Post by: vijaya kelkar on July 15, 2013, 06:47:32 PM
               मध्येच डोकावू?

  'फडफडणाऱ्या पापणीची
       व्याकुळता बोचली
  धडधडणाऱ्या  जीवाची
       अधीरता टिपली '
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 15, 2013, 09:29:57 PM
        "निशब्द"
.
.
मनाचा अधिरपणा आज... तरल त्या डोळ्यांना कळला...
अबोल भावनांचा थेँब आज...
सईच्या गालावरुन ओघळला...
ओंजळीत तिची आसवं झेलताना...
अलगद तो थेंब मनात भिनला...
.
.
पापण्यांची होणारी झापड...
आता मात्र बंद होती...
झुळझुळ वाहणाय्रा वाय्राची...
गतीही आता मंद होती...
.
.
ओंजळीत थेंब झेलण्याची...
माझी ही नवी रित होती...
आसवांसोबत भिजलेली...
गंधित ती प्रित होती...
.
.
वेचुन ते थेंब सारे...
केले मी तयांस शब्दबध्द...
हरवुनी आता तिझिया प्रितीत...
मी मात्र राहीलो निशब्द...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 15, 2013, 10:12:17 PM
 :) very nice vijayaa n kavi  :) :)
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on July 16, 2013, 10:11:55 AM
संतोषी ताई,
माणूस हा त्याच्या वयाने मोठा होत नसतो, पण त्याचे कर्तव्य, त्याचं अंतर्मन, दुसर्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन हे सर्व त्यास मोठे बनवतात. मला माहित होते तुम्ही माझ्यापेक्षा १० वर्षे लहान आहात, पण MK वर आपण moderator म्हणून आपले मार्गदर्शन देत असता त्यामुळे नुसतंच संतोषी असे संबोधणे मला योग्य नाही वाटले ... असो आपल्यात एक निखळ मैत्री पण असू शकते यांत शंकाच नाही .... यापुढे मी तुम्हाला नुसतं संतोषी असंच म्हणणार, अर्थात तुमची काही हरकत नसेल तर ....  :-\

हो आणि मी चीत्ररुपांत कविता कशी लिहावी हे आपल्याकडूनच शिकलोय आणि तेही फक्त MK वरच, त्याबद्दल मी आपला नेहमीच आभारी आहे ...
असंच मला आता लयबद्ध अश्या कविता लिहायला शिकायचे आहे बघू या कितपत यश मिळतंय ...  :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 16, 2013, 03:15:12 PM
अरे मिलिंद, मला सुद्धा चित्र रुपात कविता कश्या लिहितात सांगा न ! :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 20, 2013, 11:53:33 AM
. .बंध शब्दांच्या नात्याचे . . .
.
.
.
संगतीने साय्रांच्या आपुल्या...
चारोळीची ही पंगत रंगली...
कुणी वेचली आसवं सईची...
तर कुणी तिची प्रित वर्णिली...
.
.
शब्द सारे मज कवेत आले...
सोबतीत आपुल्या गंधित झाले...
मिळाल्या आपल्या साय्रा प्रतिक्रिया...
अनं मज आभाळ ही आता ठेंगणे झाले...
.
.
शब्दांचा हा ठेवा जपला आपण...
अन माय मराठीचे बोल मिळाले...
सोबतीने आपल्या कळले गुज कवितेचे मजला...
अनं नात्यांचे बंध आज यमकछंदात मिळाले...
.
.
भावनाहीन आधी होतो मी...
परि आज काव्यसुमने गोळा केली...
मुक्या त्या मनाने आज...
शब्दाविनाच कविता केली...
.
.
भेदरलेल्या मनाचे भाव आज...
कवितेतुन आता सईला कळाले होते...
आर्त त्या भावनेला मग...
बळ शब्दांचे आज आले होते...
.
.
यमकछंदांच्या या जगती...
सारेच मनाला प्रिय आहे...
शब्दांच्या या नात्याचे...
सारेच मग मनाला साहे...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on July 20, 2013, 01:26:55 PM
कवि - विजय सुर्यवंशी,
छान .... :)

कल्लोळ शब्दांचा

पुरे कल्लोळ शब्दांचा,
पुरे खेळ भावनांचा,
मज वाटतसे आता,
छन्द, वृत्त यमकांचा,
ध्यास नुसता धरावा,
एक लिहावी कविता,
अन रचता कविता,
लय मिळावी शब्दांना,
सूर जुळता काव्याला,
मजा लुटावी गातांना...

मिलिंद कुंभारे
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 20, 2013, 01:32:34 PM
आभारी आहे मिलींद...
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on July 21, 2013, 07:04:47 PM
Nice!!!


कवि - विजय सुर्यवंशी,
छान .... :)

कल्लोळ शब्दांचा

पुरे कल्लोळ शब्दांचा,
पुरे खेळ भावनांचा,
मज वाटतसे आता,
छन्द, वृत्त यमकांचा,
ध्यास नुसता धरावा,
एक लिहावी कविता,
अन रचता कविता,
लय मिळावी शब्दांना,
सूर जुळता काव्याला,
मजा लुटावी गातांना...

मिलिंद कुंभारे



शब्दांत जन्म व्हावा,
कवितेत श्वास घ्यावा...
खोल मनात रुतावा,
असा ध्यास कवितेचा....

अर्थ मनास भिडावा,
नसानसांत भिनावा,
शब्द हि ना उरावा,
असा ध्यास कवितेचा....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on July 23, 2013, 01:21:57 PM
thanks madhura,

शब्दांत जन्म व्हावा,
कवितेत श्वास घ्यावा...

nice lines.... :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 23, 2013, 09:57:49 PM
शब्दांत जन्म व्हावा,
कवितेत श्वास घ्यावा...
खोल मनात रुतावा,
असा ध्यास कवितेचा....

अर्थ मनास भिडावा,
नसानसांत भिनावा,
शब्द हि ना उरावा,
असा ध्यास कवितेचा....wah! wah! madhura! :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on July 26, 2013, 07:13:38 PM
Thanks Sunita di, Milind da!
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on July 27, 2013, 02:28:10 PM
काल सुचल्या दोन ओळी....

खोटे खोटे सारे काही
खरेपणा मज गवसत नाही,
का जगते या जगात अजुनी
मलाच माझे समजत नाही....
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 27, 2013, 04:18:06 PM

काल सुचल्या दोन ओळी....

खोटे खोटे सारे काही
खरेपणा मज गवसत नाही,
का जगते या जगात अजुनी
मलाच माझे समजत नाही....
.
.
जगाच्या त्या नित्य स्वभावाचे...
नको तु मनावर घेऊस...
प्रत्येक ओळ कर थेंबासवें गोळा...
जसा रिमझिम झरणारा पाऊस...
.
.
खोटे खोटे असले जरी...
क्षण ते सोबती राहु दे...
समजुन घेण्या या जगाला...
कविता तुझी वाहु दे...
.
.
जगण्याला स्वताच्या तु नको अव्हेरु...
कारण तुझ्यासाठी अजुनही कुणीतरी  जगतं आहे...
सुचणाय्रा तुझिया नित्य चारोळीस...
कविता कुणीतरी लिहीत आहे...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.     
        (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on July 27, 2013, 05:13:19 PM
मस्त रे विजय दादा....!!
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 27, 2013, 08:20:23 PM

मस्त रे विजय दादा....!!
.
.
आभारी आहे मधुरा..
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 28, 2013, 04:59:39 PM
chanch chalalay charolicha khel  :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 28, 2013, 05:32:26 PM

chanch chalalay charolicha khel  :)
.
.
सुनिता आता तुमची बारी.
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 28, 2013, 10:14:46 PM
कशी लिहू चारोळी
कुंद झालेय विचार
शशांक मिलिंद ने केलाय
यमक छंदाचा प्रचार  :) :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 28, 2013, 10:43:23 PM

कशी लिहू चारोळी
कुंद झालेय विचार
शशांक मिलिंद ने केलाय
यमक छंदाचा प्रचार  :) :)
.
.
.
बघा सुनिताजी,
.
.
शब्दांचं कर्ज तुम्ही...
शब्दांनी काढताय...
चारोळीची व्यथासुध्दा...
चारोळीतुन मांडताय...
.
.
दुसय्रांच्या यमकछंदाचं करोनी कौतुक...
स्वताःचं मत चारोळीतुन व्यक्त करताय...
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 29, 2013, 11:57:51 AM
होऊनिया आभारी मी कशी होऊ उतराई
चारोळ्या करता करता झाली कवितांची पुण्याई
कधी पंढरीची दिंडी तर कधी तारुण्याची अंगडाई
तुम्हा सर्वांचे आभार करून घेतली  तुम्ही गोड्वाई  :) :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 29, 2013, 12:09:26 PM

होऊनिया आभारी मी कशी होऊ उतराई
चारोळ्या करता करता झाली कवितांची पुण्याई
कधी पंढरीची दिंडी तर कधी तारुण्याची अंगडाई
तुम्हा सर्वांचे आभार करून घेतली  तुम्ही गोड्वाई  :) :)
.
.
छान...
.
.
शब्दांचे खेळ अन शब्दाचा मेळ...
आठवणीच्या गर्तेसवेँ सरत गेळी वेळ...
करुनिया भक्ती माय बोलीची...
अवघेची मिळाले शब्दांचे बळ...
.
.
मांडोनिया तरुणाईची अंगडाई...
आपण दिंडीवरीही कविता केली...
आषाढीच्या त्या वैष्णवात...
शब्दांची पालखीही  वाहीली...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 29, 2013, 12:22:49 PM

माझ्या छंदाला तुमच्या कडून  उत्तर मिळतेच ,पण माझ्या बर्याच कवितांना मात्र नाही मिळत 
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 29, 2013, 01:39:55 PM


माझ्या छंदाला तुमच्या कडून  उत्तर मिळतेच ,पण माझ्या बर्याच कवितांना मात्र नाही मिळत
.
.
माफी असावी...
हल्ली या MECHANICAL SYSTEM DESIGN मुळे,  वेळ देता येत नाही..
पण आपलं लेखन खरंच मनाला भावतं..
.
.
मी पाहीन त्या साय्रा कविता...
ज्या वाचायच्या राहिल्यात... :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on July 29, 2013, 07:16:59 PM
सुनिता दी, इतरत्र धागे शोधण्यात वेळ जातो ग......इथेच कर ना तुझ्या नव्या कविता पोस्ट.....आम्ही वाचून रिप्लाय देऊ शकू ग. आणि एकाच धाग्यावर बर पडत! I hope you understand!!! Don't misunderstand me!!  :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita on July 30, 2013, 12:21:38 PM
धन्यवाद मधुरा आणि विजय !माझ्या काही कविता ?याच site वर पोस्ट  आहेत आणि हिंदी कवितांचा ब्लॉग पण माझ्या पोस्ट खालीच दिलेला आहे फ़क़्त क्लिक करा आणि प्रतिक्रिया द्या चांगल्या असो वा वाईट  नेहमीच स्वागत आहे
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 30, 2013, 02:47:00 PM
धन्यवाद मधुरा आणि विजय !माझ्या काही कविता[ ?]याच site वर पोस्ट  आहेत आणि हिंदी कवितांचा ब्लॉग पण माझ्या पोस्ट खालीच दिलेला आहे फ़क़्त क्लिक करा आणि प्रतिक्रिया द्या चांगल्या असो वा वाईट  नेहमीच स्वागत आहे
:) :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 30, 2013, 06:26:42 PM

धन्यवाद मधुरा आणि विजय !माझ्या काही कविता[ ?]याच site वर पोस्ट  आहेत आणि हिंदी कवितांचा ब्लॉग पण माझ्या पोस्ट खालीच दिलेला आहे फ़क़्त क्लिक करा आणि प्रतिक्रिया द्या चांगल्या असो वा वाईट  नेहमीच स्वागत आहे
:) :)
.
.
.

सुनीता, जरुर वाचेन तो ब्लॉग.....
.
.
हिंदी असो वा मराठी..
सदैव तैयार कवितेसाठी,..
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 30, 2013, 10:03:45 PM
thanks  :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on August 07, 2013, 07:31:37 PM
नाही सरळ हि वाट,
कधी झाडी घनदाट...
कधी काट्यांच्या पायघड्या,
कधी पाकळ्यांची भेट....

आज ठरवून टाक,
येशील कि नाही,
टाळून विषय
आज पळायचे नाही....

Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on August 08, 2013, 01:54:05 PM
नाही सरळ हि वाट,
कधी झाडी घनदाट...
कधी काट्यांच्या पायघड्या,
कधी पाकळ्यांची भेट....

आज ठरवून टाक,
येशील कि नाही,
टाळून विषय
आज पळायचे नाही...welcome back,madhura  :)

फारच छान चारोल्या ,,, :) :)

खरेच असे अवघड ही वाट जरी ,
काव्याच्या पूजाऱ्यांना असे गोड तरी ,
कधीही आळस नाही वेळ असो कुठलीही ,
काव्यासंगे हि प्रीत सदा फुलत राहे उरी  :) :)sunita
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on August 08, 2013, 02:39:08 PM
मधुरा ताई
ती चारोळी कुणासाठी ????

गूढ जीवनाचे

वळणे जीवनी
कितीच असती
कधी  साधे सोपे
काही आड रस्ते

कंपने  धरणी
उधाण सागरी
भय ते मृत्यूचे
मज क्षणोक्षणी

कधी वाटतसे
स्वच्छंदी जगावे
घ्यावे ठरवून
आयुष्य आपले

गीत जीवनाचे
तुजसवे गावे
गूढ जगण्याचे
उमजून घ्यावे

मिलिंद कुंभारे

Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on August 08, 2013, 02:42:20 PM
sweetsunita,

अशीच प्रीत सदा फुलत राहू दे...... :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on August 08, 2013, 07:20:59 PM
मिलिंद दा,
माझी इंजिनीअरिंगला जातानाची माझी मनोवस्था होती ती.... :D
बाय द वे, मी लहान आहे रे दादा तुझ्या पेक्षा...मला 'मधुरा' म्हण.....'ताई' नको. :)
तुझी कविता चांगली आहे.
_____________________________________________________
_____________________________________________________


सुनिता दी,
      :-*
    धन्यवाद!  :) 
तुझीही चारोळी छान होती....
आता मी....



दुनियेत हि साऱ्यांची
भलतीच दुनियादारी,
काट्यांचे कुंपण
त्यात मन कळीपरी...

कवितेस पुन्हा आज
लपेटून घ्यावे...
कल्पनांचे विश्व
नव्याने फुलावे....
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on August 08, 2013, 07:40:32 PM
भावनाविश्वी रमताना या...
कुणाची याद ठेवु नको...
सुगंध वेचताना गुलाबाचा...
अस्तित्व काट्याचे विसरु नको...
जिवनपटाच्या या कठपुतल्या आपण...
परि भाव मनाचा विसरु नको...
हे चांदणे शिँपताना तु...
किरणाच्या मोही अडकु नको...
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on August 08, 2013, 07:59:18 PM
खूप छान, विजय.

मोह न धरला, कधी कशाचा
सारे सारे टाळत गेले,
आशांचे अन इच्छांचे,
मनोरे मनी जाळत गेले....

हरवले हातून सगळे,
आश्रू भूवरी ढाळत गेले,
कल्पनेच्या फुलांचे गजरे
केसांमध्ये माळत गेले.....
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on August 08, 2013, 08:27:58 PM
व्यर्थ न जातिल...
आसवं ही ढाळलेली...
अनुभवाने जाहली दुर...
आमिषं तु टाळलेली...
या साय्रा त्या यत्नानं...
गंधित फुलं गजय्रात तु माळलेली...
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on August 09, 2013, 12:52:26 PM

कवि - विजय सुर्यवंशी,

खूप छान.... :)

हे चांदणे शिँपताना तु...
किरणाच्या मोही अडकु नको...
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on August 09, 2013, 04:42:57 PM
मिलिंद दा, तुझी चारोळी कुठे आहे?

चल, मीच लिहिते....

सांगून बसले गुज मनीचे,
असे कसे या अवचित वेळी,
सरीवर सर, पावसाची झड,
हि तर निसर्गाचीच खेळी....

धुंदित क्षण हे मोहरलेले,
दव बनुनी हळू पाझरलेले,
आता शुद्ध मी हरपून बसले,
मनातले मज काही गवसले.....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on August 10, 2013, 12:08:53 PM
Madhura,
खूप छान.... :)

शब्दच गोठले
थिजल्या भावना
नाही गवसत
आता सूर नवे
लिहू काय सखे  ......

संपली पायवाट
रस्ते लांब लांब
विरलित स्वप्ने
धुंदीत क्षण ते
सखी शोधू कुठे ......
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on August 10, 2013, 02:23:15 PM
मिलिंद दादा,
  चांगला आहे मुक्तछंद!


Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on August 10, 2013, 06:02:23 PM


कवि - विजय सुर्यवंशी,

खूप छान.... :)

हे चांदणे शिँपताना तु...
किरणाच्या मोही अडकु नको...
.
.
.
.
thanks milind.
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on August 10, 2013, 06:03:20 PM

Madhura,
खूप छान.... :)

शब्दच गोठले
थिजल्या भावना
नाही गवसत
आता सूर नवे
लिहू काय सखे  ......

संपली पायवाट
रस्ते लांब लांब
विरलित स्वप्ने
धुंदीत क्षण ते
सखी शोधू कुठे ......
.
.
.
.
milind mastach...... thet bhidlya bhaavanaa.


Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on August 12, 2013, 08:14:12 PM
म्हणतात लोक सारे,
तू नाहीस आता माझी....
एकांत चिडवून जातो,
तू नाहीस आता माझी....

पण अजूनही मात्र
तुझाच आहे मी...
परतून ये केव्हाही,
तुझाच आहे मी....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on August 12, 2013, 09:33:20 PM
भावनाविश्वी रमताना या...
कुणाची याद ठेवु नको...
सुगंध वेचताना गुलाबाचा...
अस्तित्व काट्याचे विसरु नको...
जिवनपटाच्या या कठपुतल्या आपण...
परि भाव मनाचा विसरु नको...
हे चांदणे शिँपताना तु...
किरणाच्या मोही अडकु नको...


        शब्दच गोठले
थिजल्या भावना
नाही गवसत
आता सूर नवे
लिहू काय सखे  ......

संपली पायवाट
रस्ते लांब लांब
विरलित स्वप्ने
धुंदीत क्षण ते
सखी शोधू कुठे ......



मस्तच आहे..... मिलिंद,विजय  आणि मधुरा .... :) :) :)
दुनियेत हि साऱ्यांची
भलतीच दुनियादारी,
काट्यांचे कुंपण
त्यात मन कळीपरी...

कवितेस पुन्हा आज
लपेटून घ्यावे...
कल्पनांचे विश्व
नव्याने फुलावे...
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on August 12, 2013, 09:57:18 PM
वनवास हा दुराव्याचा क्षणात आता दूर व्हावा 
कवितेच्या  फुलांना  आता काव्य वेलींवर बहर यावा
नाही चालणार  आता कुचराई न कोणाचा बहाणा
झटपट मधुरा, मिलिंद ,अन विजय चारोळ्यांचा प्रसाद द्या ना  :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on August 12, 2013, 10:28:34 PM
राजवाडे, अन बगीचा
सारे फक्त भास होता...
सीतेच्या कपाळी फक्त
रामासोबत वनवास होता...
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on August 14, 2013, 07:46:57 PM

राजवाडे, अन बगीचा
सारे फक्त भास होता...
सीतेच्या कपाळी फक्त
रामासोबत वनवास होता...
.
.
.
.

छान  चारोळी जमली  आहे...
.
.
.
भोगलेल्या वनवासा नंतर.....
नच  जाहले दूर ते अंतर.....
आजन्म शाप हां का भोगते सीता...????
पुरुशोत्तमाविना  निरंतर !!!!!


संशयाने विटले सारे  मन.....!!!
तिलाच दोषी मानती हे जन.....!!!
मानली जिला सोबती मनाने .....
परि शाप का भोगावा  एकटीने ....????
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on August 15, 2013, 10:04:20 AM
खूप छान विजय, खूप छान!

विश्वासाच्या आगीमध्ये
होरपळल्या कितीक सीता,
समजातल्या रामानेही,
पाठ फिरवली बघता-बघता....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on August 15, 2013, 02:36:31 PM
nice vijay and madhura  :) :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on August 16, 2013, 12:02:53 PM
मधुरा ,विजय आता माझी बारी ...............। :)
    कनकाहूनही शुद्ध आहे सीता जाणीव रवणालाही असे
    पण राक्षसी श्रापातून मुक्त होण्या रावण धडपडत असे
    मिळाला त्याला राम नामाचा अमृत कुंभ म्हणून
    सीतेच्या अपहरणाची लीला रचली रावणाने जाणून  :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on August 17, 2013, 02:25:49 PM
सीतेचे अपहरण झाले तेव्हा रामाने कदाचित अश्या भावना व्यक्त केल्या असाव्या ......

कुठे कुठे शोधू तुला
रिता सारा आसमंत
तारकाहि मंदावल्या 
शांत सागरी किनारा ....

सुना सुना राजवाडा
कोमेजला पारिजात 
ओढ तुज मिलनाची
कि पाठलाग नुसता ......

निळ्याशार डोळ्यांत ह्या
समुद्र उधाणलेला
शोधू कुठे चोरवाटा
तळ तुझा गाठणाऱ्या ....

ध्यास तुझाच धरशी
मन माझे वेडेपिसे
तुझी चाहूल म्हणावी
कि हुरहूर नुसती ......
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on August 17, 2013, 03:55:10 PM
खूप छान मिलिंद दादा आणि सुनिता दी.....
_____________________________

सीतेच्या मनातील भावना.....

सावली तव बनून राहिले,
वनातही मी केली सोबत,
तुझ्याचसाठी राज्य सोडले,
वनवासी झाले वाटा तुडवत.....

सोडून आले मागे मागे,
हक्काची माझ्या सारी दौलत,
बनून राहिले फक्त तुझी,
जरी नव्हती तुजला काही मिळकत....


सुंदर होते वैभव त्याचे,
सोन्याने लंकेला मढले,
तरही त्याला नाही भुलले,
पावित्र्य मी अफाट जपले

सोडवायला घेऊन सेना,
आलास तू जेव्हा तिथे,
भासले ते प्रेम होते,
धाऊन आले जे इथे....

पण घातलास घाव तू
विश्वासाचे तुकडे झाले,
अग्निपरीक्षा दिली मी जरी,
तुझेच मन रे कलुषित झाले....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on August 17, 2013, 04:00:49 PM
फारच छान मधुरा आणि मिलिंद  :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on August 17, 2013, 04:38:03 PM
धन्यवाद सुनिता!! Inbox check कर.
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on August 21, 2013, 01:06:49 PM
अग मधुरा मी inbox चेक केला पण काही मिळालं नाही !
   
हुरहूर या मनाला सतत लागून राहे
आपुलकी अशी कुणाची संग संग साहे 
तुमच्या गोड मनांची साथ असेल जर का ,
जीवनी या माझ्या सरिता प्रीतीची वाहे ............. :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on August 21, 2013, 08:03:23 PM
मी तुला मेल पाठवला होता अग....कि मला तुझा FB ID दे म्हणून.


भेटून तुजला रे सांगेन कधी मी,
परी अजुनी भासते का सांग शब्दांची कमी?
वाट बघते मी तुझी एकांत वेळी का अशी?
जरी तू तिथे नसण्याची वाटते मजला हमी....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on August 21, 2013, 09:52:44 PM
mi tula id pathawila aahe tula midala ki nahi? :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on August 22, 2013, 08:49:47 AM
Nahi g.... :(

Tu mala friend request pathavashil ka? Mazya FB ID var?
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on August 22, 2013, 09:01:59 PM
ok  :) nakkich  :)
Title: Re: चारोळी
Post by: Maddy_487 on September 10, 2013, 06:34:03 PM
उन्मळून आल्या भावना 
शब्दही सारे विरले
मृग्नायानांत तुझ्या
मनीचे गुपित उमगले
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on September 14, 2013, 10:11:06 AM
उगाच नव्हत्या भरल्या
माझ्या डोळ्यांच्या घागरी....
उगाच नव्हत्या उठल्या
लाटा अथांग या सागरी....
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on September 14, 2013, 01:40:30 PM
Madhura,  Maddy.....

फारच छान..... :) :) :)

अबोल त्या भावना
शब्दांत मी गुंफता
पाऊस अंतरीचा 
नयनातून बरसला ......  :'( :'( :'(
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on September 15, 2013, 02:17:33 PM
:)

सोबतीला ना कुणी पण
एकटा नाहीच मी....
ऐकले होते जरी तू
बोललो नाहीच मी!!!!
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on September 21, 2013, 01:32:53 PM
 :)

तू न बोलताही,
कळते मज सारे काही,
तू सोबत नसतानाही,
तू असण्याची हुरहूर मनी ......
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on September 21, 2013, 05:26:19 PM
सोडून गेली होतीस मजला
सापडेन तुजला तिथेच मी!!!
मनात तुझ्या माझाच निवारा,
सापडेन तुजला तिथेच मी!!!
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on September 21, 2013, 08:21:22 PM
सोडून गेली होतीस मजला
सापडेन तुजला तिथेच मी!!!
मनात तुझ्या माझाच निवारा,
सापडेन तुजला तिथेच मी!!! ,,,,,

         
             वाह वाह मधुरा अन मिलिंद छान सुरु आहे ,
               आत्ता मी .... मनातील बंध हे, असे कधी का तुटायचे
                               जीवनाच्या वळणावरी हे पुनःश्च  गवसायचे ,
                               कित्येक युगांचा दुरावा तरी क्षणात मन गुंतायचे ,
                               संग असता या युगाला क्षणो -क्षणी  जगायचे .............
                                                     सुनिता  :) :) :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: vijaya kelkar on September 22, 2013, 04:16:32 PM
   मिलिंद,मधुरा आणि सुनीता कित्ती  छान!!!
     आता मला असे वाटते .....

  ' सात जन्माच्या गाठी नयनात वसल्या
      हृदयाच्या रेशीमगाठी प्रीतीत पक्या बसल्या   
         निळकमळ फुलले जागला भुंगा
          घाली- घाली अवती भवती पिंगा
           
         
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on October 03, 2013, 03:51:03 PM
sweetsunita, vijaya kelkar......

chan..... :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on October 10, 2013, 09:37:20 PM
सांग का रे जीवनाचे
सूर सारे चोरले???
एकटे बेसूर गाणे,
नशिबात माझ्या कोरले????  :( 

--------------------------------
:)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on October 10, 2013, 10:18:56 PM
वा मधुरा ,मिलिंद आणि विजया . मस्त चाललंय !


सांग का रे जीवनाचे
सूर सारे चोरले???
एकटे बेसूर गाणे,
नशिबात माझ्या कोरले????  :( 
.
.
जीवनाचे सूर का कधी असे हरपायचे   
अल्प विरामा पलीकडे हे पुनश्च गवंसायचे
करू  नकोस क्रन्दने जीवघेणी तू  अशी
गात राहा कोकिळे परी जीवन गाणे तू कशी !!!!!!!!! :) :) :) :) :)be happy.............
                                                                                                            .sunita  :) :)




Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on October 15, 2013, 01:26:52 PM
thanks  :) :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on October 15, 2013, 09:54:48 PM
वा..मस्त!

ओलसर स्पर्श अलगद भावनांचा.....
दरवळ सुवासिक, मोहरल्या स्पंदनांचा....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on October 17, 2013, 10:18:04 PM
ओलसर स्पंदनांचा अलगद स्पर्श
सुवासिक दरवळतोय मनातील हर्ष
घे भरारी उंच गगनी तू अशी
बेबाक बंधनाचा धागा तोड अन अपेक्षांच्या आभाळा चुटकीत घे कुशी ,,,,,
all the best !!!!
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on October 19, 2013, 03:44:58 PM
Thanks Sunita!! :)
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on October 22, 2013, 10:17:10 AM

स्पर्श अन हर्ष ते,
सई  तुझ्याच सोबतीचे....
चांदण्यांचे आभास ते,
दोघांस नवतीचे....
.
.
तुटणारे धागे ते,
बेबाक बंधनांचे....
अन वाढणारे ते,
ठोके स्पंदनांचे.....     
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on October 23, 2013, 07:01:25 PM
 स्पर्श अन हर्ष ते,
सई  तुझ्याच सोबतीचे....
चांदण्यांचे आभास ते,
दोघांस नवतीचे....
.
.
तुटणारे धागे ते,
बेबाक बंधनांचे....
अन वाढणारे ते,
ठोके स्पंदनांचे.....     

                 welcome back  :) :) :) :) :)
                              सारखेच वाटे नवतीचे
                               जुनेच ऋणानुबंध हे\
                              प्राचीन  कनका परी
                               शुद्ध अन अनमोल हे ......... सुनिता  :)



                                 तोडून बेबाक बंधन
                                   झेप घेऊ आकाशी
                                   मनातील स्वप्नांना
                                   भरारी देऊ जराशी ............... सुनिता  :)

               
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on October 24, 2013, 01:14:18 PM
sweetsunita, कवि - विजय सुर्यवंशी, Madhura...

वा .... वा ....

आता माझी चारोळी ...... :)

नको साथ सोडू, अश्या सांजवेळी,
नको बंध तोडू, ऋतू प्रेमरंगी......

अशी प्रीत न्यारी, मनी ध्यास तुझा,
रहा तू सये श्वास होऊन माझा ......
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on October 24, 2013, 02:22:21 PM
वाह!
आता मी...

उलटून गेली वेळ आणि
उमजू मजला लागले....
विरहात आसू गाळले जे,
भिजवू मजला लागले.....

सांग का मी असे
हरवून बसले सारे काही....
उमगत गेले, समजत गेले,
हाती आता काही नाही.....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on October 26, 2013, 12:22:54 AM
 :) :)वा -वा  मिलिंद अन मधुरा !!छान चारोळ्या !!
,
,.... मधुरा ,,,
   प्रत्येक दिन ह्या  जीवनाचा
  काहीतरी मर्म शिकवितो
  कसे जगावे परिसापरी
हाच धर्म शिकवितो
.
,
.
   मिलिंद छान ..........
,
,
कितीही विनविले अन
घेतल्या कितीही  आणा
पण जीवनाचे गूढ हे
वाळू मुठीत बांधता आली का कुणा? .........।  :) :) :) :) :)
                 
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on October 26, 2013, 12:06:48 PM
sweetsunita, मधुरा
वा -वा ......छान......

रोजच्या स्वप्नात माझ्या, येउनी जातेस तू
आसवांचा प्रांत मागे, सोडुनी जातेस तू ......

सांजवेळी तारकांनी, पेटुनी जातेस तू
काळजाशी घाव ओला, ठेवुनी जातेस तू ......

मिलिंद
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on October 26, 2013, 03:58:45 PM
वाह! मिलिंद दा, मस्त, भारी, खूप आवडलं, खूप मस्त.....

ये जरा पाहून जा तू,
काय होते, काय झाले...
नाजूक होते फुल जे,
ते कोरडे पाषाण झाले....
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on October 26, 2013, 04:00:45 PM
सुनिता दि, छान!
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on October 30, 2013, 01:59:32 PM
आभारी आहे ,पण मला कधी कधी लाज वाटते की मी तुम्हा सर्वां सारखी नाही लिहू शकत तरीही कधी मधी एखादी कविता पोस्ट करण्याचा मोह मी टाळू शकत नाही
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on October 31, 2013, 04:04:00 PM
लाज वाटण्याची काहीच गरज नाही. तू चांगल्या कविता करतेस कि!!
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on November 01, 2013, 09:07:25 AM

Madhura,

नाजूक होते फुल जे,
ते कोरडे पाषाण झाले....

kya baat...... :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on November 05, 2013, 10:18:44 AM
Thanks Milind Da!!! :)
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on November 05, 2013, 11:34:32 AM
कळेना कधी गुंतले, संपले मी
तरीही कुठे बावरी, चालले मी ...

जराशी जराशी अता राहिले मी
व्यथा, वेदनांनी जणू वेढले मी ...

मिलिंद कुंभारे
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on November 10, 2013, 12:55:17 PM
चांगली जुगलबंदी जमली काव्याची,
वाढ होईल मराठी साहित्याची !
निखळ गोडी वाढवा प्रेमाची,
वृद्धी होत राहो मायमराठीची !
!

Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on November 11, 2013, 09:18:09 PM
वा!!!

धागा कवितेचा
जोडतो मराठीला,
जमलो कवी सारे,
मायबोली जपायला.....


शिवाजी सांगळे, स्वागत आणि धन्यवाद!!
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on November 12, 2013, 06:14:44 PM
मधुराजी तुम्हाला पण धन्यवाद... छान लिहिता...
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on November 23, 2013, 05:03:50 PM
शिवाजी सांगळे......

छान,
चारोळ्या मध्ये आपले स्वागत आहे ......  :)
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on November 23, 2013, 10:47:10 PM
छोटासा प्रयत्न आता करतो आहे,
चुकलच काहि! तुम्हीच सावरायचे आहे !!
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on November 25, 2013, 07:29:26 PM
शिवाजी,
मिलिंद दा,

मस्त!!
__________


आता कवितेच्या ओळी.....


साठवलेल्या आठवणी या,
नयनांतून झरती क्षणोक्षणी....
एकटी पडते अशी कि
भटकत फिरते अधांतरी.....
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on November 25, 2013, 10:40:00 PM
आठवणीची साठवणी
सवय हि चांगली खरी,

चांगली म्हातारी शेवरीची
हवेत तरंगते अधांतरी !

रागवायचं नाही मधुराजी... तुम्ही अशाच लिहित रहा.
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on November 27, 2013, 04:57:43 PM
शिवाजी, मधुरा.....
छान.... :)

आता मी ....

तुला विसरण्याचे ठरवले जरी मी
मनाने कधी ते सुचवलेच नाही ......

तुला आठवू पाहतो मी, अता का?
जरी गूढ सारे उमगलेच नाही .....
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on November 27, 2013, 09:37:27 PM
वा.. छान मिलिद,

विसरायचे कसे आपण?
हे नियतीलाच ठरवू दे,

आपल्यात मात्र प्रेम,
चिरंतन असेच राहू दे !
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on November 28, 2013, 09:12:05 AM
शिवाजी,

kya baat...... :)
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on November 28, 2013, 10:16:29 AM
thanks... bro
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on November 29, 2013, 04:47:14 PM
Too good brothers!! :)
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on November 29, 2013, 04:56:32 PM
I dont know r u  younger or older? even though, thanks sis..... shivajida
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on December 02, 2013, 08:25:50 PM
छान !मधुरा मिलिंद अन शिवाजी,,
छान चाललाय खेळ अवीट  चारोळ्यांचा 
अप्रतिम  शब्द बंध जुळती ,आरसा हा मनाचा
,माय बोलीचा हा प्रवाह निरंतर असाच वाहू दे
,अभिमान मराठीचा मनोमनी असाच राहू  दे...
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on December 02, 2013, 10:00:07 PM
धन्यवाद ......

स्वीट कमेंट, सुनिता, 
आली आता तुझी  चारोळी,
राहिली शिल्लक पुन्हा
मधु अन मिलीदाची खेळी !

Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on December 03, 2013, 01:27:58 PM
धन्यवाद शिवाजी !!
   मिलिंद अन मधुरा mk चे दोन नगीने
   एक स्वाध्यायात गुंतली दुसऱ्याचे  कार्यालयीन देणे 
   तरी,कवितांचा आस्वाद देतात आपल्याला
   सृजनशील जबाबदारी प्रस्तुत करुनी आपुलकीने
   
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on December 03, 2013, 02:18:52 PM
फारच छान....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on December 04, 2013, 02:42:02 PM
धन्यवाद!!!!!
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on December 04, 2013, 05:09:33 PM
मायमाउली तू , माझी मायमराठी,
अवीट तुझी गोडी, अजरामर तुझी थोरवी,
सकलजनी, मनोमनी तू सदैव चिरंजीवी,
संपवी तुज ऐसा, त्रीलोकांत कुणी नाही!
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on December 05, 2013, 02:37:11 PM
मिलींद, खरच आहे, माय मराठीला कुणीच संपवू शकणार नाही. सार्थ अभिमान आहे सर्वांना....
तसेच मी तयार केलेला विडीयो पुढील लिंक वा फेस बुक वर जरूर पहा... http://www.youtube.com/watch?v=LsH_sFmf9f0
धन्यवाद !
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on December 06, 2013, 07:41:59 PM
वाह!!! धन्यवाद सुनिता!!!

 

धन्यवाद शिवाजी !!
   मिलिंद अन मधुरा mk चे दोन नगीने
   एक स्वाध्यायात गुंतली दुसऱ्याचे  कार्यालयीन देणे 
   तरी,कवितांचा आस्वाद देतात आपल्याला
   सृजनशील जबाबदारी प्रस्तुत करुनी आपुलकीने
   

Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on December 06, 2013, 07:50:40 PM
 जाऊ कुठे कशी मी?
चहूकडे पहारे...
गजाआड एकटी मी,
अंगावरी शहारे..

पिंजऱ्यात बांधून मजला, शोपीस नका हो बनवू.....
सांगा किती कसे मी, आता तुम्हाला विनवू???

उडण्या आकाशी मी, घेतली भरारी....
सोडून आज आले, दुनिया ती विषारी......


-मधुरा
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on December 06, 2013, 10:11:21 PM
वा, मधुरा, छान लिहिलस...
माझ्या "माझी मुंबई" या कवितेवर आधारित विडीयो you tube वर पुढील लिंक वर पहा वा फेस बुक वर shivaaji sangle search करून जरूर पहा, व तुझा अभिप्राय जरूर कळव. http://www.youtube.com/watch?v=LsH_sFmf9f0 एकेरीत उल्लेख केल्या बद्धल राग मानू नकोस, मोठा भाऊ म्हणून सांगत आहे.
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on December 07, 2013, 02:11:09 PM
 जाऊ कुठे कशी मी?
चहूकडे पहारे...
गजाआड एकटी मी,
अंगावरी शहारे..

पिंजऱ्यात बांधून मजला, शोपीस नका हो बनवू.....
सांगा किती कसे मी, आता तुम्हाला विनवू???

उडण्या आकाशी मी, घेतली भरारी....
सोडून आज आले, दुनिया ती विषारी......
    very nice MADHURA...
.
.

फुल उमलण्या आधी ,
कुणी हो कुस्करले .
उघडे आकाश बघण्याचे ,
स्वप्न कुणी हो चोरले ?
का सावित्री अन अहिल्या ,
पोरक्या झाल्या जगी ?
का मुलींचा जन्म ,
यक्ष प्रश्न वाटे उगी .
मातेची मायेची ऊब ,
असे कसे हो सर्व  विसरलेत ,
बहिणीची वेडी माया ,
असे कसे हो परके केलेत ?
जर ,यांच्या साठी मनाच्या कप्प्यात ,
जागा असेल बर का  जराशी ,
तर ,जन्मणारी कन्या ,
माय बहिणच असेल ना उद्याची .
का आपल्याच हाताने ,
मारताय पायावर कुऱ्हाडी
जर जगात स्त्रीच नसेल ,
वंश वाढीला लागेल ना बेडी
आपल्याच मानव जातीचा ,
समूळ नाश कराया निघाले
विनाश काले विपरीत बुद्धी ,
हेच का सिद्ध करण्यास निघाले  ???         
                                            सुनिता
                                                    ७डिसेंबर १३
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on December 07, 2013, 02:19:15 PM
सुनिता, छान भावनाप्रधान कविता... अभिनंदन
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on December 07, 2013, 02:21:44 PM
 :) :) :) :)धन्यवाद :) :) :) :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on December 07, 2013, 06:22:42 PM
मस्त ग सुनिता दि !!!!

शिवाजी दा, कविता छान आहे...मुंबईवरची कविता भलतीच मोठ्ठी आणि तिथलं बदलत वातावरण त्यात छान दाखवलं आहे.......पण व्हिडिओ टाकणाऱ्याचे नाव वेगळचं का आहे????
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on December 08, 2013, 10:09:17 PM
आभारी आहे ,मधुरा .
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on December 08, 2013, 11:25:29 PM
मधुरा, तुझी प्रतिक्रिया योग्य आहे, विडीयो माझ्या मुलाने म्हणजे "रोहन सांगळे" याने you tube वर अपलोड केला, कारण त्या बद्दल मला technical तितकं लक्षात आल नव्हत म्हणून हा घोळ.... बाकी काहि नाही, तू आठवणीने विडीयो पाहिलास त्या बद्दल धन्यवाद !
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on December 09, 2013, 08:28:17 PM
शिवाजी दा,

मुंबईवर व्हिडिओ शूट करून त्यावर कविता आणि त्यावर केलेली भाष्य हा एक छान प्रयोग होता.
असे नवे प्रयत्न करणाऱ्यांच नेहमीच कुतूहल वाटत मला....खूप छान आहे. असे नवीन प्रयोग नक्की करत राहा.
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on December 09, 2013, 08:42:17 PM
मधुरा, मनापासून धन्यवाद ..... असाच लोभ राहू दे!
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on December 09, 2013, 09:00:05 PM
आता माझा एक मुक्तछंद......


का बांधून ठेवले आहे मला? ? ? ?
माझे पंख तर केव्हाच छाटून टाकलेले आहेत तुम्ही.....
आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्नसुद्धा पडत नाहीत मला आजकाल.....

झाडाच्या फांदीवरच्या घरटे,
ते हवे तिथे हवे तसे उडण्याचे स्वतंत्र.....
सारे काही कधीच हिरावून घेतलेले आहेत....
 
एक मात्र समाधान आहे,
आता काहीच नाही उरलेलं माझ्याजवळ गमावण्यासारख....
काहीच नाही....


पण मला अजुनी कळत नाही हो.....
मी जागचा हलूही शकणार नाही अशी खात्री झाली तरीही...
तरीही अजून का बांधून ठेवले आहे मला? ? ? ?
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on December 09, 2013, 10:52:17 PM
छान ह मधुरा !!!!!!!!!
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on December 10, 2013, 09:36:57 AM
सुनिता दि,  धन्यवाद!!!

आता तुझी पाळी....
लवकर पाठव चारोळी !!!! :)
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on December 10, 2013, 10:45:59 AM
मधुरा हे तुझ्यासाठी  :) :) :)
जरी पक्षी असे तो बिचारा अन बिन पराचा ,
तरी आत्मविश्वास त्याचा असे पराकोटीचा
जर प्रयत्ने रगडीता वाळूतुनही तेल गळे
तर साहस अन चिकाटीतूनही  सफलता मिळे  :) :)
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on December 10, 2013, 02:31:21 PM
Ekdam Sahi..... Snita...
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on December 10, 2013, 02:33:53 PM
Ekdam sahi... Sunita,,, ;D
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on December 10, 2013, 03:00:48 PM
thanks
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on December 10, 2013, 04:22:00 PM
सुनिता दि, छानच...

Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on December 11, 2013, 11:32:58 AM

आयुष्याच्या  विचित्र  त्या वळणावरती जेव्हा तू भेटली
सत्य एक सांगून गेली, सत्य दुजे मनी दडवून गेली ......

आता सरल्या कितीच रात्री, दिसहि कित्येक लोटली
पुन्हा आठवण तुझी अधुऱ्या त्या क्षणांत मज हरवून गेली ......

पूर्ण कविता विरह कवितेत "अधुरे स्वप्न" वाचा ... :)
Title: Re: चारोळी
Post by: pankajkhole9 on December 12, 2013, 08:59:18 PM
beautiful poem
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on December 14, 2013, 11:28:42 AM
Milind da, Good!!!


Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on December 15, 2013, 10:42:45 PM
खूप छान मिलिंद !
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on December 18, 2013, 04:32:13 PM
सुनिता ताई, मधुरा, pankajkhole...
धन्यवाद  :)

कविता सहजच लिहिली होती .... :)
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on January 29, 2014, 10:57:20 PM
मिलिंद दा, अनेकदा सहज केलेल्या गोष्टीच जास्त छान होतात. :)
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on February 12, 2014, 09:30:30 PM
नमस्कार मित्रांनो
ओळखलात का मला
मी प्राजदीप माझ्या रियल नावात
आजकल कविता सुचत नाही म्हणून mk वर नव्हतो
मधूरा दी जून्या चारोळ्या वाचून परत कविता लिहाविसी वाटते
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on February 13, 2014, 10:36:54 AM
मित्रा, लिहित रहा
लिहिण्याने मन मोकळे होते,
मित्रानॉ, लिहित रहा
आभाळ पुन्हा भरून येते !!


शिव.....
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on February 16, 2014, 02:38:50 PM
पहील्याच नजरेत असे काय केले
मनाला माझ्या वेड तुझे लागले
तुझ्या डोळ्यात सवतःला हरवून गेले
नजरेच्या बंदिशाळेत बंद झाले
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on February 16, 2014, 06:19:58 PM
जग हे मृगजळ भासे....
क्षणात उलटे फासे....
हा डाव टाकतो कोणी,
अन पाहून नियती हासे....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on February 17, 2014, 09:04:38 AM
 या स्वप्न लोकी  जगती
मृगजळाचे जाळे असती
नसे कुणी लक्ष्मण  आता
सीतेस वाचविण्या जगती
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on February 17, 2014, 01:00:41 PM

या स्वप्न लोकी  जगती
मृगजळाचे जाळे असती
नसे कुणी भरत आता
सीतेस वाचविण्या जगती
.
.
.
छान  .
.
रक्षण्या सीतेला या जगी,
पुन्हा भरत येतील...
संहार् करण्या दुष्टांचा,
पुन्हा श्रीराम अवतरतील....
.
.
दुमदुमुन जातील सार्‍या दिशा,
पुन्हा रामनामाचे गजर होतील....
गर्द त्या अंधारात आता,
आशेचे प्रभाकर् येतील....
.
.
विजय  सुर्यवंशी....
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on February 17, 2014, 03:20:42 PM
म्हणतात कि आशेवर
दुनिया कायम आहे,
आहे अस्तित्व रावणाचे
म्हणूनच रामही आहे !



शिव....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on February 17, 2014, 09:54:54 PM
verrrry nice,vijay n  shiwaji,,,,,




आशेवर जगण्याने
पाऊले पुढे पडतात
मनीच्या विश्वासावर
अप्रतिम कार्य घडतात
Title: Re: चारोळी
Post by: vijaya kelkar on February 18, 2014, 11:19:02 AM
               प्रबळ तृष्णा लागे मृगास
               धावे जवळ करण्या भासास
               सीतेची आस रावणास
               हाका मारती रामास
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on February 18, 2014, 04:17:06 PM
रावणास आस होती सीतेची
घेतली मदत त्याने मृगाची,
म्हणूनच सत्य आले पुढे,
असे व्यर्थ आस मृगजळाची !!

धरावी कास सदा सत्याची
तारून घेते नाव जीवनाची,
गेले सागून सारे संत-महंत
जावो ना व्यर्थ वारी जन्माची !!


शिव......
Title: Re: चारोळी
Post by: प्रशांत पवार on February 20, 2014, 03:33:31 PM
अशी कशी ही नाती गं...
ह्र्द्याच्या तारांनी जोडलेली...
दुर गेली कुणी तोडूनी..
तरी ती एकमेकात जखडलेली..
©*मंथन*™...
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on February 21, 2014, 08:09:23 PM
दूर गेल्याने
किंमत कऴते प्रेमाची
जवळ आल्याने
दूरावती नाती माणसाची
Title: Re: चारोळी
Post by: ap01827 on February 21, 2014, 10:18:12 PM
आपल्या दोघांच एकमेकाशी
                            अतूट नातं आहे
हे सर्वाना सांगण्यासाठी पाणी
                            नदीचं वहात आहे
                         
                          संदीप लक्ष्मण नाईक 
 
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on February 22, 2014, 10:15:26 AM
प्रिय सई.....
[/color].
[/color].
[/color]नाती तुझी माझी प्रेमाची,
[/color]रेशीम धाग्यांनी विणलेली...
[/color]मावळतीच्या प्रभाकराने जशी...
[/color]वेडी संध्या खुललेली....
[/color].
[/color].
[/color]आसवांचे साज अन भावनेचे गाज,
[/color]जशी ही वसुंधरा गहिवरलेली...
[/color]अनोख्या ऐश्या त्या मिलनाला,
[/color]जशी रात्र ती मंतरलेली.....
[/color].
[/color].
[/color]   विजय सुर्यवंशी.
[/color](यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: kuldeep p on March 04, 2014, 09:04:16 AM
तीच्याशी हसता हसता
रडलो कधी समझलेच नाही
तिच्या बरोबर चालता चालता
हरवलो कधी समझलेच नाही
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on March 04, 2014, 10:21:37 PM
खूप छान चाललय !!!!!

कश्या सांज वेळी प्रभाकराने
छटा पसरविल्या किरणांच्या
कश्या  बाहू पाशात अडकल्या
प्रेम भावना प्रियतमेच्या


कशी धरीत्रीच्या प्रेमाची चाहूल
अलगदच लागली त्या  चंद्राला
म्हणूनच का चांदण्यांचा वर्षाव
केला वसुधेच्या तनुला सजवायला....
                                              सुनिता 
Title: Re: चारोळी
Post by: ap01827 on March 06, 2014, 06:39:02 PM
एक हायकू...

तुला पाहून
वसंता, ही वसुधा
नवरी नवी !

संदीप लक्ष्मण नाईक
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on March 10, 2014, 10:44:59 AM

खूप छान चाललय !!!!!

कश्या सांज वेळी प्रभाकराने
छटा पसरविल्या किरणांच्या
कश्या  बाहू पाशात अडकल्या
प्रेम भावना प्रियतमेच्या


कशी धरीत्रीच्या प्रेमाची चाहूल
अलगदच लागली त्या  चंद्राला
म्हणूनच का चांदण्यांचा वर्षाव
केला वसुधेच्या तनुला सजवायला....
                                              सुनिता
.
.
.
.
So nice one...

Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on May 17, 2014, 10:38:02 AM
टाळू नकोस आता,
सांगू नको बहाणे,
मी सोडवीत आहे,
सारे तुझे उखाणे...

तू न बोलताही
मज कळून गेले....
हे प्रेम ना खरे रे,
मी कळवळून गेले....
Title: Re: चारोळी
Post by: शिवाजी सांगळे on May 17, 2014, 09:23:55 PM

टाळायचे अन सोडवायचे
का आता, लटके बहाणे,
भेटलात सारे पुन्हा
आहे प्रेम हे पुराणे !!
Title: Re: चारोळी
Post by: ap01827 on May 18, 2014, 03:02:31 PM
         आज मी सुध्दा येणार नाही
     पाऊस पण खूप अति शहाणा आहे
          तो आला तरच मी येईन
    मला न भेटण्याचा तुझा बहाणा आहे

              संदीप लक्ष्मण नाईक


Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on May 18, 2014, 10:47:26 PM
एक नवीन प्रयत्न करूया का?

एका व्यक्तीने कवितेची अर्धी ओळ टाकायची आणि बाकीच्यांनी ती आपापल्या पद्धतीने 'यमक' जुळवत पूर्ण करायची....

उदाहरणार्थ:

पोस्ट:

"किती बेभान पाउस,
आज भिजवतो मला..."

तर  प्रतिसाद:

"किती बेभान पाउस,
आज भिजवतो मला...
त्याच्या टपोऱ्या थेंबांनी,
सजवतो मला..."

असा चालू शकेल.


किव्हा प्रतिसाद असाही असू शकेल...

"किती बेभान पाउस,
आज भिजवतो मला...
रिमझिम अंगणात,
रमवतो मला."

चालेल का?
Title: Re: चारोळी
Post by: प्रशांत पवार on May 19, 2014, 12:24:04 AM
छान कल्पना
Title: Re: चारोळी
Post by: kiran shelar on May 19, 2014, 04:08:07 PM
cool
Title: Re: चारोळी
Post by: ap01827 on May 19, 2014, 08:25:22 PM
"किती बेभान पाउस,
आज भिजवतो मला...
बनतो थेंब सोन्याचा
जो स्पर्शून जातो मला...

संदीप लक्ष्मण नाईक
   
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on May 20, 2014, 12:13:30 PM
संदीप, खूप छान!!
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on May 20, 2014, 12:18:25 PM
सांभाळ बोलताना,
शब्द ते विषारी...
Title: Re: चारोळी
Post by: Bhushan Kasar on May 20, 2014, 12:36:27 PM
काळजाचा ठोका
ते क्षणार्धात थांबवि...
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on May 20, 2014, 12:38:59 PM
भुषण, छान आहेत ओळी.

"सांभाळ बोलताना,
शब्द ते विषारी...
एकेक शब्द माझ्या,
लागतो जिव्हारी...."
Title: Re: चारोळी
Post by: Bhushan Kasar on May 20, 2014, 12:42:46 PM
I really enjoy this concept, plz give some other lines
Title: Re: चारोळी
Post by: Bhushan Kasar on May 20, 2014, 01:01:49 PM
दूर गेल म्हणून कोणी गाव विसरत नाही ...


Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on May 21, 2014, 04:29:39 PM
"किती बेभान पाउस,
आज भिजवतो मला..."
पाना पानातून थेंब टपोरे
अभिषेक घालितो धरेला ....

"किती बेभान पाउस,
आज भिजवतो मला..."
उल्हासी मन माझे
साद घाली तुला ,...



"किती बेभान पाउस,
आज भिजवतो मला..."
तुझी  अशी बेधुंद  वाणी
स्वप्न लोकी नेई मला .... सुनिता
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on May 21, 2014, 04:34:12 PM
"किती बेभान पाउस,
आज भिजवतो मला..."
पाना पानातून थेंब टपोरे
अभिषेक घालितो धरेला ....

"किती बेभान पाउस,आज भिजवतो मला..."
उल्हासी मन माझे
साद घाली तुला ,...



"किती बेभान पाउस,
आज भिजवतो मला..."
तुझी  अशी बेधुंद  वाणी
स्वप्न लोकी नेई मला .... सुनिता
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on May 21, 2014, 04:35:50 PM
सांभाळ बोलताना,
शब्द ते विषारी...
छेदून काळजाला
शर आरपार जिव्हारी ....सुनिता
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on May 21, 2014, 11:21:52 PM
वाह, सुनिता.... मस्त!

भूषण,

"दूर गेलं म्हणून, कोणी गाव विसरत नाही...
शहराची शोभा मी हि मिरवत नाही...."
Title: Re: चारोळी
Post by: Bhushan Kasar on May 22, 2014, 09:53:26 AM
"दूर गेलं म्हणून, कोणी गाव विसरत नाही,
आपली माणस आठवली की रडू आवरत नाही."
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on May 22, 2014, 11:15:22 AM
पावसात भिजूनही, मन हे कोरडे....
Title: Re: चारोळी
Post by: Bhushan Kasar on May 22, 2014, 01:03:51 PM
"पावसात भिजूनही, मन हे कोरडे,
प्रत्येक थेंबात पावसाच्या शोधते मात्र तुला ते"
Title: Re: चारोळी
Post by: ap01827 on May 22, 2014, 10:15:34 PM
"पावसात भिजूनही, मन हे कोरडे,
तहान भागली तरी चातक ही ओरडे

      संदीप लक्ष्मण नाईक
Title: Re: चारोळी
Post by: Bhushan Kasar on May 24, 2014, 12:30:11 PM
धडपडणाऱ्या जीवाला अन् दुभंगलेल्या मनाला .....
Title: Re: चारोळी
Post by: ap01827 on May 24, 2014, 04:00:18 PM
धडपडणाऱ्या जीवाला अन् दुभंगलेल्या मनाला .....
मृत्यू शिवाय काही दिसत नाही आता तरी या क्षणाला .....

                संदीप लक्ष्मण नाईक

Title: Re: चारोळी
Post by: ap01827 on May 24, 2014, 04:14:32 PM
खूप खूप, पडून पडून,
विचारतो दमलेला पाऊस 


          संदीप लक्ष्मण नाईक
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on May 27, 2014, 04:06:00 PM
उड्त्या पाखरांना परतीची तमा नसावी...
नजरेत नेहमी नवी दिशा असावी...
घरट्याचं काय बांधता येईल कोण जाणे....
पण क्षितिजापलिकडे झेप घेण्याची जिद्द मात्र असावी.....
Title: Re: चारोळी
Post by: Bhushan Kasar on May 27, 2014, 04:58:07 PM
"धडपडणाऱ्या जीवाला अन् दुभंगलेल्या मनाला,
  सावरणारी फक्त माझी कविता....."
Title: Re: चारोळी
Post by: Bhushan Kasar on May 27, 2014, 04:59:50 PM
इच्छा असून काही नाही प्रयत्न केले पाहिजे ....
Title: Re: चारोळी
Post by: ap01827 on May 29, 2014, 10:10:05 AM
खूप खूप, पडून पडून,
विचारतो दमलेला पाऊस
पावसात चिंब भिजायची
सखी तुझी पुरी झाली का हौस ?   

           संदीप लक्ष्मण नाईक
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on May 29, 2014, 12:03:13 PM
"दूर गेलं म्हणून, कोणी गाव विसरत नाही... 
जीर्णोद्धार गावही मातीचा सुंगंध हरवत नाही......
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on May 29, 2014, 12:11:01 PM
पावसात भिजूनही, मन हे कोरडे....
जसे कमल फुलाला पंक ना उलगडे .....
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on May 29, 2014, 12:15:59 PM
धडपडणाऱ्या जीवाला अन् दुभंगलेल्या मनाला .....
कुणी शिंपी  शिवणार का तडे गेलेल्या काळजाला???
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 02, 2014, 04:15:54 PM

धडपडणाऱ्या जीवाला अन् दुभंगलेल्या मनाला .....
कुणी शिंपी  शिवणार का तडे गेलेल्या काळजाला???
.
.
.
.
.
.
.
.
कशाला दिल्या तु गुलाबी खुणा....
काय सांग होता माझा गुन्हा....
पाहता जरा तु हसुनी उगा....
मला वाटते की जगावे पुन्हा....
.
.
  विजय सुर्यवंशी.
(यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: Bhushan Kasar on June 02, 2014, 04:59:10 PM
"धडपडणाऱ्या जीवाला अन् दुभंगलेल्या मनाला,
  साथ तुझी हवी मला प्रत्येक क्षणाला".
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on June 19, 2014, 11:10:52 PM
wah vijay khup chhan!
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on June 22, 2014, 04:40:27 PM

प्रिय सई....
.
.
माझी कविता अनं त्याचं जग...
तुझ्याविना होणारी तगमग...
आठवणींचा उमाळा असा...
जसे दाटती आसवांचे ढग...
.
.
   विजय सुर्यवंशी
(यांत्रिकी अभियंता)
Title: Re: चारोळी
Post by: Sonal ghewande on June 28, 2014, 04:07:56 PM
Hi....

Me tumchya charolya vachlya....
Apratim!!!
Mnat ghr krun jatat charolya tumchya...
Title: Re: चारोळी
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on July 21, 2014, 12:12:18 AM

Hi....

Me tumchya charolya vachlya....
Apratim!!!
Mnat ghr krun jatat charolya tumchya...
.
.
.
.
Thanks for reading..
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on July 25, 2014, 03:48:11 PM
vijay, sweetsunita nice one!!!

आजचे तुझे  भेटणेही
कालच्यासारखेच होते
जसे ढगांनी दाटून यावे
अन न बरसताच निघून  जावे ......

मिलिंद कुंभारे
Title: Re: चारोळी
Post by: प्रशांत पवार on July 25, 2014, 04:36:43 PM
तूझी माझी भेटीची वेळ..
नेहमीच ठरलेली...
तरी ती रोजच....
काहीशी बावरलेली..
©*मंथन*™...
Title: Re: चारोळी
Post by: sweetsunita66 on July 29, 2014, 02:58:12 PM
प्रिय सई....
.
.
माझी कविता अनं त्याचं जग...
तुझ्याविना होणारी तगमग...
आठवणींचा उमाळा असा...
जसे दाटती आसवांचे ढग...
.
.
   विजय सुर्यवंशी
(यांत्रिकी अभियंता)

.
.
.
.

वा वां विजय,
मिलिंद खूप छान !!

आठवणींच्या विश्वात
सर्व विसरून जावे
संग साथिचे क्षण
अनंतवेळी उजळूनी यावे
का कधी धवल  चंद्र हा
नभास पोरका होते
मैत्रीची हवीहवीशी उब
कधी का नकोशी होते
त्याच मैत्रीच्या उबेने
जगण्यास सार्थकता येते .... सुनिता
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on December 27, 2014, 12:08:09 PM
अरे वाह, सगळेच खूप छान लिहिता चारोळ्या. 

बघ शब्द पाळला मी,
ना बोलले कुणाला....
Title: Re: चारोळी
Post by: Ravi Padekar on October 29, 2015, 12:40:31 PM
nice charolya
Title: Re: चारोळी
Post by: Ravi Padekar on October 29, 2015, 12:42:47 PM
बघ शब्द पाळला मी,
ना बोलले कुणाला....
शांत राहूनच,
मुक्याने ठेवले मनाला
Title: Re: चारोळी
Post by: Ravi Padekar on October 29, 2015, 02:24:54 PM
छान आहे चारोळी मधुरा...
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on January 18, 2016, 01:46:13 PM
Thanks raviji
Title: Re: चारोळी
Post by: sangita_4101980 on January 18, 2016, 03:18:31 PM
someone so special:

आरस्पानी पूर्णत्व जोडले हृदयानी ,
परीघ तू , स्पर्शून झाले मी वर्तुलापरी
गाज सागराची , साद घाले प्रीतीची ,
स्वप्न हसली माझी तुझिया नयनी ,
चंदनाचा गर्व हरवशी असा तू संगती ,
तूच सुरुवात अन सांगता माझी .
Title: Re: चारोळी
Post by: baby on January 21, 2016, 02:50:43 AM
बघ शब्द पाळला मी,
ना बोलले कुणाला....
ashru mukt kele
sawarle dukhi manaala...........
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on August 16, 2016, 11:52:23 AM
Vaah vaah!!!! :)
Title: Re: चारोळी
Post by: ap01827 on August 17, 2016, 12:39:00 PM
बघ शब्द पाळला मी,
ना बोलले कुणाला...
मन अबोल असून ही
कळे कसे जगाला ?
     
संदीप लक्ष्मण नाईक

Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on August 17, 2016, 02:43:13 PM
Chhan!



Title: Re: चारोळी
Post by: सनिल पांगे....sanilpange on September 28, 2016, 10:55:27 AM
चांदण्यांची ऐटीत निघाली
नाचत, गाजत एक वरात
माझ्या खिडकीत चंद्र पाहून
थेट शिरली घरात
@सनिल पांगे
Title: Re: चारोळी
Post by: सनिल पांगे....sanilpange on September 28, 2016, 11:11:15 AM
माझ्या मनाची अबोली
तुझ्या मनाचा प्राजक्त
मी डोळ्यानं खुणावते
तू मुक्यानेच होतस व्यक्त
@ सनिल पांगे
Title: Re: चारोळी
Post by: मिलिंद कुंभारे on September 28, 2016, 11:34:52 AM
माझ्या मनाची अबोली
तुझ्या मनाचा प्राजक्त
मी डोळ्यानं खुणावते
तू मुक्यानेच होतसे व्यक्त ....

सनिल पांगे, क्या बात .... :) :) :)
Title: Re: चारोळी
Post by: सनिल पांगे....sanilpange on September 28, 2016, 11:58:51 AM
धन्यवाद मिलिंद
Title: Re: चारोळी
Post by: सनिल पांगे....sanilpange on October 01, 2016, 12:36:22 PM
तुझं आपलं ठीक आहे
अबोली घेऊन येतोस
मला मात्र प्रश्नचिन्हेची
खोली देऊन जातोस
@ सनिल पांगे
Title: Re: चारोळी
Post by: vijay kumbhar on October 16, 2016, 10:04:21 AM
खूप छान... माधुरी कुलकर्णी आणि सनिल पागे
Title: Re: चारोळी
Post by: Vaibhav.kul on October 20, 2016, 06:11:41 PM
स्पर्श तुझा असा कि
जगण्याचं नवीन स्वप्न बघू शकतो,
तुझ्या स्पर्शा ने च गं
श्वासाशिवाय काही वेळ राहू शकतो,

वैभव कुलकर्णी
जालना
9920897704
Title: Re: चारोळी
Post by: Madhura Kulkarni on October 10, 2019, 12:17:14 AM
मी अशी अन तो तसा.....
संपले सारे तिथे.....
ना तया बदलायचे, ना मला बदलायचे!
मी निनावी, तो अनामिक.....
रुजलो होतो इथे....
ना तया उमलायचे, ना मला उमलायचे!
Title: Re: चारोळी
Post by: Shubhangi virkar on February 21, 2021, 04:22:32 PM
तू भेट ना नव्याने