Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: Madhura Kulkarni on March 18, 2013, 05:10:45 PM

Title: जाऊन देत नां पण......आपल्याला काय पडलंय?
Post by: Madhura Kulkarni on March 18, 2013, 05:10:45 PM
जाऊन देत ना......
आपल्याला काय पडलंय?


स्त्रियांवरचे अत्याचार,
सामुहिक बलात्कार,
भ्रष्ट लोकांचा सत्कार,
खरेपणाचा धुत्कार......

हातावर हात ठेवून सरकार गाफील बसलय,
जाऊन देत ना पण.... आपल्याला काय पडलंय?




श्रीमंतांकडे पैसा वाढतोय,
गरीब अजुनी उपाशी झोपतोय,
शेतकरी कर्जापायी मारतोय,
कर्जाचे हफ्ते त्याचा परिवार भरतोय,

बेरीज करूनही हाती शून्यच उरतय.....
जाऊन देत ना पण.....आपल्याला काय पडलंय?



हक्कासाठी स्त्री झटतेय,
कोर्ट मात्र तारीख पुढेच रेटतेय,
क्षणक्षण ज्ञायासाठी लढतेय,
खरतर गजाआड ती स्वतः:च झुरतेय,   

माणसाच माणूसपण हवेतच विरतंय......
जाऊन देत ना पण.....आपल्याला काय पडलंय?



अनधिकृत म्हणत पडतायत घर,
काढतायत साऱ्या लोकांना रस्त्यावर,
स्वच्छतेचा काही पत्याच न्हाई,
पण त्याबद्दल कुणी काही बोलायचं नाही.....

पोपटपंची नुसती, वरीस असच सरतय.....
जाऊन देत नां पण......आपल्याला काय पडलंय?

Title: Re: जाऊन देत नां पण......आपल्याला काय पडलंय?
Post by: मिलिंद कुंभारे on March 19, 2013, 10:24:17 AM
मधुरा
खूपच छान!


मिलिंद कुंभारे  :) :) :)
Title: Re: जाऊन देत नां पण......आपल्याला काय पडलंय?
Post by: केदार मेहेंदळे on March 19, 2013, 11:37:44 AM
ज्याच जळतं त्यालाच कळतंय
आत्ता तरी आपल ठीक चालतय 
म्हणून म्हणतो,
जाऊन देत ना पण.... आपल्याला काय पडलंय?
Title: Re: जाऊन देत नां पण......आपल्याला काय पडलंय?
Post by: Madhura Kulkarni on March 19, 2013, 01:27:52 PM
Thanks Milind Dada,

केदार दादा,

छान आहेत ओळी.